Responsive Ads Here

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

चारा भाव वाढीने बळीराजा हवालदिल


गेल्या दोन ते तीन वर्षापासून पावसाची सरासरी कमी झाल्याने दुष्काळाची दाहकतेची झळा बळीराजा व शेतीक्षेत्राला पोहचत आहे. दुष्काळी परिस्थीतीमुळे पशुपालकांसमोर चा-याची समस्या उभी राहली आहे. पशुपालकांना  गायी,म्हशीसाठी चारा वाढीव दराने विकत घेण्याची पाळी पडत असल्यामुळे बळीराजावर आर्थीक भार पडत आहे. मेहकर तालुक्यातील पशुपालकांना वाढीव दरात आपल्या जनावरांसाठी चारा खरेदी करावा लागत आहे.  अशातच उन्हाळयात दुध उत्पादनात घट झाल्याने त्याच्या दूध व्यवसायावर सुद्धा परिणाम होत आहे. बळीराजासमोर  पशु धन वाचविण्यासाठी  अनेक अडचणींना उभ्या राहिल्या आहेत. मेहकर तालुक्यातील शेतकरकयांना दुष्काकाळात देखील आर्थिक भार सहन करावा लागत आहे. चा-या अभावी दुध उत्पादनात कमालीची घट झाली आहे. मेहकर तालुक्यात  यंदा पुरेसा पाऊस नसल्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. 
मेहकर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमध्ये नागरिकांना पाण्यासाठी व जनावरांच्या चा-याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. त्यातच अल्प पावसामुळे खरिपातील पिके वाया गेली आहेत.  यंदा, मात्र चारा टंचाई निर्माण झाली आहे. पशुपालकांंकडून चा-याला मागणी जास्त असल्यामुळे जादा पैसे मोजूनही चारा मिळेनासा झाल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.  

असे आहेत चा-याचे भाव
सद्यस्थितीमध्ये बळीराजाला दादरचा चारा तीन हजार रूपये शेकडा दराने विकत घ्यावा लागत आहे तर ज्वारीचा कडबा ३००० रूपये शेकडा दराने विकत घ्यावा लागत आहे.त्यासोबत एक ट्रॉली कुटारासाठी साडे तीन हजार ते चार हजार ट्रॉलीसाठी रूपये मोजावे लागत आहे. 

दुष्काळी परिस्थितीमुळे चा-याचे भाव गगनाला पोहचल्यामुळे दुध व्यावसायिकांना अनेक आर्थीक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सद्या हरभ-याचे कुटार भाव ४ रूपये किलोने विकत घ्यावे लागत आहे तर शाळू कडबा ३७०० रूपये शेकडयाने विकत घ्यावा लागत असल्यामुळे दुध व्यवसायात तोटा सहन करावा लागत आहे. 
                         सतिष संजाबराव धोंडगेदुध व्यवसायिक कंबरखेड

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा