Responsive Ads Here

रविवार, २८ जुलै, २०१९

पुंजाराम भांडारकर यांनी दिली शाळेला मदत


हिवरा आश्रम येथील पुंजाराम ओंकार भांडारकर यांनी आयएसओ नामांकन प्राप्त जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेला  शनिवारी ता. २७ रोजी अकरा हजार एकशे अकरा रूपये रोख दिले.
विठोबाचे सावळे रूपडे नेत्रामध्ये साठविण्यासाठी वारीकरी आषाढीची आतुरतेने वाट पाहत असतो. पंढरपूरच्या वारी सहभागी होऊन  त्यांच्या नामात गुंग होवून पंढरपूर केंव्हा येते याचे भावन सुध्दा वारक-याला राहत नाही. पंढरपूरची वारीची परंपरा असून सुध्दा महाराष्ट्राच्या अनेक गावामध्ये आहे. हिवरा आश्रम येथील शिंपी महाराज म्हणून परिचीत असलेले पुंजाराम ओंकार भांडारकर हे चुकता  दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. ते धार्मिक वृत्तीचे असून हरीपाठ,काकडा,पुजा अर्चना सोबत गेल्या चाळीस वर्षापासून  अखंडपणे पंढरपूरची वारी  करीत आहे. विठ्ठलाची ओढ कायम मनाला आतूर करीत असते त्या ओढीने भाविकांचे पावले पंढरीच्या वारीसाठी आसुसलेले असतात. यावर्षी सुध्दा शिंपी महाराज यांनी माऊलीच्या दिंडीमध्ये सहभागी होवून पंढरपूरच्या वारीला गेले होते. तिर्थक्षेत्रावरून आल्यानंतर मायंद्या अर्थात अन्नदान करण्याची परंपरा असुन सुध्दा ग्रामीण भागात मोठया प्रमाणात सुरू आहे. मात्र या परंपरेला फाटा देवून पुंजाराम ओंकार भांडारकर यांनी हिवरा आश्रम येथील आयएसओ नामांकन प्राप्त शाळेला रोख अकरा हजार एकशे अकरा रूपये देवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. पुंजाराम भांडारकर यांनी दिलेल्या रक्कमेतून शाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. यावेळी मुख्याध्यापक अरविंद होणे,शिक्षक प्रकाश दुणगू,संजय बंगाळे,संजय पवार,दत्तात्रय दशरथे,सौ.मिनाक्षी बंगाळे,सौ.सरीता पवार,सौ.आशा इंगळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय पवार तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अरविंद  होणे यांनी मानले.शिंपी महाराजांचे सर्वस्तरावरून यानिमित्ताने कौतुक होत आहे.

सामाजिक बांधिलकीचे दर्शन
तिर्थक्षेत्रावरून आल्यानंतर मायंद्या अर्थात अन्नदान करण्याची परंपरा असुन सुध्दा ग्रामीण भागात मोठया प्रमाणात सुरू आहे. मात्र या परंपरेला फाटा देवून पुंजाराम ओंकार भांडारकर यांनी हिवरा आश्रम येथील आयएसओ नामांकन प्राप्त शाळेला रोख अकरा हजार एकशे अकरा रूपये देवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.तिर्थक्षेत्रावरून आल्यानंतर मायंद्या अर्थात अन्नदान करण्याची परंपरा असुन सुध्दा ग्रामीण भागात मोठया प्रमाणात सुरू आहे. मात्र या परंपरेला फाटा देवून पुंजाराम ओंकार भांडारकर यांनी हिवरा आश्रम येथील आयएसओ नामांकन प्राप्त शाळेला रोख अकरा हजार एकशे अकरा रूपये देवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
 
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण काही तरी समाजासाठी केले पाहिजे. या भावनेतून हिवरा आश्रम येथील जि..शाळेला माझ्या परीने मदत केली
पुंजाराम भांडारकर हिवरा आश्रम


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

गुरुवार, २५ जुलै, २०१९

शेतक-यांनी फवारणी दरम्यान बाळगावी दक्षता !


विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत हिवरा आश्रम येथे शेतक-यांना फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी,कोणत्या कीडनाशकाची खरेदी करावी,फवारणी कोणत्या वेळेस करावी,फवारणीचे द्रावण तयार करतांना कोणती काळजी घ्यावी. याबाबत शेतक-यांनी कोणती काळजी घ्यावी. याबाबत शेतक-यांनी फवारणी तंत्रज्ञान शास्त्रशुध्द फवारणी कशी करावी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी साहेबराव लहाने, संतोष पिठले, सुनिल टेकाळे, विशाल काकडे, गुलाबराव तुपकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शेतक-यांना फवारणी करतांना कशी करावी,उंच झाडावर फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी,फवारणी झाल्यानंतर कीटकनाशकांच्या डब्याची विल्हेवाट कशी लावावी.फवारणी केलेल्या क्षेत्रावर जनावरांना किती कालावधीनंतर चारण्यासाठी न्यावे याबाबत प्रात्यक्षिक करून महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. विवेकांनद कृषी विधाता ग्रुपमध्ये काजोल पाटील,नितु जुनघरे,शिवगंगा मिसाळ,कांचन सिरसाट,स्नेहल घुगे,जुही परचाके,वैष्णवी बोर्डे,भावना सरोदे,प्रज्ञा बागडे,निकीता होने या विद्यार्थीनींचा समावेश आहे. कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके, प्रा.डॉ.भानुदास भोंडे, प्रा.मंगेश जकाते, प्रा.समाधान जाधव,प्रा.शिवशंकर काकडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अशी घ्यावी खबरदारी
कीटकनाशकावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावेशेतक-यांनी हिरवा त्रिकोण असलेल्या कीटकनाशकांची खरेदी करावी. शेतक-यांनी फवारणी करतांना हातमोजे,मास्क,टोपी,प्रान,पूर्ण पँट गॉगल इत्यादीचा वापर करावा. फवारणी दरम्यान नाक,कान,डोळे यांचे रक्षण करावे.फवारणी दरम्यान लहान मुले,जनावरे,पाळीव प्राणी यांना दूर ठेवावे. फवारणी करतांना वापरलेली भांडी,साहित्य,नदी किंवा विहीरीजवळ धुणे टाळावे. कीटकनाशकावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,फवारणी नंतर साबनाने हात,पाय स्वच्छ धुवावे.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंर्तगत कृषी विधाता गु्रपच्या विद्यार्थीनींनी ग्रामीण भागातील शेतक-यांना फवारणी संबधी प्रातयक्षिक महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. कृषी विधाता ग्रुपच्या विद्यार्थीनींच्या फवारणी तंत्रज्ञान मार्गदर्शनाचा परिसरातील शेकडो शेतकरी बांधवांना लाभ झाला.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८