भगवान महावीरांच्या अहिंसेच्या मार्गानेच समाजात व देशात एकता निर्माण होईल. भगवान महावीरांनी सर्वसामान्यांना जीवनाचे तत्वज्ञान शिकविले. जगा आणि जगू द्या हा विचार संपूर्ण विश्वाच्याकल्याणसाठी मोलाचा आहे. महावीरांच्या विचारात विज्ञान होते. महावीरांच्या तत्वज्ञानाची व विचाराची आज समाजाला गरज आहे. भगवान महावीरांचे तत्वज्ञान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादीत नाही तर महावीरांच्या अहिंसेतविश्वकल्याण असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचेअध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज महाराज संस्थापित विवेकानंद आश्रमात भगवान महावीर जयंती प्रसंगी बुधवार ता.१७ रोजी ते बोलत होते.
पुढे बोलतांना आर. बी. मालपाणी म्हणाले की, भगवान महावीरांचा उपदेशही सत्याच्या मार्गाचा पुरस्कार करतो. सत्याचे पालन करा. अहिंसेचा पुरस्कार करा. भगवान महावीरांच्या विचारांचे व तत्वज्ञानाचे अनुकरण केल्यासमानवी जीवन धन्य होईल. संपूर्ण जगाला प्रकाशीत करण्याची किमया महावीरांच्या तत्वज्ञानात आहे. अहिंसा व शांती हे महावीरांचे विचारच जगाला तारू शकतात असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.
यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,शाहिर ईश्वर मगर,पत्रकार संतोष थोरहाते,सुभाष सवडतकर आदि उपस्थित होते.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा