Responsive Ads Here

बुधवार, २९ मे, २०१९

विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळा तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी (दि.२८) रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर विज्ञान शाखेमध्ये कु.वैष्णवी संजय रहाटे,दत्तात्रय कारभारी वाघ,कु.संचिता संजय जटाळे तर कला शाखेचा निकाल ९७ टक्के लागला असून यामध्ये कृष्णा चंदन पिसाळ,कु.मीना मधुकर जवंजाळ,कु.माया साहेबराव जाधव यांनी यश संपादन केले आहे. वरील दोन्ही शाखांमधून ८ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत तर ६२ विद्यार्थी  प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. विज्ञान व कला शाखांचा निकाल अनुक्रमे विज्ञान शाखा १०० टक्के तर कला शाखेचा निकाल ९७ टक्के लागला आहे. तर विवेकानंद व्यवसायिक अभ्यासक्रमाचा निकाल ९३.५४ टक्के लागला आहे. इयत्ता बारावीच्या सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे ,आत्मानंद थोरहाते,विष्णुपंत कुलवंत,विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास भिसडे,उपप्राचार्य अशोक गि-हे,पर्यवेक्षक देवेंद्र मोरे,आत्माराम जामकर तसेच ज्युनिअर कॉलजच्या सर्व प्राध्यापकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक   करून अभिनंदन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा