Responsive Ads Here

गुरुवार, ३१ मे, २०१८

विवेकानंद आश्रमाच्या सेवाकार्यावर प्रेम करणारा लोकनेता



रंजल्या गांजल्या व व्याधीग्रस्तांसाठी संपूर्ण जीवन सर्मपीत करून शिव भावे जीव सेवेचा मंत्र अंगिकारणा-या... दीड कोटीहून अधिक रूग्णांना व्याधीमुक्त करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज व विवेकानंद आश्रमाव्दारे सुरू असलेले मानवसेवेच्या  सेवाभावी उपक्रमांविषयी कृषी मंत्री भासाहेब फुंडकर यांना विशेष प्रेम व आपुलकी होती. विवेकानंद आश्रम व कर्मयोगी संत शुकदास महाराजांविषयी भासाहेब फुंडकर यांना निस्मिम प्रेम,आपुलकी व ओढ होती. विवेकानंद आश्रम भेटीचा योग आला की भासाहेब तासनतास विवेकानंद आश्रमात हरवून जात असत. विवेकानंद आश्रम सदिच्छा भेटी प्रसंगी विविध मानवसेवेच्या उपक्रमांना भेट देवून ते आस्थेवाईकपणे चौकशी करीत असत. कर्मयोगी संत शुकदास महाराज यांच्या भेटीसाठी ते न चुकता विवेकानंद आश्रमात येत असत. सदिच्छा भेटी दरम्यान कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज व भासाहेबांमध्ये महाराजांच्या अनिवासी यांचा निवासस्थानी  विविध विषयांवर चर्चा रंगत असे.
 शेती व शेतकरी यांचे जीवन उन्नत करण्यासाठी भाऊसाहेबांची असलेली तळमळ महाराजांना खूप आवडायची. भासाहेब म्हणजे शेतक-यांच्या समस्या निर्वाणासाठी सदैव तत्पर असलेला लोकनेता अशी भावनाही महाराजश्री नेहमीच बोलून दाखवित असत. ग्रामीण भागात कर्मयोगी संत शुकदास महाराज यांनी सुरू केलेल्या कृषी,शिक्षण,आरोग्य व आध्यात्माचे मानवसेवा उपक्रमांविषयी भासाहेबांना विशेष जिव्हाळा होता. रंजल्या गांजलेल्यांची सेवा व समाज सुशिक्षीत करण्याचे मोठे कार्य कर्मयोगी संत शुकदास महाराज व विवेकानंद आश्रम करीत असल्याचा भासाहेबांना अभिमान होता. एकदा भासाहेबांना पाठदुखीचा त्रास होत होता. तेव्हा त्यांनी महाराजश्रींकडे उपचार घेतला. त्या उपचारामुळे त्यांना आराम सुध्दा मिळाला होता. कृषी मंत्री असतांना भाउसाहेबांना नेहमी शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. कृषी मंत्री भासाहेब फुंडकर यांच्या जाण्याने बुलडाणा जिल्हासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पोरका झाला आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
मो.९९२३२०९६५८
श्रीनिवास विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा    

बुधवार, ३० मे, २०१८

जिंदगी कांटो का सफर है!!


जिंदगी कांटो का सफर है...हौंसला इनकी पहचान है...रास्तो पर तो सभी चलते है...जो रास्ते बनाये वही इंसान है...इयत्ता बारावीचे वर्ष म्हणजे आयुष्याला कलाटणी देणार वर्ष... आपल्या स्वप्नांना आकार देण्याचा काळ...भविष्यातील पाहिलेले स्वप्न खर उतरविण्यासाठी अवितरत प्रयत्नांची पराकाष्ठा करायला व नवी उर्मी देणारा काळ..-छोट्या छोट्या गोष्टीमधून सतत काहीतरी नवीन शिकविणारा कालावधी...अशा महत्वपूर्ण काळात वडीलांची अचानक बिघडलेली तब्येत..त्यामुळे अभ्यास आणि काम अशा एकाचे वेळी दोण महत्वाच्या पडलेल्या जबाबदा-या...या काळात सुध्दा न डगमगता खंबीरपणे सामोरे गेलास... स्वतःला प्रतिकुल परिस्थितीत गुणवत्ता सिद्ध केलीस ... कौटुबिक जबाबदारी समर्थपणे पारपाडली...महेश तुला मिळालेले बारावीतील 74 टक्के गुण व यश निश्चितच कौतुकास्पद आहे.

विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळा तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल बुधवारी (दि.३०) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहिर झाला असून  कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये ओंकार सुदर्शन जाधव ८५ टक्के,सौरभ देव भारती भारती ८३ टक्के,कु.शिवकन्या दयानंद थोरहाते ८३ टक्के, विश्वास जानुसिंग राठोड ८१ टक्के,ओंकार जाधव यांने गणित विषयात विषयात ९७ व जीवशास्त्र विषयात ९१ तर सौरभ भारती याने गणित विषयात ९३ गुण तर कु.शिवकन्या थोरहाते हिने जीवशास्त्र विषयात ९४ गुण मिळवून यश प्राप्त केले आहे. विवेकानंद व्यवसायिक अभ्यासक्रम यामध्ये क्रॉप सायन्सचा निकाल ९० टक्के तर अ‍ॅटो इंजिनिअरींग शाखेचा निकाल ८४ टक्के तर एम.एल.टी शाखेचा निकाल ९० टक्के लागला तर कला शाखेचा ६९ टक्के असून यामध्ये अविनाश भानुदास विणकर ७९टक्के,कु.शिवानी गजानन गि-हे ७७ टक्के,कु.पुनम मधुकर नवले ७६ टक्के,विशाल बाजिसिंग मछले ७२ टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक ६२२ चा निकाल ८३ टक्के लागला असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे ,आत्मानंद थोरहाते,विष्णुपंत कुलवंत,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अणाजी सिरसाटउपप्राचार्य कैलास भिसडे,पर्यवेक्षक अशोक गि-हे,ए.एन.जामकर तसेच ज्युनिअर कॉलजच्या सर्व प्राध्यापकांनी गुणवंत विद्याथ्र्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.

गुरुवार, २४ मे, २०१८

विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्रा.डॉ.भानुदास भोंडे, प्रा.शिवशंकर काकडे नेट उत्तीर्ण


 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित  विवेकानंद कृषि महाविद्यालयातील  किटकशास्त्र या विभागात कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक डॉ.भानुदास नामदेव भोंडे व प्रा.शिवशंकर पांडुरंग काकडे यांनी भारतीय अनुसंधान कृषि परिषद अंतर्गत घेण्यात आलेल्या नीट या परिक्षेत यश संपादित केले.
ग्रामीण भागातील गोर गरीब, हुशार,होतकरू शेतक-यांच्या  मुलांना  कृषि शिक्षणाची संधी उपलब्ध होवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व त्यामाध्यमातून  त्यांचे जीवनमान उंचावून त्यांची आर्थीक प्रगती व्हावी म्हणून कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराजश्रीं हिवरा आश्रम येथे ग्रामीण भागात कृषीची दोन महाविद्यालये सुरू केली. विवेकानंद कृषि महाविद्यालयाने आतापर्यंत ग्रामीण भागातील शेतक-यांना शेतकरी मार्गदर्शन शिबीरे,कृषी चर्चा सत्रे , पिक लागवड तंत्रज्ञान,खते व पाणी व्यवस्थापन,किड नियंत्रण,तण नियंत्रण यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले आहे.विवेकानंद कृषी महाविद्यालयाचा फायदा अनेक शेतकरी बांधवाना झाला आहे.  विवेकानंद कृषि महाविद्यालय व विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातून आतापर्यत ग्रामीण भागातील  हजारो हुशार,होतकरू विद्यार्थ्यांनी  शिक्षण घेतले असून ते विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.
 प्रा.शिवशंकर काकडे व प्रा.डॉ.भानुदास भोंडे यांनी विवेकानंद कृषि महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून  ते याच कृषि महाविद्यालयात किटकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे हे विशेष.  यशाबद्दल विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,नारायण भारस्कर,प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी अभिनंदन केले.

नवी वाट रोजगाराची : अॅग्री बिझनेस व्यवस्थापन


कृषी क्षेत्रातील खते, बी-बियाणे, कीडनाशक, सिंचन आदी उद्योगांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कुशल उमेदवार लागतात. या उद्योग, व्यवसायात असलेला वाढता वाव लक्षात घेता कौशल्यपूर्ण उमेदवार घडविणारा एक वर्षाचा 'अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट' हा खास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स 'सिमॅसिस इंटरनॅशनल इंटरडिसीप्लिनरी लर्निंग सेंटर' (एसआयआयएलसी) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे. 
पुणे : कृषी क्षेत्रातील खते, बी-बियाणे, कीडनाशक, सिंचन आदी उद्योगांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात कुशल उमेदवार लागतात. या उद्योग, व्यवसायात असलेला वाढता वाव लक्षात घेता कौशल्यपूर्ण उमेदवार घडविणारा एक वर्षाचा 'अॅग्री बिझनेस मॅनेजमेंट' हा खास पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स 'सिमॅसिस इंटरनॅशनल इंटरडिसीप्लिनरी लर्निंग सेंटर' (एसआयआयएलसी) आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आहे. 
यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अभ्यासक्रमाविषयी परिपूर्ण माहिती देणारी विशेष कार्यशाळा शनिवारी (ता. 26) सकाळी 11 वाजता होणार आहे. 
या अभ्यासक्रमात कृषी तसेच इतर शाखेच्या पदवीधरांनाही प्रवेश घेता येईल. विद्यार्थ्यांमध्ये नोकरीसाठी आवश्‍यक कौशल्ये विकसित करणे, इंग्रजी संभाषण, व्यक्तिमत्त्व विकास या विषयांवर भर दिला जाणार आहे. "एसआयआयएलसी'च्या पुण्यातील बाणेर रस्त्यावरील सकाळनगरमधील अद्ययावत संकुलात हा अभ्यासक्रम घेतला जाणार आहे. 
सविस्तर माहितीसाठी संपर्क - 9146038032 
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये 
►नामांकित उद्योगांतील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन 
►कृषी उद्योगात आठ महिने ऑन जॉब ट्रेनिंगद्वारे कामाचा अनुभव 
► विविध फील्ड व्हिजिटद्वारे शेतीसंबंधी व्यवसाय, उद्योग अभ्यासण्याची संधी 

►नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारा नोकरीच्या संधी

साभार :सरकारनामा 

बुधवार, २३ मे, २०१८

टाकाऊ लाकडापासून काष्ठशिल्प २

टाकाऊ लाकडापासून काष्ठशिल्प १

माती परीक्षण गरज,फायदे व कसे करावे माती परीक्षण

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मोफत माती परीक्षण २

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मोफत माती परीक्षण १

विवेकानंद आश्रम व इफकोचा स्तुत्य उपक्रम- उपविभागीय कृषि अधिकारी गिरी



शुकदास महाराज माती परिक्षण सप्ताहास प्रारंभ, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने होणार माती परिक्षण

माती परिक्षण ही काळाची गरज असून शेतक-यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मातीचे आरोग्य कोणत्याप्रकारे आहे हे समजून घेणे आवश्यक बनले आहे. विवेकानंद आश्रम व इफको चा मोफत माती परिक्षणाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून त्यामुळे परिसरातील शेतक-यांना मोठा लाभ होणार आहे असे प्रतिपादन उपविभागीय कृषि अधिकारी यांनी बुधवारी( दि.२३) रोजी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना केले.
विवेकानंद कृषि महाविद्यालयात आयोजित संत शुकदास महाराज माती परिक्षण सप्ताहाच्या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मेहकरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी गणेश गिरी यांच्या हस्ते झाले.  यावेळी प्रभारी तालुका कृषि अधिकारी विजय सरोदे व इफकोचे जिल्हा व्यवस्थापक कल्याण अटकळे हे होते तर अध्यक्षस्थानी विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे हे उपस्थित होते. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी दि. २३ मे बुधवार रोजी सुमारे शंभर शेतक-यांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने तपासणीसाठी आणले होते.

प्रभारी कृषि अधिकारी विजय सरोदे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले की, प्रत्येक शेतक-याने शेतीची कुंडली तयार करावी त्यात आपल्या शेतीचे आरोग्य जपावे. माती तपासणी नंतरच योग्य पिकांची निवड करून लागवड केल्यास उत्पादनात वाढ होईल. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी शासनाचा कृषि विभाग सर्वतोपरी प्रयत्नशील असून विवेकानंद आश्रमासारख्या सेवाभावी संस्थांनी या कामी पुढाकार घेवून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अर्चना बळी तर आभार प्रदर्शन प्रा.आकाश इरतकर यांनी मानले.

विवेकानंद आश्रम व इफको च्या वतीने परिसरातील शेतक-यांना अत्याधुनिक पध्दतीने मोफत माती परिक्षण करून दिले जाणार आहे.सात दिवस चालणा-या या मोफत माती परिक्षणाचा लाभ शेतक-यांनी घ्यावा.
                                   डॉ.सुभाष कालवे प्राचार्य,विवेकानंद कृषि महाविद्यालय

शेतक-यासाठी माती परिक्षण व तात्काळ रिपोट
विवेकानंद कृषी महाविद्यालयात दि. २३ मे ते २९ मे हा सप्ताह कर्मयोगी संत शुकदास महाराज माती परिक्षण सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून  मोफत माती परिक्षण करून तात्काळ रिपोर्ट दिले जात आहे.


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८





मंगळवार, २२ मे, २०१८

प्रतिभावंत साहित्यिक


शेतकरी

बळीराजा माझा
आहे कष्टकरी
उगवी भाकरी
माझ्यासाठी !

काळी आई त्यासी
खुप माया करी
फुटतसे उरी
हिरवाई !

कुंकवाचा धनी
जपते वायरी
तीही कष्ट करी
त्याच्यासवे !

झोक्याची ग दोरी
तुझ्यासाठी पोरी
नको फासावरी
लावू देवू !

कर्ज डोई वरी
तुच माफ करी
'देवा' दरबारी
माफी असे !

उगवतो सुर्य
रोज माथ्यावरी
तो ही कष्ट करी
तुझ्यासाठी !

लिहून घे पीक
सातबार्यावरी
त्याची पैसेवारी
त्यालाच दे !

गरिबी नको रे
ही दुनियेत
करावी हुशारी 
जगायाला !


राधिका देशपांडे. 
शेगांव. 

सोमवार, २१ मे, २०१८

डाक सेवकांनी संपात सहभागी व्हावे



केंद्र सरकारकडून ग्रामीण डाक कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग व कलेशचंद्र कमेटीचा अहवाल लागू करण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे  त्याकरीता ग्रामीण डाक सेवक आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी २२ मे पासून बेमुदत संपावर जात आहे. तरी २२ मे पासून सर्व ग्रामीण डाक सेवकांनी संपात सहभागी  व्हावे असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवा संघटनेचे विभागीय अध्यक्ष मोहन ढोणे यांनी केले आहे. अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे जनरल सेक्रेरेटरी एस.एस.महादेवय्या यांनी सातवा वेतन आयोग  व कमलेशचंद्र कमिटीचा अहवाल अद्यापही लागू न केल्यामुळे ३ मे २०१८ रोजी अनिश्चितकालीन संपाची नोटीस सरकारला दिली आहे असे बुलडाणा विभागाचे अध्यक्ष मोहन ढोणे यांनी एका निवेदनाव्दारे केले आहे. 
टपाल कार्यालयाचे नेटवर्क संपूर्ण भारतात पसरलेले आहे.शहरी आणि ग्रामीण भागात पसरलेले आहे. शहरामधील कायम स्वरूपी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग मिळाला.परंतु खेडयापाडया,ग्रामीण भागात,अतिदुर्गम भागात ज्या गावात रस्ता नाही कुठल्याही प्रकारच्या वाहनाची ये जाण्याची सुविधा नाही. अशा खेडयात ग्रामीण डाक सेवक आपली सेवा अत्यंत कमी पगारावर तात्काळ व चांगल्या प्रकारची सेवा पुरवितात. त्यांना त्या मोबदल्यात केवळ तीन ते पाच तासाचेच वेतन मिळते व त्या तुलनेत काम आठ तास करावे लागते. सरकार अशाप्रकारे ग्रामीण डाक सेवकांची पिळवणूक करीत आहे. सरकारला जाग येण्याकरीता व संप १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन अध्यक्ष मोहन ढोणे यांनी केले आहे. संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन सचिव पी.एस.झाडोकार, खजिनदार पी.व्ही.देशमुख, ए.पी.भानुसे, डी.ओ.पाटील, व्ही.एस.भानापुरे, डी.बी.केंदळे, सदाशिव काळे, राजेश पवार, अरूण पंडितकर, जगन्नाथ कंकाळ, संतोष काळे, सुभाष सवडतकर, भागवत वायाळ, दयानंद तायडे, शरद काळे यांनी केले.

उत्तुंग यशप्रातीसाठी ध्येय निश्चीत करा- प्राचार्य पंढरीनाथ शेळके



जेवढा मोठा पुरूषार्थ तेवढा माणुस मोठा होतो,म्हणून लहानपणापासूनच यशाची स्वप्ने बघा. ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र अथक परिश्रम,चिकाटी व जिद्द ठेवा. जीवनातील नकारात्मक,कुसंस्काराचा त्याग करून एक आदर्श व्यक्ती बनण्यासाठी कटीबध्द रहा. उत्तुंग यशप्राप्तीसाठी ध्येय निश्चित करा असे प्रतिपादन विवेकानंद कर्णबधिर महाविद्यालयाचे प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजीत आनंद साधना संस्कार शिबीरातील विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना सोमवारी (दि.२१) रोजी ते बोलत होते.
पुढे बोलतांना प्राचार्य शेळके म्हणाले की, बालपणापासून सत्यवचन,वडीधा-यांच्या आज्ञेनचे पालन करून सद्गुण व सदाचाराची कास धरा. ध्येय नसलेल्या व्यक्ती म्हणजे गलबत्याशिवाय जहाज म्हणून आयुष्यात आपली नजर केवळ आपल्या ध्येयावर ठेवून प्रयत्नवादी बना असेही ते पुढे बोलतांना म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत राजपूत तर आभार प्रदर्शन रवी लोखंडे यांनी मानले.  

शनिवार, १९ मे, २०१८

चिमुकल्यांनी उचलला जनजागृतीचा विडा !




प्लास्टिक पिशव्यांचा होणारा  अतिवापर टाळण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने  राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घातली. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होवून मोठया प्रमाणात प्रदुषण होते. पिशव्यांच्या वापरावरती  बंदी जरी असली तरी काही ठिकाणी अजूनही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा पर्यावरणाचे रक्षण करा या हेतूने  हिवरा आश्रम येथे  विवेकानंद ज्ञानपीठात सुरू असलेल्या आनंद साधना संस्कार शिबीरातील चिमुकल्यांनी कागदापासून कागदी पिशव्या तयार करीत पर्यावरण रक्षणाचा समाजाला संदेश देवून जगजागृती केली आहे. प्लास्टिक पिशव्याच्या वापराने प्रदुषणात मोठया प्रमाणात वाढ होते. येथील आनंद साधना संस्कार शिबीरातील विद्यार्थ्यांनी कागदापासून विविध पिशव्यांची निर्मिती करून प्लास्टिक पिशव्या मुक्त अभियानाला आपल्या कृतीतून साकार करून या चिमुकल्यांनी जनजागृतीचा विडा उचलल्याने त्या चिमुकल्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजीत आनंद साधना संस्कार शिबीरात परिसरातील जळपास १०० ते १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला  आहे. या शिबीरात विद्याथ्र्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी अत्यावश्यक असणा-या विविध बाबी प्रामुख्याने शिकविल्या जात आहे. सकाळी ५ वाजता योग प्राणायामापासून विद्यार्थ्यांच्या दिनचर्येला सुरूवात होते. दिवसभर शिबीरात शिबीरार्थी विद्यार्थ्यांना मनोरंजनातून शिक्षणासोबत विविध सामाजिक जाणीवा वृध्दीगंत होणारे उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. दररोज विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील व्यक्तीचे नियमीतपणे मार्गदर्शन लाभत असून दररोज विविध सामाजिक उपक्रम या शिबीरात प्राचार्य मधुकर आढाव,विक्रांत राजपूत,रवि लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी यशस्वीपणे राबवितात.

पर्यावरण रक्षणाचा मंत्र
आनंद साधना संस्कार शिबीरात चिमुकल्यांच्या बालमनावर सुसंस्कारासोबत राष्ट्रप्रेम,सदाचार,नीतीमुल्यांची जोपासना,वडीलधा-यांचा आदर यासोबत पर्यावरण रक्षणार्थ प्रदुषण टाळा आरोग्य जपा,वृक्ष लागवड,पर्यावरण संवर्धनाचे धडे सुध्दा शिकविले जातात. या शिबीरात पर्यावरण रक्षणाची शपथ सुध्दा विद्यार्थ्यांना या शिबीरा दरम्यान देण्यात आली आहे.

प्लास्टिक पिशव्याच्या वापराने पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते. पर्यावरण रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.  आम्ही शिबीरात दरम्यान कागदी पिशवी निर्मितीतून पर्यावरण रक्षणाचा संदेश देवून जनजागृती करण्याचा छोटा प्रयत्न केला.                                                                                                                                      गौरव प्रकाश वानखेडे,शिबीरार्थी हिवरा आश्रम

आनंद साधना संस्कार शिबीराला परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. संस्कार शिबीरात विद्यार्थ्यांच्या सुप्तकलागुणांना चालना मिळत आहे.
                                                    मधुकर आढाव,प्राचार्य विवेकानंद ज्ञानपीठ


लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८

शुक्रवार, १८ मे, २०१८

संकटाच्या वेळी बुध्दी स्थिर ठेवा


मनुष्याच्या जीवनात संकटे येतात आणि जातात. जीवनातील येणा-या संकटांना न घाबरता धैर्याने,संयमाने सामोरे जावे. संकटामुळे  माणसाच्या क्षमतांचा विकास होतो. ज्याप्रमाणे अग्निमध्ये सोन सुलाखून त्याची किंमत वाढते, त्याचप्रमाणे संकटांचा सामना केल्यामुळे व्यक्तीच्या धैर्यात,संयमात वाढ होते. संकटाच्या प्रसंगी आत्मविश्वासासोबत विवेकाने संकटांना सामोरे जा. संकटाच्या वेळी बुध्दी स्थिर ठेवा असे विचार विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाने आयोजित आनंद साधना बालसंस्कार शिबीरात शुक्रवारी शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी  ते बोलत होते.
पुढे बोलतांना थोरहाते म्हणाले कीबालमनावर संस्काराचे बीजारोपणासाठी आनंद साधना संस्कार शिबीर महत्वाची भूमीका बजावत आहे. संस्कार शिबीराच्या माध्यमातून संस्कारासोबत सामाजिक जाणीव वृध्दीगंत होण्यास मदत मिळते. भगवान बुध्दशिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रातील प्रेरक प्रसंगांचे वर्णन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महापुरूषांच्या विचारांचे अनुकरण करून जीवनात यश संपादीत करा असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रांत राजपूत तर आभार रवि लोखंडे यांनी मानले.

मंगळवार, १५ मे, २०१८

रविवार, १३ मे, २०१८

कला जीवनाच्या परिपूर्णतेचे माध्यम - संतोष गोरे


शिबीरातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहे. प्रत्येकाला आवडीप्रमाणे कला जोपासण्याची संधी दिली जात आहे. हस्तकला,शिल्पकला,गीत,संगीत यांची ओळख करून दिली जात आहे. या कला जीवनाच्या परिपूर्णतेचे माध्यम आहे असे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी विवेकानंद ज्ञानपीठात आयोजीत संस्कार शिबीरात बोलतांना व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून सचिव संतोष गोरे उपस्थित होते.
 पुढे बोलतांना गोरे म्हणाले की, सुगंध देणे हा फुलांचा गुणधर्म आहे काही काळ फुलणारे फुले हे वातावरणाला सुगंधी करून जातात. हसणा-या मुलाला जातधर्म,वर्णपंथ याचे ज्ञान नसते त्याचे हसणे  इतरांच्या दु:खाचा नाश करते. वाहणारी झरे माणसाची तहान भागवितात. तदवतच मानवी जीवन आहे. विद्यार्थी अवस्था ही जगण्यातील अत्यंत महत्वाची अवस्था झाली आहे. वाढती स्पर्धा पालकांच्या अपेक्षांचे ओझे,काळाच्या बरोबरीत स्वतःला सिध्द ठरविण्याचा खटाटोप यामुळे शिक्षणातून मिळणा-या आनंदाला आपण मुकत चाललेलो आहोत. ज्ञान हे केवळ पुस्तकातूनच मिळते असे नाही तर निसर्ग माणसाचा सर्वात मोठा गुरू असून फुलणारी फुले,हसणारी मुले,वाहणारे झरे हेच ज्ञानाचे व  आनंदाचे खरे  स्त्रोत आहेत आपण फुलासारखे फुलून इतरांना सुगंध देत राहावा आपल्या निरागस हास्याने इतरांच्या ह्रदयात घर करावे शिक्षणातून जगण्याचे भान निर्माण व्हावे व जगण्यावर प्रेम करण्याची वृत्ती निर्माण व्हावी. कारण ज्ञान हे सदा सर्वकाळ मनुष्याला प्रकाशाच्या मार्गावरून पुढे नेत राहते. माहिती आणि ज्ञान यात प्रचंड फरक असून माहितीचा साठा सुख आणि आनंद निर्माण करेल असे नाही याउलट ज्ञानाने सत चित्त आनंद  स्वरूपाची प्राप्ती होवून मानवी जीवन सफल होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रांत राजपूत तर आभार प्रदर्शन प्राचार्य रवि लोखंडे यांनी मानले.

शनिवार, १२ मे, २०१८

आधुनिक जीवनशैलीमुळे वाढतोय लठ्ठपणा !

fatness in child साठी इमेज परिणाम
आधुनिक जीवन शैली व आहारातील होणा-या बदलामुळे लहान मुलातील लठ्ठपणा वाढत असल्याचे दिसून येत आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणामुळे लहानपणात मुलांना अनेक व्याधी जडण्याचा धोका सुध्दा नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना फास्ट फुडपासून दूर ठेवल्यास व काही दैनंदिन जीवनात थोडे फार बदल केल्यास लहान मुलातील लठ्ठपणावर नियंत्रण मिळविता येते. सद्या शहरी तसेच ग्रामीण भागातील लहान मुलांमधील लठ्ठपणा हा पालकांमधील चिंतेचा विषय बनला आहे. लठ्ठपणामुळे लहान मुलांचा आत्मविश्वास कमी होवूनत्यांच्यामध्ये निराशा निर्माण होते. लहान मुलांचे वजन वाढू नये म्हणून वेळोवेळी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. काही पालक आपल्या लहान मुलाचे वजन कमी करण्यासाठी त्याला मैदानी खेळाकडे पाठवितात. साधारणपणे ८ ते १० वर्षांची मुले असतांना शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी ती वाढत जाते परिणामी लहान मुलांचे वजन आवश्यकतेपेक्षा जास्त वाढते. लहान मुलांचे वजन वाढीमागे अनेक कारणे असली तरी मैदानी खेळाचा अभाव, सतत एकाच ठिकाणी बसून राहणे,टि.व्ही.मोबाईल,कॉम्प्युटर वरती गेम खेळणे इत्यादी मुळे लहान मुलांचे वजन वाढते. काही मुलांमधील लठ्ठपणा हा अनुवांशिकतेमुळे असतो. तर काही मुलांच्या आहार व जीवनशैलीतील बदलामुळे त्यांचे वजन वाढून मुलांना लठ्ठपणा येतो. लहान मुलांना सकस व सात्वीक आहार द्यावा. लहान मुलांना जेवणात जास्त प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा. मुलांमधील लठ्ठपणा कायम राहल्यास मुलांमध्ये हदयविकार,उच्च रक्तदाब,हाडांचे आजार व संधीवात होण्याची शक्यता वाढते. याशिवाय मधुमेह होण्याची शक्यता सुध्दा वाढते.

मुलांच्या खाण्यावर ठेवा नियंत्रण
महान मुलांना जास्त चरबी असलेले पदार्थ खाण्यामध्ये देवू नये. याशिवाय कर्बोदके असलेल्या  पदार्थांपासून लहान मुलांना दुर ठेवावे. जास्त उष्मांक असलेले पदार्थ,समोसाबर्गर,वडापाव,आईस्क्रीम पदार्थ खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

लहान मुलांमधील स्थूलतेची कारणे
सोशल मिडीयाच्या काळात मुले मैदानी खेळ सोडून मुले मोबाईलकॉम्प्युटर आणि टी.व्ही.पाहण्याकडे जास्त कल असतो. त्यामुळे शरीराची  हालचाल न झाल्यामुळे चरबी वाढते.

आपल्या पाल्याचे वजन वाढून लठ्ठपणा येत असेल तर डॉक्टरांशी चर्चा करावी. मुलांच्या दिनचर्येत बदल करून त्यांना मैदानी खेळ व व्यायामाकडे लक्ष द्यावे.                                                                                                  डॉ.विशाल सुरूशे बालरोगतज्ञ,मेहकर



लेखक 
संतोष थोरहाते (पत्रकार),
"श्रीनिवास" विवेकानंद नगर ,हिवरा आश्रम
मो ९९२३२०९६५८