Responsive Ads Here

पाककला



इडली बनवण्याची विधी
इडली हे एक लोकप्रिय खाद्यप्रकार आहे. इडली ही तांदळापासून बनविण्यात येते. आज आपण इडली कशी बनवायची आहे ते शिकणार आहे.
इडलीसाठी आवश्यक साहित्य
१. 200 ग्रॅम तांदूळ
२. 100 ग्रॅम उडदाची डाळ
3. 1 ½ चमचा मीठ
४. एक चिमूट बेकिंग सोडा
५. गरजेनुसार तेल

इडली बनविण्याचा विधी
सर्व प्रथम तांदूळ व उडदाची डाळ रात्रभरासाठी पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी चांगली धुवून मिक्सरमध्ये दोघांची पेस्ट बनवा. दोन्ही पेस्ट एकत्र करून 5-6 तास दमण ठिकाणी ठेवा यात स्वादानुसार मीठ व एक चमचा तेल घाला.

गॅसवर इडली मेकर पॅनमध्ये पाणी गरम होऊ द्या इडलीच्या साच्यामध्ये थोडे तेल लावा व त्यात हे मिश्रण योग्य प्रमाणात भरा सर्व खाचे भरल्यावर त्यांमध्ये ठेवून वरून झाकण लावून घ्या. पाच-दहा मिनिटे पूर्ण आचेवर ठेवा व इडल्या चांगल्या होऊ द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा