undate news 2019 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
undate news 2019 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'विवेकानंद कृषी' च्या गोपालसिंग राजपूतला क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक




येथील कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षात शिक्षण घेणा-या गोपालसिंग रंगनाथसिंग राजपूत यांने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विभागावर व्दितीय क्रमांक संपादन करून रौप्य पटकावले.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे  ता.२३ सप्टेंबर रोजी आयोजीत आंतर महाविद्यालयीन विभागस्तरीय धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या आंतर महाविद्यालयीन विभागीय स्तरीय २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांने व्दितीय क्रमांक प्राप्त करून रौप्य पदक तर ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून कांस्यपदक प्राप्त केले. गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांने २५ सेकंदात २०० मीटरची शर्यत पूर्ण करून रौप्य पदक पटकावले. तर .०२ मिनीटात ४०० मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. आपली सर्वश्रेष्ठ व्यक्तिगत कामगिरी नोंदवत अंतिम फेरी गाठली होती.
गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांची तयारी विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्रा.रवींद्र  काकड,जिमखाना प्रमुख प्रा.शिवशंकर काकडे,प्रा.गजानन ठाकरे  यांनी करून घेतले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहातेसचिव संतोष गोरेसहसचिव विष्णुपंत कुलवंतआत्मानंद थोरहातेविवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवेकृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


४०० मीटर स्पर्धेत कांस्यपदक
गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्याने ४०० मीटर धावण्याची स्पर्धा  १.०२ मिनीटात पूर्ण केली. ४०० मीटर धावण्याची स्पर्धेत या विद्यार्थ्याने कांस्यपदक पटकावले. विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत हा अश्वमेध स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

अश्वमेध स्पर्धेत ठरला पात्र 
विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांची धावण्याच्या २०१९ अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झाली आहे.लहानपणा पासून खेळाची आवड आवड असलेला गोपालसिंग या विद्यार्थ्यांने अनेक क्रीडा स्पर्धेत विजयी झाला आहे. मुंबई येथे २०१८ मध्ये पार पडलेल्या धावण्याच्या स्पर्धेत विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत हा अश्वमेध स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी गोपालसिंग राजपूत या विद्यार्थ्यांने  २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विभागावर व्दितीय क्रमांक संपादन करून रौप्य पटकावले. तर  ४०० मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. या विद्यार्थ्यांची अश्वमेध स्पर्धेसाठी सुद्धा प्राप्त ठरला आहे.
                                                                डॉ. सुभाष कालवे प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


नदीजोड प्रकल्पाने मिटणार २२ गावाचा पाण्याचा प्रश्न !


गेल्या काही वर्षात ग्लोबल वार्मिंगमुळे निसर्गचक्रात कमालीचा बदल होत आहे. पावसाची कमी होत जाणारी सरासरी हा सुध्दा चिंतेचा विषय बनला आहे. याचा फटका जिल्ह्यातील जलप्रकल्पाला सुध्दा बसत आहे. एकेकीकडे पेनटाकली पूर्ण भरला तर कोराडी प्रकल्प कोरडा आहेदि.११ १२ सप्टेंबरला पेनटाकळी प्रकल्पाचे दरवाजे ३० सेमी उघडले त्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या शेकडो हेक्टर पिकाची नासडी होवून जमीनी खरडून गेल्या होत्या मात्र याउलट कोराडी असून कोरडा असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा, पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत दिसून येत आहे. याकरीता पेनटाकळी धरणातील वाहून जाणारे पाणी दोन किलोमीटरच्या बोगद्यातून गजरखेड येथील महादेवाच्या खो-यात सोडल्यास ते कोराडी धरणात पोहोचू शकते. जलसंपदा विभागाने हा नदीजोड प्रकल्प हाती घ्यावा मेहकरसह २२ गावांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न सोडावा, अशी मागणी परिसरातील नागरीकामधून आता जोर धरू लागली आहे. नैसर्गिक गुरूत्वाकर्षणानेच हे पाणी दुष्काळग्रस्त कोराडी धरणात पोहोचणार असल्याने हा प्रकल्प कमी खर्चात पूर्ण होईल. आज रोजी दोन किलोमीटर अंतरावर पाणीच पाणी तर कोराडी धरण कोरडे, अशी विषम परिस्थिती निर्माण झाली आहे. या नदीजोड प्रकल्पास जिल्हयातील आजी-माजी नेत्यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. यापूर्वी २००८ मध्ये विवेकानंद आश्रमाचे संस्थापक पू. शुकदास महाराज यांनी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. पेनटाकळी धरणात पूरस्थिती निर्माण होत असल्याने पिकांची नासाडी होते शेतजमिनीचा खराबा होतो. शासनाला या नुकसानीपोटी कोट्यवधीची नुकसान भरपाई द्यावी लागते. हा नदीजोड प्रकल्प या नुकसान भरपाईपेक्षाही कमी रकमेच्या खर्चात पूर्ण होईल. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयेही वाचतील.

जलसंपदाने नदीजोड प्रकल्पासाठी घ्यावा पुढाकार
दि.११ १२ सप्टेंबरला पेनटाकळी प्रकल्पाचे दरवाजे ३० सेमी उघडले त्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला. यामुळे पैनगंगा नदीकाठच्या शेकडो हेक्टर पिकाची नासडी होवून जमीनी खरडून गेल्या होत्या मात्र याउलट कोराडी असून कोरडा असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा, पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याचे संकेत दिसून येत आहे. याकरीता पेनटाकळी धरणातील वाहून जाणारे पाणी दोन किलोमीटरच्या बोगद्यातून गजरखेड येथील महादेवाच्या खो-यात सोडल्यास ते कोराडी धरणात पोहोचू शकते. जलसंपदा विभागाने हा नदीजोड प्रकल्प हाती घ्यावा.

दुष्काळाच्या सावटाला बसेल आळा
निसर्गाच्या असमतोलाचा दिवसेंदिवस पावसाची सरासरी कमी होत असून सार्वत्रिक पावसाचे प्रमाण सुध्दा कमी झाले त्याचा फटाक जिल्ह्यातील जलप्रकल्पाला बसत असून काही जलप्रकल्प शंभर टक्के भरतात तर काही कोरडे. मात्र पेनटाकळीचे वाहून जाणारे पाणी कोराडी धरणात नदीजोड प्रकल्पाव्दारे जोडल्यास या परिसरातील सिंचनाचे क्षेत्र समृध्द होवून दुष्काळाच्या सावटाला आळा बसेल.


पावसाळयात पेनटाकळी धरणाचे ओव्हरफ्लोचे  वाहून जाणारे पूरस्थिती निर्माण करणारे पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे कोराडी धरणात सोडण्यात यावे, अशी संकल्पना २००६ मध्ये या परिसराच्या विकासाची दुरदृष्टी असलेले कर्मयोगी संत .पू. शुकदास महाराजांनी ती पूर्णत्वास येणे काळाची गरज आहे. हा नदीजोड प्रकल्प झाल्यास दुष्काळाचे सावट दुर होवून सिंचन क्षेत्राला लाभ होईल.
संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम.


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८