अल्पभुधारकांनी घेतले काकडीचे विक्रमी उत्पादन




जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम...तिथे अन्न होऊन ठाकेल शाम...दिसे सावळे रूप त्याचे शिवारी...जिथे राबती हात तेथे हरी...संतांची वेळोवेळीसमाजाच्या मनावर श्रममूल्य रुजविले. घामाच्या धारांनीच आर्थिक उत्कर्ष होतो म्हणून कष्टाशिवाय जीवनात पर्याय नाही. जिद्द ,चिकाटी, मेहनतीसोबत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञाना वापर केल्यास कमी खर्चात शेतीमधून चांगले व भरघोस उत्पन्न घेता येते. याचाच प्रत्यय सिंदखेडराजा तालुक्यातील बाळसमुद्र येथील अल्पभुधारक शेतकरी अरूण पशराम मेरत यांनी पॉली हॉऊस मध्ये काकडीचे विक्रमी उत्पन्न घेतले असून आपला उत्पादित मालाची थेट ग्राहकापर्यंत विक्री करूनआपला आर्थीक उत्कर्ष साधला आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी नाविन्यपूर्ण व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराकडे वळल्याचे विधायक  चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी पारंपारीक पिकांवर विसंबून न राहता शेतीत नवनवीन प्रयोग करून आपली आर्थिक प्रगती साधत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी अरूण मेरत यांनी आपल्या शेतातील दहा गुंठामध्ये पॉली हाऊस उभारून त्यामध्ये काकडीची विक्रमी उत्पादन घेतले आहे. अरूण मेरत यांनी या वर्षी मल्चींग पेपरचा वापर करुन दहा गुंठयात नामधारी जातीच्या काकडीची  लागवड केली. त्यातून त्यांना आतापर्यंत ५० ते ६० हजाराचे उत्पन्न मिळाले अजून एक ते सव्वा  लाखापर्यत उत्पन्न होईल असे दैनिक सकाळीशी बोलतांना सांगीतले. अरूण मेरत आपल्या शेतातील काकडीची विक्री स्वतः बाजारात करीत असल्यामुळे एक क्विंटल मागे दोन ते अडीच हजाराचा नफा मिळत आहे. त्यांनी दहा गुंठयाच्या पॉली हॉऊस मध्ये काकडीचे उत्पादन घेण्याचे ठरविले. शेतीची मशागत करून व सेंद्रिय खताचा छिडकाव केला. त्यावर नामधारी ४६ कंपनीची काकडीचे बियाणे फेब्रुवारी महिन्यात लावले. दोन वाफयातील अंतर चार फुट असून चार बाय दिड फुड अंतरावर काकडीचे बियाणे लावण्यात आले. पाण्याचा योग्य वापर करावा म्हणून ठिबक सिंचनाचा उपयोग केला. सद्या ठिबक सिंचनामुळे दहा गुंठयातील काकडीचे पिक जोमात आले असून वेलीला जागोजागी काकडया लागल्या आहेत. सद्यस्थितीत काकडीचे पीक दोन महिन्यांचे झाले असून त्याला यामधून १० टन काकडीचे उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वीस दिवसांमध्ये त्यांना साडेतीन टन काकडीचे उत्पादन झाले. एक ते सव्वा लाख उत्पन्न होईल.

ग्राहकांपर्यंत काकडीची थेट विक्री
अरूण मेरत हे आपल्या शेतातील काकडीची विक्री दुसरबीड,सुलतानपुर,शेंदुरजन,साखरखेर्डा,मेहकर,हिवरा आश्रम,अमडापूर,खळेगांव,अंढेरा,उंद्री व लोणार या येथीलबाजारात विक्री करतात.

दैनिक सकाळमधून प्रकाशीत होणा-या कृषी यशोगाथामुळे पारंपारीक शेतीला फाटा देवून आधुनिक पध्दतीने शेती करण्याचे ठरविले. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची मदत मिळाल्याने शेतीतून काकडीचे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले.
                                                                                          अरूण मेरत शेतकरी बाळसमुद्र


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

1 टिप्पणी: