Responsive Ads Here

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

पुन्हा जन्मुनी गात मरावे महाराष्ट्र गीत!




महाराष्ट्राच्या भूमीतील अव्वल दर्जाची लोककला म्हणून शाहिरी पोवांडयांना विशेष महत्व आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून महाराष्ट्रातील शाहिरांनी समाजामध्ये राष्ट्रभक्ती,राष्ट्रप्रेम व स्वराज्यप्राप्तीसाठी कायम प्रेरीत केले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत लोककलावंत व शाहिर यांचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य संग्रमातील शाहिराचे योगदान मोलाचे असल्याचे विचार सांगली येथील शाहिर सम्राट देवानंद माळी यांनी नुकतेच सकाळच्या मुलाखती दरम्यान बोलतांना व्यक्त केले.शाहिर हा महाराष्ट्राचा प्राण असल्याचेही त्यांनी सांगीतले.यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते,सुप्रसिध्द तबलावादक संजय म्हस्के,शाहिर सज्जनसिंह राजपूत,विक्रांत राजपूत तथा आदि उपस्थित होते.

यावेळी शाहिर सम्राट देवानंद माळी म्हणाले की, महाराष्ट्रातील शाहिरांनी एका हातात डफ घेऊन परिस्थितीची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता स्वातंत्र्यपूर्र्व काळापासून ते आजपर्यंत आपल्या शाहिरी कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात समाजामध्ये जनजागृतीचे अलौकीक कार्य केले आहे. शाहिरांनी आपल्या कार्यक्रमातून देशभक्ती, बंधुत्व आणि सामाजिक ऐक्याचाच प्रचार व प्रसाराचे कार्य केले. शाहिरांनी आपल्या कार्यक्रमातून महाराष्ट्राचा गौरवशाली व दैदिप्यमान इतिहास जनतेसमोर कार्यक्रमाच्या माध्यातून सादर करून समाजामध्ये नवचैतन्य जागृत करण्याचे काम केले. महाराष्ट्राचाच हाच गौरवशाली इतिहास आपल्या शाहिरी पोवाडयांच्या माध्यमातून सादर करण्याचे काम शाहिर सम्राट देवानंद माळी,पत्नी शाहिर चंद्रीकाकल्पना माळी,मुलगा बालशाहिर बालगंर्धव पृथ्वीराज अखंडपणे करीत आहेत. लोककला व शाहिरी ही खूप मोठी परंपरा आहे. कोणतीही कला आत्मसात करण्यासाठी मोठी तपश्चर्या करावी लागते. समर्पण व त्यागाने सर्व शक्य होते. शाहिरी करण्यासाठी जन्मजात प्रतिभाशक्तीसकस अभिनयकौशल्यलेखनशैलीस्मरणशक्तीभावपूर्ण सादरीकरणची कला यासारख्या गुणांची गरज असल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.


शाहिरी कार्यक्रमांच्या माध्यमातून जागृती
शाहिर सम्राट देवानंद माळी हे आपल्या शाहिरी कार्यक्रमातून समाजजागृतीचे गेल्या तीन दशकांपासून मोठे कार्य करीत आहेत. आपल्या कार्यक्रमातून राष्ट्रप्रेम,देशभक्ती,व्यसनमुक्ती,हुंडाप्रथा,ग्रामस्वच्छता,कुपोषणमुक्ती,स्त्रीभ्रूणहत्या याबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करीत आहेत.

शाहिरांचे योगदान मोलाचे
भारत देश गुलामगिरीत असतांना महाराष्ट्रातील शाहिरांनी आपल्या पोवाडयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जनजागृती केली.आपल्या शाहिरी पोवाडयांच्या माध्यमातून जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम,राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करून त्यांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रेरीत केले.


संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा प्रेरणादायी व्याख्याता 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१८

हिदी सुविचार

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

गजाननन कांबळे यांना मिळाली वृत्तपत्र वितरणातून रोजगारांची संधी




संघर्ष की राहों मे कठिनाइयां तो आऐंगी
जीवन का सच यही हमें बतायेंगी,
बढाते रहना कदम सब कुछ सहते हुए
एक दिन ये qजदगी खुशियों से सज जाएगी
वरील काव्य पंगती  जीवनाचे सार सांगण्यासाठी पुरेशा आहे. आयुष्यात जो कष्ट करतो,संघर्षाला सामोरे जातो त्यालाचा जीवनाचा खरा अर्थ उमगतो...जीवनाकडे आपण किती सकारात्मक दृष्टीने बघतो याला विशेष महत्व आहे. प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल करता परिश्रम करण्याची जो तयारी ठेवतो त्याला आयुष्यात यश मिळते.हिवरा आश्रम येथील गजानन कांबळे यांनी वृत्तपत्र वितरणाच्या कामातून रोजगारांची संधी शोधली.
सकाळच्या रम्य कोवळया सुर्य किरणांच्या प्रकाशात खुर्चीवर चहाचा घोट पित पित वृत्तपत्रांचे वाचन करण्याची सयम आपल्यापैकी अनेकांना निश्चीत असले. सकाळ सकाळी वृत्तपत्र वाचणातून मिळाणारा वैचारीक आनंद मौज काही औरच आहे. आपल्या वृत्रपत्र वाचनातून चालू घडामोडी सोबतच आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृध्दींगत होतात.१५ ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रता दिन म्हणून ओळखला जातो. लहानपणी वृत्तपत्र विक्री करीत  शिक्षण घेवून वृत्तपत्र विक्रेता ते भारतीय महान शास्त्री ते भारताचे राष्ट्रपती असा अदभूत प्रवास करणारे भारताचे राष्ट्रपती .पी.जे अब्दुल कलाम यांना जन्मदिन वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून साजरा करण्यात येता. हेच वृत्रपत्र वाचकांच्या हाती पोहचविण्याचे महाराष्ट्रातील लाखो वृत्तपत्र विक्रेता व वितरणक करीत असतात.
 हिवरा आश्रम येथे वृत्तपत्र वितरणाचा शिवधनुष्य गेल्या तीन ते चार वर्षापासून पेलण्याचे काम गजानन काशिनाथ कांबळे हे करीत आहे. शांत,सुस्वभावी,मनमिळाऊ कठोर परिश्रमाचा गुण अंगी असलेला भला माणूस... हिवरा आश्रम सारख्या खेडयातील वाचकांच्या वाचनात खंड पडू नये म्हणून भल्या सकाळीच उठून बस मधून वृत्तपत्रांचे पार्सलांची वर्गवारी करून ते वाचकांच्या घरी नियोजीत वेळेत पोहचविण्याच्या कामात कुठलीही हयगय करीत नाही. गजानन काशिनाथ कांबळे यांच्या घरीची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र वितरणाचे काम स्वीकारले.
गजानन कांबळे यांना वृत्तपत्र वितरणातून रोजगारी संधी उपलब्ध झाली आहे. गजानन कांबळे यांना वृत्तपत्र वितरणातून तीन ते चार हजार रूपये मिळतात. याशिवाय माहेवारी मेस सुध्दा चालविता...हिवरा आश्रम येथील पेपर एजन्सी मालकांची पहिली पसंती गजानन कांबळे आहेत. गजानन कांबळे देशोन्नती,सकाळ,दिव्य मराठी,पुण्यनगरी,तरूण भारत या वृत्तपत्राचे वितरण करतात. गजानन कांबळे दररोज जवळपास चारशे वृत्तपत्रांचे वितरण करतात.

नियमीतपणे वाचकांपर्यंत वृत्तपत्र वितरण करणे ही एक महत्वाची जबाबदारी आहे. आपल्या जबाबदारीमध्ये कुठलाही खंड पडून नये यांची मी काळजी घेतो. काम कोणतेही असो ते श्रेष्ठ qकवा कनिष्ठ नसते. तुम्ही करीत असलेले काम किती प्रामाणिकपणे जबाबदारीने करता याला महत्व आहे.
                                                                                   गजानन काशिनाथ कांबळे वृत्तपत्र वितरतक हिवरा आश्रम

संतोष थोरहाते 

पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१८

रूईखेड मायंबा शक्तीपिठात भक्तांची मांदियाळी




बुलडाणा जिल्हायातील रूईखेड मायबा येथील श्रीक्षेत्र शक्तीपीठ येथे माँ अंबादेवी च्या नवरात्र उत्सावाला सुरूवात झाली असून त्यानिमित्त विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रूईखेड मायंबा येथील  शिवशक्तीपीठ  हे शिव आणि शक्तीचा संगम असलेले तीर्थक्षेत्र आहे.दरवर्षी नवरात्र माँ अंबादेवीच्या दर्शन,पुजनासाठी भाविक मोठया संख्येने या ठिकाणी येतात. मनोकामना पूर्ण करणारी माता अंबादेवी असल्याची भाविकांची अतूट श्रध्दा आहे. चहूबाजूंनी नयनरम्य वातावरण,पक्षांची किलबिलाट, आजूबाजूला हिरवेगांर डोंगर एका छोटयाशा टेकडीवर शक्तीपिठात मॉ  अंबादेवी विराजमान आहे. मॉ अंबादेवीच्या  दर्शनाने मन प्रसन्न झाल्याची अनूभूती भक्तांना होते. भाविकांचे मनोरथ पूर्ण करणारे दैवत म्हणून हजारो भक्ताचे श्रध्दास्थान आहे. नवरात्र उत्सवात आपल्या मनोकामना पूर्तीसाठी भक्त दर्शनासाठी येथे अलोट गर्दी करीत असतात. शक्तीपीठाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा नवरात्र उत्सावाचे निमित्त विविध धार्मिक,सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाच्या माध्यमातून भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या माता शक्तीपिठ मंदिर सभामंडपाचे कामे पूर्ण झाली आहेत. रूईखेड मायंबा येथे शिवशक्तीपीठात नवरात्र उत्सवानिमित्त पंचक्रोशीतील भक्त माता शक्तीच्या दर्शन पूजनासाठी मोठया संख्येने गर्दी करतात.दिवसेंदिवस या शक्तीपिठाची ख्याती वाढत आहे.परिसरातून असंख्य भक्तांची मांदियाळी देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात मोठी गर्दी करतात.शक्तीपिठास गौरवशाली इतिहास आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी

नवरात्रोत्सवामुळे शक्तीपिठ मंदिराला सध्या यात्रेत्रे स्वरूप आले आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक मंदिरात अलोट गर्दी करतात.असंख्य भाविक मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीकडे साकडे घालतात. नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका असल्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी नवस बोलतात.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सकाळी ते दिंडी सोहळा,सकाळी माता शक्ती देवीचे विधिवत मंत्रोच्चारात पूजन सकाळी वा महाआरती सकाळी ते १० ज्ञानेश्वरी पारायण,दुपारी ते अनुभूती ग्रंथाचे वाचन ,सायंकाळी माता शक्ती देवीची महाआरती रात्री नंतर देवीच्या जागराचा कार्यक्रम सादर होत असतो.

संतोष थोरहाते 
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८