Responsive Ads Here

गुरुवार, ९ मे, २०१९

'स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी' ठरणार विवेकानंदांचा सर्वाधिक उंच पुतळा!


स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांचा ग्रामीण भागात प्रचार प्रचाराचे अद्भूत काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी आयुष्यभर केले. जगभरातील युवकांसाठी विवेकानंद आश्रम प्रेरणाकेंद्र बनले आहे. विवेकानंद आश्रम हे देशभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरले असून, वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी आश्रमास भेट दिली आहे. आश्रमाच्यावतीने कोराडी नदीच्या जलाशयात स्टॅच्यु ऑफ ह्युमिनिटी या विवेकानंद स्मारकाचे निर्माण कार्य सुरु असून, या स्मारकावरील विवेकानंदांचा पुतळा हा तब्बल ४० फूट उंचीचा राहणार आहे. विवेकानंदांच्या आजपर्यंतच्या पुतळ्यांत हा सर्वाधिक उंचीचा पुतळा असेल, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली आहे.
कोराडी नदीच्या जलाशयात नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक उभारणे हे पू. शुकदास महाराज यांचे भव्य स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. तब्बल सहा एकराचे हे बेट असून ९९ वर्षाच्या करारावर ते राज्य सरकारने विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. हे बेट विकसित करण्यासाठी आश्रमाने आजपर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असून, आणखी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे. स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी या विवेकानंद स्मारकावर येर्णाया प्रत्येकाला विवेकानंदांच्या कार्याचा परिचय व्हावा. पू. शुकदास महाराज यांच्या संकल्पनेतील ध्यानधारणा त्यांनी करावी व नैसर्गिक वनराईच्या सानिध्यात त्यांना आत्मबोध व्हावा, यासाठी विवेकानंद आश्रम तब्बल तीन कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चात हे विवेकानंद स्मारक साकारत आहे.

तीन लाख पर्यटकांनी दिल्या भेटी
विवेकानंद स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असल्याने विवेकानंद आश्रम व हरिहरतीर्थ येथे भेट देण्यासाठी देशभरातून पर्यटक स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटीसही आवर्जुन भेट देत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पर्यटकांनी विवेकानंद आश्रमाचा नयनरम्य परिसर, हरिहरतीर्थ व विवेकानंद स्मारकास भेट दिली.

असे राहणार स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी स्मारक
 स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी असे या स्मारक प्रकल्पाचे नाव राहणार असून या स्मारकावर विवेकानंदांचा भव्य आणि अतिउंच असा पुतळा उभारला जात आहे. सद्या येथे १५ फूट उंचीचा पुतळा असून, त्याची उंची ४० फूट केली जाईल, तसेच, ध्यान केंद्र, नैसर्गिक वनराई आणि नारळाच्या झाडांची बाग असे या स्मारकाचे स्वरुप राहणार आहे. त्यामुळे समुद्रकिना-यावर बसून ध्यान करत असल्याचा अनुभव पर्यटकांना येणार आहे.

६ एकरावर साकारणार भव्य विवेकानंद स्मारक
कोराडी नदीच्या जलाशयात नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक उभारणे हे पू. शुकदास महाराज यांचे भव्य स्वप्न होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी विवेकानंद आश्रमाचे विश्‍वस्त मंडळ परिश्रम घेत आहेत. तब्बल सहा एकराचे हे बेट असून ९९ वर्षाच्या करारावर ते राज्य सरकारने विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. हे बेट विकसित करण्यासाठी आश्रमाने आजपर्यंत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला असून, आणखी दोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

युवकांसाठी विवेकानंद स्मारक ठरणार उर्जास्त्रोत
स्वामी विवेकानंद यांचे चरित्र व ओजस्वी विचारांचा फार मोठा प्रभाव जगभरातील युवकांवर आहे. विवेकानंद आश्रम कोरडी जलाशयात सहा एकराच्या बेटावर नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या बेटावर विवेकानंद स्मारक साकारत आहे. या विवेकानंद स्मारकाला भेटी देण्यासाठी जगभरातून युवक मोठ्या संख्येने विवेकानंद आश्रमात येईल. 'स्टॅच्यू ऑफ ह्युमिनिटी' हे जगभरातील युवकांचे उर्जास्त्रोत ठरणार आहे.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

1 टिप्पणी: