Responsive Ads Here

शुक्रवार, ३० मार्च, २०१८

मारोती स्तोत्र


भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।
वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥
महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।
सौख्यकारी दुःखहारी (शोकहर्ता) (धूर्त) दूत वैष्णव गायका ॥२॥
दीननाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा ।
पातालदेवताहंता भव्यसिंदूरलेपना ॥३॥
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना ।
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ॥४॥
ध्वजांगें उचली बाहो आवेशें लोटला पुढें ।
काळाग्नि काळरुद्राग्नि देखतां कांपती भयें ॥५॥
ब्रह्मांडें माइलीं नेणों आंवाळे दंतपंगती ।
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळें ॥६॥
पुच्छ तें मुरडिलें माथां किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटि कांसोटी घंटा किंकिणि नागरा ॥७॥
ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू ।
चपळांग पाहतां मोठें महाविद्युल्लतेपरी ॥८॥
कोटिच्या कोटि उड्डाणें झेंपावे उत्तरेकडे ।
मंदाद्रीसारखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें ॥९॥
आणिला मागुतीं नेला आला गेला मनोगती ।
मनासी टाकिलें मागें गतीसी तूळणा नसे ॥१०॥
अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे ।
तयासी तुळणा कोठें मेरु- मांदार धाकुटे ॥११॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे वज्रपुच्छें करूं शके ।
तयासी तुळणा कैंची ब्रह्मांडीं पाहतां नसे ॥१२॥
आरक्त देखिले डोळां ग्रासिलें सूर्यमंडळा ।
वाढतां वाढतां वाढे भेदिलें शून्यमंडळा ॥१३॥
धनधान्य पशुवृद्धि पुत्रपौत्र समग्रही ।
पावती रूपविद्यादि स्तोत्रपाठें करूनियां ॥१४॥
भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही ।
नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शनें ॥१५॥
हे धरा पंधराश्लोकी लाभली शोभली बरी ।
दृढदेहो निःसंदेहो संख्या चंद्रकला गुणें ॥१६॥
रामदासीं अग्रगण्यू कपिकुळासि मंडणू ।
रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती ॥१७॥
॥इति श्री रामदासकृतं संकटनिरसनं नाम ॥

गुरुवार, २९ मार्च, २०१८

कौतुकाची थाप महापुरुषाची

विवेकानंद जन्मोत्सव २०१७ चे उत्कृष्ट वृत्तलेखन व प्रसिद्ध केल्याबद्दल विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले.

सन्मान लेखणीचा

रामकृष्ण मठ पुणे चे अध्यक्ष श्रीकांतानंदजी महाराज यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.

विवेकानंद आश्रमात महावीर जयंती साजरी


संपूर्ण जगाला शांती आणि त्यागाचा तसेच भूतदयेच्या माध्यमातून जगा आणि जगू दया हा मौलीक संदेश देणारे भगवान महावीर असून संपूर्ण जगात शांती आणि सहिष्णुता निर्माण व्हावी यासाठी जितेंद्रीय ठरलेल्या भगवान महावीरांची जयंती विवेकानंद आश्रमात अत्यंत भक्तीभावाने गुरुवारी (दि.२९) मार्च रोजी साजरी करण्यात आली. निष्काम कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजांच्या समाधी समोरील वाटीकेत असलेल्या महावीरांच्या पुतळयाचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले. सकाळी परिसरातील स्वच्छता करण्यात येवून उपस्थित भाविकांनी पूजन केले.
कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विश्वस्त नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,गोविंदराव गणगणे,बेलप्पा धाडकर ज्ञानेश्वर शेगोकार,सौ.मोनिका खत्री इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मंगळवार, २७ मार्च, २०१८

हिवरा आश्रमचा पाणीपुरवठा दहा दिवसांपासून बंद

संबंधित इमेज
० विद्युत पुरवठाखंडित झाल्याचा परिणाम,लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
येथील नळयोजनेचा पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसापासून बंद झाल्यामुळे पाण्याअभावी नागरीकांचे कमालीचे हाल होत आहे. भर उन्हाळयाच्या दिवसामध्ये नागरीकांची पाण्यासाठी होणारी भटकंती नित्याची झाल्याचे दिसून येत आहे. नागरीकांना भर उन्हाळयात पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असले तरी संबंधीत विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. वीज वितरण कंपनीने हिवरा आश्रम येथील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे ऐन उन्हाळयाच्या काळात पाण्याच्या समस्येला नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. 
उन्हाळयाच्या दिवसामध्ये रात्री कमालीचा उकडा जाणवत आहे. मात्र पाण्या अभावी घरातील  कुलर शोभेची वस्तु बनली आहे. दिवसभर काम करून रात्री विसावा घ्यायचे ठरविले तरी गर्मीमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहे.
वीज कंपनीचे ग्रामपंचायतीकडे पैसे थकल्यामुळे हिवरा आश्रम गावाचा पाणीपुरवठाचा योजनेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. ग्रामपंचायतीकडे वीज कंपनीचे चार लाख थकीत आहे तर ग्रामपंचायतचे वीज कंपनीकडे पावने दोन लाख रूपये थकीत आहे. त्यामुळे येथील जनता दोघांच्या भांडणामध्ये पाण्याविना भरडली जात आहे. वीज वितरण कंपनीकडील पावने दोन लाख वळती करून विद्युत पुरवठा सुरू करावा अशी मागणी सरपंच सौ.निर्मला डाखोरे यांनी केली. वीज कंपनीने गेल्या दहा दिवसापासून विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे नागरीकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. आमदार डॉ.संजय रायमूलकर यांनी या मुजोर कनिष्ठ अभियंत्याकडे लक्ष देवून हिवरा आश्रम गावाचा पाणी पुरवठा खंडीत विद्युत पुरवठा त्वरीत जोडून द्यावा अशी मागणी नागरीकांमधून जोर धरीत आहे.

घरातील पाणी साठवण कमी झाल्यामुळे नागरीकांना चारशे ते पाचशे रूपयाचे पाणी विकत घ्यावे लागत असून यामुळे नागरीकांची मोठया प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. तरी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरु करण्यात यावा.
                                             रामेश्वर घटमाळ नागरिक हिवरा आश्रम

उन्हाळयाच्या दिवसामध्ये गृहिणींना पापड,शेवाळया,खारोडया,कुरडया कराव्या लागत आहे. यासाठी मोठया प्रमाणात पाणी साठवणाची आवश्यकता असते मात्र हिवरा आश्रम येथे गेल्या दहा दिवसापासून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गृहिनींच्या कामाला ब्रेक मिळाला आहे.
                                                                              सौ.अरूणा समाधान म्हस्के गृहिणी हिवरा आहे

हिवरा आश्रम ग्रामपंचायतीचे ३३ केव्ही सबस्टेशनकडे पाणीपुरवठा थकित बाकी पावने दोन लाख असून वीज वितरण कंपनीने वळती करून पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करावा. जेणे करून हिवरा आश्रम येथील नागरीकांची गेल्या दहा दिवसापासून पाण्यासाठी होणारी भटकंती थांबले.
                                                                             सदाशिव म्हस्के,ग्रामविकास अधिकारी हिवरा 

सोमवार, २६ मार्च, २०१८

उन्हाळयात जेष्ठांनी आरोग्याबाबत ठेवावी जागरूकता !

उन्हाळ्यामध्ये जेष्ठ नागरिकांना आरोग्याशी सबंधित विविध त्रासाला सामोरे जावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी त्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वेळेवर व संतुलित आहार घेतल्यास त्रासावर नियंत्रण मिळविता येऊ शकते.
उन्हाळयाची दाहकता सर्वांना नकोशी असते. जेष्ठांसाठी तर उन्हाळा शारीरीक कारणामुळे अधिक त्रासदायक होतो. उन्हाळा हा ब-याच आरोग्य समस्यांचे मूळ हे मुळ आहार व पचन संस्थेत होणा-या बदलातून दिसून येते. या काळात जेष्ठांच्या पित्तामध्ये वाढ होते. उन्हाळयात उष्णतेत वाढ होवून शरीरातील व आतडयातील स्निग्धता कमी होते. त्यामुळे उन्हाळयात जेष्ठांनी शक्यतो पचनास कठीण असे अन्न घेणे टाळावे. या काळात जेष्ठांच्या शरीरातील पाण्याची गरज वाढत असल्यामुळे जेष्ठांनी जास्तीत जास्त पाणी प्यावे. मनुष्याच्या आहारातील प्रथिने,कर्बोदके,स्निग्ध पदार्थ,जीवनसत्वे,मिनरल्स आणि पाणी हे प्रमुख अन्नघटक आहेत. बदलत्या ॠतुनुसार जेष्ठांनी योग्य आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जेष्ठांनी उन्हाळयातील आहाराबाबत योग्य ती काळजी घेतल्यास उन्हाळयातही जेष्ठांचे उत्तम आरोग्य राहते.
उन्हाळयामध्ये जेष्ठांना उन,गरमी,धूळ,धाम,थकवा याशिवाय एलर्जी सोबत त्वचेचे आजार,डोळयाचे आजारात सुध्दा वाढ होत असल्यामुळे जेष्ठांनी उन्हाळयामध्ये आपल्या आरोग्याबाबत अधिक जागृक राहण्याची गरज असते. जेष्ठांनी उन्हाळ्यात संत्रेमोसंबीकिलगडखरबूजअंगूरआंबाअशा रसयुक्त फळांचा आहारात समावेश करावा. जेष्ठांनी दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे.  आहारात साहजिकच हलके अन्न घ्यावे व एका वेळी जास्त आहार घेण्यापेक्षा थोडय़ा थोडय़ा वेळाने कमी आहार घ्यावा. उन्हाळयामध्ये सुका मेवाअंडीमसालेदार पदार्थचाटमांसाहारी अन्न टाळावे.

उन्हाळ्यातील असा घ्यावा आहार
उन्हाळयात  सूर्याच्या उष्णतेत वाढ झाल्यामुळे शरीरातील व आतडय़ातील स्निग्धता नष्ट होते. त्यामुळे जेष्ठांनी कुठलाही या ऋतुंमध्ये जड अन्न  घेणे शक्यतो टाळावे. उन्हाळयात शरीरात पाण्याची पातळी कमी झाल्याने पाण्याची गरज वाढते. जेष्ठांनी उन्हाळयामध्ये दुध,दही,ताक,लस्सी यांचा वापर आहारामध्ये करावा. उन्हाळयामध्ये आहारात भात,भाकरीचा समावेश करावा.फ्रिजमधील अतिथंड पाणी पिणे शक्यतो टाळावे.

उन्हाळ्यातील आजार 
उन्हाळ्यातील प्रामुख्याने पुढील आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. यामध्ये  उष्माघात जंतुसंसर्ग डायरियाडिसेंटड्ढीकावीळटायफॉईड,डोळ्यांचे आजार, कंजक्टिव्हायटीस,त्वचेचे आजारमूतखडालघवी मार्गाचा जंतुसंसर्ग हे आजार उन्हाळयामध्ये जेष्ठांना उदभवतात.

जेष्ठांनी उष्माघातापासून संरक्षणासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. उन्हाळयामध्ये सुती कपडे वापरावीत. जेष्ठांना आपल्या आरोग्यात कुठल्याही प्रकारचा बिघाड वाटलास वैद्यकिय सल्ला घ्यावा.
                                 डॉ.गजानन गि-हे वैद्यकिय अधिकारी विवेकानंद आश्रम

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळयाची सांगता


राज्याच्या कानाकोप-यातून हजारो भाविकांची उपस्थिती

जीवंत देवाची उपासना हीच खरी उपासना आहे. रंजल्या गांजल्या,दीन दुःखीतांच्या जीवनातील अज्ञान,दुख दुर करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळयाची सांगता हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण करून  रविवारी (दि.२५ ) करण्यात आली. सकाळी सात वाजता प्रभू श्रीराम व कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या प्रतिमेची फुलांनी सजविलेली पालखी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त नारायण भारस्कर,दयानंद थोरहाते यांनी आपल्या खांदयावर घेवून विवेकानंद नगर ग्राम फेरीस प्रारंभ झाला. यावेळी पालखी सोहळयामध्ये पंचक्रोशीतील दिंडया सहभागी झाल्या होत्या. टाळ,मृदंगाच्या सुमधूर निनाद.... जय ब्रम्हरूपा...जय ब्रम्हरूपा... च्या घोषाने यावेळी आसमंत निनादून गेला.या पालखी सोहळयात हजारो स्त्री पुरूष उत्साहाने सहभागी झाले होते. विवेकानंद नगरीत कर्मयोगी संत शुकदास महाराज व प्रभू श्रीराम पालखीचे सुवाशिनीनी पुजन व दर्शन घेतले.यावेळी प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढण्यात आल्या होत्या. सकाळी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधीचा विधीवत वेदमंत्रोच्चारात अभिषेक,पुजन व आरती करण्यात आली. सकाळी १० ते २ वाजेपर्यंत श्रीश्रीश्री १०००८  स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज  यांची सुश्राव्य संगीत श्रीराम कथा संपन्न झाली. श्रीराम कथा श्रवनासाठी यावेळी राज्यभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दुपारी ३ ते ६ वाजता महाप्रसादाचे वितरण मुंबई येथील उदयोजक एकनाथ दुधे,भारती महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वस्त्रउदयोग मंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर,अमरावजीचे उपजिल्हाधिकारी आर.डी.काळे, भाजपाच्या जेष्ठ नेत्या श्रीमती मंदाकिनी कंकाळ,भाजपाचे जेष्ठ नेते सुरेशआप्पा खबुतरे, हभप प्रकाशबुवा जवंजाळ तथा आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. हजारो भाविकांना महाप्रसाद वितरणाने कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधीसोहळयाची सांगता करण्यात आली. गतवर्षी श्रीरामनवमी पर्वावर कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्री समाधीस्त झाले होते वर्षपूर्तीनिमित्ताने श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून रविवारी (दि.२५ मार्च) रोजी कथेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या हजारो उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.संध्याकाळी ६  ते  वेदांताचार्य हभप गजाननदादा शास्त्री महाराज यांचे प्रवचन तर रात्री ८ ते १० पुणे येथील सुप्रसिध्द कीर्तनकार हभप अशोक महाराज जाधव यांचे कीर्तन संपन्न झाले. या  सोहळयाच्या यशस्वीतेसाठी आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये,अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त नारायण भारस्कर,पुरूषोत्तम आकोटकर,कैलास भिसडे,अशोक गि-हे,अ‍ॅड किशोर धोंडगे,प्राचार्य डॉ.सुभाष कालवेअनुप शेवाळे,पंढरीनाथ शेळके,हभप निवृत्तीनाथ येवले महाराज,हभप विष्णु थुट्टे महाराजे,प्रा.मधुकर आढाव,कार्यकर्ते शिवदास सांबपूरे,संजय भारती,गंगाधर निकस,राजेद्र आव्हाळे,अनंत जवजाळ,एकनाथ सास्ते,प्रमोद सावरकर,विवेक दळवी तथा आश्रमाचे कार्यकर्ते,भाविक भक्त इत्यादीनंी अथक परिश्रम घेतले.

शनिवार, २४ मार्च, २०१८

कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजश्रीच्या संजीवन समाधीच्या प्रसंगी उकळी येथील शिक्षक कृष्णा सासवडकर यांनी रांगोळी द्वारे साकारलेली महाराजश्रींची अप्रतिम व हृदयाचा ठाव घेणारी कलाकृती..https://m.facebook.com/story.php?story_fbid=1647178608705396&id=100002398198671

कर्मयोगी संत शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळयाची विवेकानंद आश्रमात आज सांगता


भाविकांना होणार महाप्रसादाचे वितरण, श्रीराम कथेने होणार समारोप

कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांचा प्रथम संजीवन समाधी सोहळ्याची रविवारी (दि.२५) रामनवमी रोजी राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता होत आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या संजीवन सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक विवेकानंद आश्रमात दाखल झाले आहे. विवेकानंद आश्रमच्या वाटिकेत असलेल्या कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी व  आजच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून हजारो भाविक आश्रमात दाखल झाले असून प्रत्येकजण महाराजांच्या आठवणीने भावूक बनला आहे. विवेकानंद आश्रमात कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या संजीवन समाधी सोहळया निमित्ताने संगीत श्रीराम कथेचे दि.२२ मार्च ते २५ मार्च पर्यंत आयोजन सुध्दा केले होते. या श्रीराम कथेचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
गतवर्षी रामनवमीला महाराज समाधीस्त झाले होते त्याक्षणाला आज वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त दि.२२ पासून स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती यांच्या संगीत श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले होते. आज कथेचा समारोप होत आहे. आज सकाळी १० ते २ वाजेपर्यंत श्रीराम कथा होणार असून कथेनंतर भाविकांना महाप्रसादाचा वितरण केल्या जाणार आहे. साडेचार ते सहा यावेळेत हभप गजानन शास्त्री पवार महाराज जालना यांचे तर रात्री ८ ते १० हभप अशोक महाराज जाधव पुणे यांचे कीर्तन संपन्न होणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमाच्यावतीने करण्यात आले आहे.

महाप्रसादासही लोकांचा हातभार!
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजांनी वैयक्तीक खर्चासाठी संस्थेच्या तिजोरीतून एक रुपयाही घेतला नाही. उलटपक्षी रात्रंदिवस वैद्यकीय सेवा करून कष्टाचा पैसा संस्थेला दिला. भाविकांनी महाराजांच्या समाधीस्थ महानिर्वाणानिमित्त दिला जाणा-या महापंगतीचा खर्च उचलला आहे.

भाविकांच्या गर्दीने फुलला आश्रम
कर्मयागी संत प.पू.शुकदास महाराज संजवीन समाधी सोहळयानिमित्ताने आश्रमात विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम कथा श्रवणासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या गर्दीने विवेकानंद आश्रम फुलून गेला होता.

कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी ख-या अर्थाने स्वामी विवेकानंदांच्या विचारांची ग्रामीण भागात प्रचार प्रसार करण्याचे अलौकीक कार्य करून दीन दुखीतांच्या जीवनात आनंद फुलविला. विवेकानंद आश्रम व प.पू.शुकदास महाराजांवर नितांत प्रेम करणारे हजारो भाविक संजीवन समाधी सोहळयाठी दाखल झाले आहे.                                                                                                                                       शिवप्रसाद थुट्टे,रायपूर

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

स्वार्थाने विनाश अटळ-स्वामी हरिचैतन्यानंद महाराज

श्रीराम कथा अखिल मानव जातीसाठी कल्याणकारी आहे. कथेच्या श्रवणाने जीवनाला कल्याणाचा मार्ग सापडतो.विकार मानसाला विनाशाकडे घेवून जातात तर सदाचरणाने मनुष्य देवत्वापर्यंत पोहचू शकतो. स्वार्थ हा सदाचरणातील मोठा अडथळा प्रभू रामचंद्राला राज्यभिषकाऐवजी वनात पाठविण्याची योजना करणा-या कैकयीची मती स्वार्थाने कुंठीत झाली होती. स्वार्थाने कैकयी विवेकशून्य झाली होती. त्यामुळे रामाला वनवास प्राप्त झाला.स्वार्थ माणसाला अवनतीच्या कोणत्याही पातळीपर्यंत घेवून जातो व स्वार्थाने विनाश अटळ ठरतो असे भावपूर्ण चिंतन स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज यांनी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संजीवन समाधी निमित्त दि.२२ ते २५ मार्च विवेकानंद आश्रमात आयोजित संगीत रामकथेत आजच्या दुस-या दिवशी बोलतांना व्यक्त केले.
कथेसाठी परिसरातील भाविकांनी अलोट गर्दी केली असून आश्रम परिसर भक्तीरसात डबून गेला आहे. माणसाने कसं वागावं याचा आदर्शपाठ म्हणजे रामायण आहे, तर माणसं कसं वागतात ते महाभारतात पाहायला मिळतं. आदर्श राजा कसा असावा, असा प्रश्न विचारला की आजही रामासारखा, असं उत्तर येतं. रामराज्य यावं, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जातात. यावरून रामकथेचं महत्त्व अधोरेखित होतं. महाभारताची महाकाव्य म्हणून ओळख आहे. रामकथेच्या श्रवणाशिवाय जीवनाला परिपूर्णता नसून जीवनातल्या प्रत्येक वळणावर निर्माण होणा-या समस्येचे व दुःखाचे निराकरण रामकथेतूनच होते. रामायण जगण्याची दिशा देते. प्रत्येक नात्याशी वागण्याच्या जबाबदारीचे भान रामकथेतून मिळते. भारतीय समाज पुण्यवंत आहे कारण या देशातील लोकांचे आदर्श प्रभू रामचंद्र आहे हे विचारही त्यांनी आपल्या विवेचनातून व्यक्त केले.

लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम

मो ९९२३२०९६५८

गुरुवार, २२ मार्च, २०१८

शुकदास महाराजांचे अस्तित्व चैतन्यरूपाने भक्तांमध्ये - स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती


कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज नावाचे साधू देहरूपाने जरी आज आपल्या सोबत नसले तरी चैतन्यरूपाने ते आपल्यामध्येच आहे. महाराजांचे जीवन अनुभूती संपन्न होतेपरमपुरूषार्थयुक्त होते कारण साधुत्व हा मानवजीवनाचा परमपुरूषार्थ असे भावपूर्ण विचार श्रीश्रीश्री १००८ हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज यांनी विवेकानंद आश्रमात संपन्न होत असलेल्या संत शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळयानिमित्त आयोजित संगीत रामकथेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.२२) रोजी कथेला प्रारंभ करतांना केले.


बुधवार, २१ मार्च, २०१८

ध्यानदृष्टीद्वारे पू. शुकदास महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येते!


स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती यांचे प्रतिपादन,संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आजपासून संगीतमय श्रीराम कथा

कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी शरीर त्यागले असले तरीध्यानदृष्टीद्वारे अंतरंगात त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती घेता येतेअसे प्रतिपादन श्री श्री १००८ स्वामी हरिचैतन्यानंदजी सरस्वती महाराज यांनी केले. आज महाराज शरीररुपाने नसले तरीत्यांचे आत्मरुप महाचैतन्य विवेकानंद आश्रमाद्वारे जीवांच्या सेवेचे कार्य करतच राहीलअसा आशावादही स्वामीजींनी व्यक्त केला. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या समाधीस्थ महानिर्वाणास रामनवमी रोजी वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्त विवेकानंद आश्रमाच्या वतीने चार दिवशीय संजीवन समाधी सोहळा आयोजित केला असूनया सोहळ्याची सुरुवात आज दिनांक २२ मार्च रोजी स्वामी हरिचैतन्यानंदजी सरस्वती यांच्या संगीतमय श्रीरामकथेने होत आहे. या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बुधवार(दि.२१) रोजी ते बोलत होते. सोहळा काळात महाराजश्रींच्या समाधीचे दररोज मंत्रोपच्चारात पूजन होणार असूनराज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी समाधी दर्शन खुले राहणार आहे.

पुढे बोलतांना स्वामी हरिचैतन्यानंदजी म्हणालेत्यांच्याशी माझा आध्यात्मिक व स्नेहाच्या पातळीवर संबंध आला. एकमेकांशी संवाद साधताना त्यांना दुःखीपीडितांच्या सेवेचीच काळजी असायची. समाजाच्या सेवेसाठी त्यांनी देह अक्षरशः चंदनासारखा झिजविला. अध्यात्मिक पातळीवर अत्युच्च शिखरावर पोहोचलेले ते महान संत होते. आज ते शरीररुपाने नसले तरी विवेकानंद आश्रमाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन ते आपले कार्य करूनच घेत राहतीलअसेही स्वामी हरिचैतन्यानंदजी सरस्वती म्हणाले.

संपन्न होणारे कार्यक्रम
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज समाधी सोहळयानिमित्त दि.२२ ते २४ मार्च पर्यंत दुपारी १ ते ५ वाजे पर्यंत स्वामी हरिचैतन्यानंदजी यांची संगीतमय श्रीरामकथा पार पडणार असूनरामनवमी रोजी सकाळी ११ ते ३ दरम्यान हा कथा सोहळा होईल. या शिवाय चारही दिवस राज्यभरातील ख्यातनाम कीर्तनकारांच्या कीर्तन सोहळ्याचेही रात्री ८ ते १० वाजे दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पैठण येथील हभप. बाजीराव महाराज जवळेकरपंढरपूर येथील प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर व हभप. गोविंद महाराज चौधरी आणि वेदांताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री या कीर्तनकारांचा समावेश आहे. या शिवायदररोज सकाळ व संध्याकाळी प्रार्थनाआरतीअनुभूती चिंतन यांचेही आयोजन करण्यात आलेले आहे.

सोमवार, १९ मार्च, २०१८

काचबिंदूच्या मार्गदर्शनासाठी जेष्ठांना 'जेष्ठ नागरिक' ची मदत


दोनशे जेष्ठ नागरिकांनी घेतला लाभ, सामाजिक उपक्रम फायदेशीर ठरणारा 

मेहकर येथील जेष्ठ नागरिक संघ व डॉ.प्रशांत दिवठाणे यांनी जेष्ठांना प्रोजेक्टरद्वारे काचबिंदू बाबत मोफत मार्गदर्शन केले. जवळपास २०० नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.त्यांचा हा सामाजिक उपक्रम जेष्ठांसाठी फायदेशीर ठरणारा आहे.

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

विवेकानंद आश्रमाच्या संपर्कयात्रेस प्रारंभ


संपर्कयात्रेचे ठीकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत,१८ गावांत प्रार्थना मंडळाची स्थापना
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विवेकानंद आश्रमाच्या वतीने काढण्यात आलेल्या संपर्कयात्रेस समाधीस्थळाचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली.

गुरुवार, १५ मार्च, २०१८

संजीवन समाधी सोहळ्या निमित्त निघणार संपर्कयात्रा


कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळ्या निमित्त विवेकानंद आश्रमाच्या वतीने संपर्कयात्रा काढण्यात येणार आहे. दोनशे गावांतून ही संपर्कयात्रा फिरणार असून  वेदांताचार्य, रामायणाचार्य ह.भ.प. गजाननदादा शास्त्री हे संपर्कयात्रेचे नेतृत्व करणार आहे.
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या संजीवन महानिर्वाणास येत्या रामनवमी दि.२५ मार्च रोजी वर्षपूर्ती होत आहे.

सोमवार, १२ मार्च, २०१८

हिवरा आश्रमचा जेष्ठ नागरीक बनला योगप्रचारक !


ग्रामीण भागात देतात योग शिबीराचे धडे,
 
 सेवानिवृत्ती नंतर अनेक जेष्ठ नागरीक सुटकेचा निःश्वास घेत आपले उर्वरित आयुष्य घर व नातवंडाचे संगोपन करण्यात धन्य मानतात. मात्र आज सुध्दा समाजातील अनेक जेष्ठ नागरीक सेवानिवृत्ती नंतर सामाजिक बांधिलकी जपत समाजाच्या सेवेसाठी,उत्कर्षासाठी आपले उर्वरित आयुष्य घालवितात. याचा प्रत्यय हिवरा आश्रम येथील सेवानिवृत्त जेष्ठ नागरीक बाजीराव विठ्ठलराव इंगळे यांच्याकडे पाहल्यानंतर येतो. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या सानिध्यात त्यांना योगासने करण्याची आवड निर्माण झाली. जेष्ठ नागरीक असलेल्या नाना उर्फ बाजीराव इंगळे हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून अव्याहतपणे योग व प्राणायाम प्रसार प्रसाराचे काम करीत आहे. जेष्ठ नागरीक असलेल्या बाजीराव इंगळे यांनी बुलडाणा,वाशिम,अकोला या ठिकाणी विविध योग व प्राणायाम शिबीराच्या माध्यमातून मोठे काम केले आहे. आतापर्यंत त्यांनी चारशे ते पाचशेहून अधिक शिबीर घेतले आहे. आठ ते दहा हजार नागरिकांना त्यांच्या योग प्राणायाम शिबीराचा लाभ होऊन अनेकांच्या आरोग्याच्या समस्या दूर झाल्या. भारतीय योगविद्येचा प्रसारासाठी सेवानिवृत्ती नंतर पहिले प्राधान्य देत योगशिबीराच्या माध्यमातून नागरीकांना निरोगी आरोग्यासाठी योग प्राणायाम करण्याचा सल्ला देत आहे.
बाजीराव इंगळे हे मूळ सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डाचे- बालपणापासून शरीरसौष्ठवाची आवड असल्यामुळे पुढे कुस्ती खेळण्याकडे वळे.
भारतात ५००० वर्षापूर्वी सुरू झालेल्या योगपरंपराचा आता जगात मोठया प्रमाणात प्रचार झाला आहे.
योग व प्राणायामामुळे प्राण शक्ती व जीवन उर्जा नियंत्रणास मदत मिळते.

योग प्राणायामाच्या नियमीत सरावाने शरीर ,मन व आत्मा सुत्रबध्दता निर्माण होवून निरोगी आरोग्य टिकविण्यास मदत मिळते. शिबीरातील शिबीरार्थीच्या जीवनात आनंद निर्माण होवून ताणतणावाचे प्रमाण कमी होवून रोगप्रतिकार शक्तीत,सहनशक्ती वाढून आरोग्यदायी अनुभव येतो.
नाना इंगळे जेष्ठ योगप्रचारक हिवरा आश्रम 

योग प्राणायामाचे फायदे
प्रत्येकाने नियमीत योग व प्राणायामाचा सराव केल्यास शरीर व मन संतुलीत होते.योगासनाच्या सरावाने शरीर निरोगी व सदृढ होण्यास मदत होते.प्राणायामाच्या नियमीत सरावाने मनुष्याचे शरीर व मन दोन्ही संतुलित राहते. प्राणायामामुळे शरीरातील  ८० टक्के विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. प्राणायाम मुळे चयापचय सुधाररून वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने चेह-यावर तेज येते. प्राणायामामुळे पोटविकार,अपचन,गॅसेस इत्यादी दूर होतात. याशिवाय रक्तदाब सुध्दा नियंत्रित होतो.हदयमज्जासंस्था बळकट होते.फुफ्फुसे निरोगी होतात.एकाग्रता व स्मरणशक्ती वाढते.

लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

रामनवमीला कर्मयोगी संत प .पू. शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळा

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

तन मनाच्या सदृढतेने यशप्राप्ती- नायब तहसीलदार श्रीमती जायगुडे

बुधवार, ७ मार्च, २०१८

हिवरा आश्रम येथे भारतीय स्टेट बँकेच्या ए.टी.एम.मशीनचा शुभारंभ


आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांच्या हस्ते उदघाटन


मंगळवार, ६ मार्च, २०१८

प्रेरणादायी विचार जो जिंदगी बदल दे !

सोमवार, ५ मार्च, २०१८

मधूमेहावर जेष्ठांनी जागृकतेने करावे नियंत्रण !
  

रविवार, ४ मार्च, २०१८

मनाचे श्लोक- समर्थ रामदास स्वामी

सत्संग भाग ५


काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥

सत्संग भाग ४


संतांचा महिमा कोण जाणे सीमा । सीणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥
संतांची हे कळा पाहतां न कळे । खेळोनियां खेळ वेगळाची ॥२॥
संतांचिया पारा नेणें अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणे ॥३॥
नामा म्हणे धन्य धन्य भेट जाली । कल्पना निमाली संतापायीं ॥४॥

प्रस्तुत अभंगातुन नामदेव महाराज संताचे जीवन कार्य व त्यांची महती वर्णन करतात.संतसंगतीमुळेच सामान्यातील सामान्य व्यक्तीला स्व स्वरूपाचा अनुभव सहज घेता येतो. संताच्या संगतीचा महिमा किता आणि कसा वर्णवा ?  हा मोठा गहन प्रश्न साक्षात ब्रम्हदेवाला सुध्दा पडावा एवढा संताचा महीमा अगाध व गहन आहे. मनुष्याला संताचे महीमा उमजला तरी तो शब्दातीत असल्यामुळे वर्णन करता येवून शकत नाही.मायेच्या पलीकडे असणारे गुहय ज्ञान प्राप्तीचा मार्ग केवळ संताच्या  संगतीनेच कळू शकतो. संत मोक्षरूपी संपत्तीने सामान्यातील सामान्य मनुष्याला सुध्दा श्रीमंत बनवितात. संताच्या जीवन हे समाज उध्दारसाठी ,उत्कर्षासाठीच असते. नामदेव महाराज म्हणतात की, असे संताची भेट झाल्यस जीवन धन्य कृतार्थ होते. मनातील कल्पना ,व्देष,लोभ आपोआप नष्ट होऊन जातात.संताचे अतःकरण म्ळणजे आत्मस्वरूप जागृत करण्याचे उत्तमातील उत्तम साधनच होय. संगतीने आत्मसुखाची प्राप्ती होवू शकते.



लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८


सत्संग भाग ३


काळवेळ नाम उच्चारितां नाहीं । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥
रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥
हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या दैवाची कोण वानी ॥
ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ॥

भगवत प्राप्तीची जी अनेक साधने शास्त्रांनी सांगीतलेली आहेत त्यांत स्थळ ,काळ ,शुची अर्थात पवित्रता इ.नियमाचे अत्यंत काटेकोरपण पालन करावे लागते.परंतु भगवंताच्या नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे काळ वेळेचे बंधन नाही.
भगवंताच्या नामाचे अखंड चिंतन,नामस्मरण केल्यामुळे मुनष्याला खर्‍या अर्थाने मानसिक शांती ,समाधान मिळते. आजचा काळ हा अत्यंत धकाधकीचा आहे. मनाचे संतुलन राखण्यासाठी मनशांती सुध्दी भगवंताच्या नामाचा जप करणे आवश्यक आहे. भगवंताच्या नामाचा जप ,उच्चारण करण्याकरीता कुठल्याही काळ,वेळेचे बंधन नाही . नाम घेतांना चित्त एकाग्र असणे आवश्यक आहे.भक्ताने शुध्द अंतःकरणात केवळ भगवंताच्या उच्चारण केले तरी पुरेसे आहे. कोठेही नाम घेतले तरी ते त्याच्यापर्यंत पोचणारच.जेथे उठे ङ्कमीङ्कचे स्फुरण तेथे म्हणा विठ्ठल विठ्ठल असा तुकाराम महाराजांचाही उपदेश आहे.भगवंताच्या नामाच्या उच्चाराणे अनेक भक्त उध्दरले.आपल्या जिव्हेव्दारे जो भक्त अखंड नामजप करतो त्याच्या  दैवाला पारावार राहत नाही. ज्ञानेश्वर माऊली भक्ताला मार्गदर्शन करतांना सांगतात की,हया नामजपाने वैकुंठाचा मार्ग सहज सोपा होतो. म्हणून भक्तांने रात्रदिंनी केवळ भगवंताच्या नामाचे चिंतन,स्मरण,करावा असा मौलीक संदेश माऊली देतात. भगवंत स्थळ आणि काळ यांच्या पलीकडे आहे. त्याची सहज आणि अखंड अनुभूती घेण्यासाठी नामासारखे साधन नाही.


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८