विवेकानंद आश्रमात बालसंस्कार शिबीराचे आयोजन


शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी विवेकानंद आश्रमात उन्हाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुध्दा दि. जून पासून ते २१ जून पर्यंत या बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमधील विविध सुप्तगुणांचा विकास होण्याच्या दृष्टीने अशी शिबीरे महत्वाची ठरतात. शालेय कालखंडात अभ्यास, शिकवणी, गृहपाठ या उपक्रमांना विद्यार्थी कंटाळलेले असतात. त्या साचेबंध्द जीवनशैलीत मनाप्रमाणे खेळणे, बागडणे स्वतःमधील विविध कलागुणांना वाव मिळण्याची शक्यता कमी असते. शालेतून घरी आलेली मुले मोबाईल किंवा  संगणकात डोके घालून बसलेली दिसतात. त्यांच्या हातातील मोबाईल काढून टाकण्यासाठी त्यांना मैदानावर शारीरीक कसरतीचे धडे देण्यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरणार आहे. या शिबीरात मुला मुलींची निवासी व्यवस्था करण्यात आली असून दि. जूनला सकाळी ११ वाजता या शिबीराचे उदघाटन संत साहित्याचे अभ्यासक प्रख्यात्य वक्ते विठ्ठल रूखमिनी देवस्थान पंढरपूरचे विश्वस्त प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी राहणार आहेत. या शिबीराचा जास्तीत जास्त विद्याथ्र्यांनी लाभ घेण्याचे आवाहन  आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

चुमुकल्यांच्या सुप्त कलागुणांना  संधी 
सकाळी  ते .३० रनिंगयोग प्राणायमप्रार्थना प्रख्यात योगशिक्षक नाना इंगळेघनश्याम गोरे हे घेणार आहे.३० ते .३० प्रातविधी  तयार होणे.३० ते .३० सुसंस्कार वर्ग.३० ते .३० क्रीडा प्रशिक्षक विजय गोरे यांचे मॅटवरील कुस्ती  मल्लखांबाचे बेसिक.३० ते १० जेवन१० ते ११ इंग्रजी संभाषण वर्ग११ ते  रेणू महामुने,भूषण महामुने यांचे नृत्य गायन  अभिनय कौशल्य  ते .३० अल्पोहार.३० ते  विश्रांती ते .३० मान्यवरांचे कथाकथन,  विद्यार्थ्यांना व्यासपीठावर प्रदर्शन करण्याची खुली संधी .३० ते  लाठीकाठीलेझीमतलवारबाजीचे प्रशिक्षणसायंकाळी  ते   जेवन ते  हरीपाठगीतापाठहनुमान चालीसा पठनअनुभूती अभंग   पठन  सामूदायीक प्रार्थना हभप  येवले शास्त्री  थुट्टे  शास्त्री यांचे  चिंतन


संतोष थोरहाते

पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा