Responsive Ads Here

मंगळवार, १ मे, २०१८

रामच्या पाठीवर कौतुकाची थाप !


दैनिक सकाळ समुहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालचित्रकला स्पर्धा २०१८ चे आयोजन केले होते. राज्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या बालचित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभागी झाले.लहानग्यांच्या कुंचल्यातून व कल्पकतेतून विविध कलाकृती साकारल्या गेल्या. या बालचित्रकला स्पर्धेत बालगटामधून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद ज्ञानपीठाचा विद्यार्थी चि.राम दयानंद थोरहाते याने प्रथम क्रमांक मिळाला. रामला लहानपणापासून चित्रकलेची आवडत असून शनिवार,रविवार अथवा फावल्या वेळेमध्ये हातात पेन्सिल घेऊन चित्रकृती काढण्यात रमतो. लहान मुलांमधील सुप्त कलागुणांना ओळखून पालकांनी त्याला प्रेरणा दिल्यास खूप मदत मिळते राम यांनी आपली कलाकृतीची जोपासना केल्यामुळे दैनिक सकाळने आयोजित बालचित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला .विवेकानंद आश्रमाचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले यांनी चि.रामच्या कलाकृती पाहून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्याचा उत्साहात वाढ केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा