शेतीची उत्पादकता व उपयुक्तता वाढीसाठी गांडूळ खत मदत करते. गांडूळ खत अत्यंत कमी कालावधीत तयार होत असून त्याचा उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे. गांडूळ खत निर्मितीने ग्रामीण भागात रोजगाराला चालना मिळत असल्याची माहिती जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शेतक-यांना रविवार ता. २१ रोजी दिली. विवेकानंद महाविद्यालयाच्या जय जिजाऊ गुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्याक्रम अंतर्गत ग्राम हिवरा बु येथे ग्रामस्थांना गांडूळ खत निर्मिती खताचे महत्व सांगीतले. यावेळी रेखा दळवी,गया दळवी,पार्वती ठाकरे,शांताबाई गायकवाड,शारदा खटावकर,सुदेव दळवी,हिरालाल पवार यांचेसह परिसरातील शेकडो शेतकरी,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या जय जिजाऊ ग्रुप मध्ये अश्विनी घुगे, अश्विनी इंगळे, सलोनी लड्ढा, भारती नंदापूरे, दिपाली गि-हे, आरती ऊईके, हर्षा पवार, माधवी वाका, मानसा पोलोरू या विद्यार्थीनींचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या जय जिजाऊ ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा.आकाश इरतकर,प्रा.समाधान जाधव,प्रा.मिनाक्षी कडू यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली शेतक-यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती देत आहे.
गांडूळ खताचे फायदे
गांडूळ खताच्या वापराने जमिनीचा पोत सुधारतो. जमीनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. गांडूळ खताच्या वापराने जमिनीची धूप व बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. गांडूळ खताच्या वापराने रासायनिक खतावर होणारा खर्च कमी झाल्याने शेतकरी बांधवांची आर्थिक बचत होते.
गांडूळ खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी मोलाची मदत होते. गांडूळ खतात नत्राचे प्रमाण मूळ जमिनीच्या पाचपट असून असून स्फुरद सातपटीने व पालाश अकरापटीने जास्त असल्याने पीक वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. अत्यंत कमी भांडवल खर्चात हे खत तयार होत असून पीक वाढ,उत्पादनात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
डॉ.सुभाष कालवे प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय
रासायनिक खत अत्यंत महाग असून त्याची उपलब्धता सुध्दा कठीण आहे. रासायनिक खताच्या अतिवापराने जमिनीची पोत व भुसभुसीतपणा कमी होऊन त्याचा उत्पादन वाढीवर विपरीत परिणाम होतो. शेतक-यांनी गांडूळ खत वापरल्यास कमी खर्चात शेती होत असल्याने आर्थिक बचत करता येईल.
योगिता राठोड,विद्यार्थीनी विवेकानंद कृषी महाविद्यालय
संतोष थोरहाते
संतोष थोरहाते
पत्रकार, दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,
हिवरा आश्रम,ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
Nice work 👍
उत्तर द्याहटवा