पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्रम

इमेज
ॐ श्री परमात्मने नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । अथ श्रीविष्णुसहस्त्रनाम स्तोत्रम यस्य स्मरणमात्रेन जन्मसंसारबन्धनात्‌ । विमुच्यते नमस्तमै विष्णवे प्रभविष्णवे ॥ नमः समस्तभूतानां आदिभूताय भूभृते । अनेकरुपरुपाय विष्णवे प्रभविष्णवे ॥ वैशम्पायन उवाच श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वशः । युधिष्टिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत ।१। युधिष्टिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम्‌ । स्तुवन्तः कं कमर्चन्तः प्राप्नुयुर्मानवाः शुभम्‌ ।२। को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः । किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्मसंसारबन्धनात्‌ ।३। भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमम्‌ । स्तुवन्नामसहस्त्रेण पुरुषः सततोत्थितः ।४। तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम्‌ । ध्यायन्स्तुवन्नमस्यंश्च यजमानस्तमेव च ।५। अनादिनिधनं विष्णुं सर्वलोकमहेश्वरम्‌ । लोकाध्यक्षं स्तुवन्नित्यं सर्वदुःखातिगो भवेत्‌ ।६। ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनम्‌ । लोकनाथं महद्‌भूतं सर्वभूतभवोद्भभवम्‌ ।७। एष मे सर्वधर्माणां धर्माऽधिकतमो मतः । यद्भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैरर्चेन्नरः सदा ।...

शिव महिमनः स्तोत्र

रामरक्षा स्तोत्र

॥ श्रीरामरक्षास्तोत्रम् ॥ ॥ श्रीगणेशायनम: ॥ ॥ विनियोग ॥ अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य। बुधकौशिक ऋषि:। श्रीसीतारामचंद्रोदेवता। अनुष्टुप् छन्द:।  सीता शक्ति:। श्रीमद्हनुमान् कीलकम्। श्रीसीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोग: ॥ ॥ अथ ध्यानम् ॥ ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्मासनस्थं। पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ॥ वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं। नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ॥ ॥ इति ध्यानम् ॥ चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्। एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥ ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्। जानकीलक्ष्मणॊपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥ सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तं चरान्तकम्। स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥३॥ रामरक्षां पठॆत्प्राज्ञ: पापघ्नीं सर्वकामदाम्। शिरो मे राघव: पातु भालं दशरथात्मज: ॥४॥ कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती। घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सल: ॥५॥ जिव्हां विद्यानिधि: पातु कण्ठं भरतवंदित:। स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मुक: ॥६॥ करौ सीतपति: पात...

गणपती अथर्वशीर्ष

संकटनाशन गणपती स्तोत्र

रेशनकार्ड धारकांसमोर थम व्हेरिफीकेशनचे कोडे

इमेज
संपूर्ण भारतात १ करोड रेशनकार्ड लाभार्थ्यांचे थम व्हेरिफिकेशनचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. बुलडाणा जिल्हयात ३ लाख ४५ हजार  ७८२ रेशनकार्ड धारक आहेत त्यापैकी  ९लाख ३४ हजार ८५० सदस्यांचे थम व्हेरिफिकेशन झाले आहे.  येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत रेशनकार्ड धारक व सदस्यांचे थम व्हेरिफिकेशनचे काम होणे अपेक्षित होते. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लिंक  ओपन होत नसल्यामुळे  रेशनकार्ड थंब व्हेरिफिकेशनचे काम ठप्प झाले आहे. याचा फटका जिल्हाभरातील गरीब जनतेला बसत असल्याचे दिसून येत आहे.  रेशनकार्ड थंब व्हेरीफिकेशनचे काम सद्यस्थितीत जोमात सुरू असून लहान मुले,मोलमजूरी करणारे,वृध्द यांचे थंम व्हेरिफिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी येवून त्यांचे आधार लिंक होत नाही. आधार लिंकसाठी आधार केंद्रावर वर्दळ वाढल्याचे दिसून येत आहे. तर आधार लिंक साठी वेळ व पैश्यांचा अपव्यय होत असल्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे.  जिल्हयातील ज्या रेशनकार्डधारक व सदस्यांचे थंब व्हेरीफिकेशन होवू शकले नाही अशा व्यक्तींनी आपली यादी स्वस्त धान्य दुकानदाराकडे द्यावी. स्वस्त धान्य दुकानदाराने ह...

श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे आजपासून महाशिवरात्री उत्सव

इमेज
  हजारो भाविकांचे अतूट श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान दुधा ब्रम्हपूरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने विविध धार्मिक , आध्यात्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि .२५   फेब्रुवारी पासून महाशिवरात्री उत्सवास सुरूवात होत आहे. महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची मांदियाळी राहणार आहे. यावर्षीच्या सोहळयात विविध धार्मिक कार्यक्रम राहणार असून महाशिवरात्री निमित्त संगीत भागवत कथेचे आयोजन दि. २५ फेब्रवारी ते ४ मार्च   या दरम्यान कथाकार भागवत उपासक प.पू.१००८ स्वामी अमोलानंद महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीत भागवत कथा संपन्न होणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरत हभप भाऊसाहेब महाराज वैद्य , हभप आश्रुबा महाराज गायकवाड , हभप कुंडलिकराव महाराज ठोकरे तर ७ ते ८ शिवाचे विधीवत मंत्रोच्चारात अभिषेक व पूजन , संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ हभप सुधाकर महाराज शिंगणे व महिला मंडळ हिवरा आश्रम तर २५ फेब्रुवारी ते ४ मार्च पर्यंत दररोज रात्री ८.३० ते १०.३०   या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे .या...

विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती संपन्न

इमेज
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराज संस्थापित विवेकानन विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती शनिवारी ता.२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद , प.पू.शुकदास महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली             कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चित्रा मोरे   तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. ज्ञानेश्वर गाडे   हे उपस्थित होते. यावेळी   प्रा. ज्ञानेश्वर गाडे यांनी   बोलताना सांगितले की ,  संत गाडगे बाबांनी समाजाला खरी गरज असलेल्या परिवर्तनाचा कर्मसिंद्धान्त आपल्या जगण्यातून महाराष्ट्रातील जनसामान्यापुढे अगदी सोप्या भाषेत मांडला. दिवस भर झाडू हातात घेऊन स्वच्छतेचे कार्य करणें आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनाची स्वच्छता करणें , हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होताअसेही पुढे बोलतांना सांगितले.   यावेळी प्रा. समत...

कांदा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव

इमेज
  मेहकर तालुक्यातील अनेक शेतकरी कांदा पिकाकडे वळले आहे. कांदा हे व्यापारी दृष्टया सर्वात महत्वाचे भाजीपाला पिक आहे. भारतीयांच्या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो. कांदा पिकविणा-या राज्यात क्षेत्र व उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रमध्ये अंदाजे १.०० लाख हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते.   कांदा हे पीक भाजी वर्गीय असून व्यापारी दृष्टया या पिकाला चांगले महत्व आहे. ढगाळ वातावरणामुळे सकाळच्या धुक्यामुळे फुलोरा अवस्थेत असलेल्या कांदा पिकाला इजा होवून उत्पादनात घट होवू शकते. सध्या मेहकर तालुक्यात कांदा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला   असून योग्य कीड नियंत्रण केल्यास फुलकिडीपासून कांदा पिकाचे होणारे नुकसान टाळून कांदा उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाढ होऊ शकते. कांदा पिकावर फुलकिडीचा मोठया प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कांद्यामध्ये फुलकिडीची पिल्ले आणि प्रौढ किटक पानातील रस शोषून घेतात. पानांवर पांढरे ठिपके दिसतात. असंख्य ठिपके जोडले गेल्यामुळे पाने वाकडी होऊन वाळतात. असे करा नियंत्रण शेतकरी विशिष्ट प...

वीज ग्राहकांचा ऑनलाईन बिल भरण्याकडे कल

इमेज
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मानसाच्या जीवनात आमुलाग्र बदल झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे वेळची बचत होते. मेहकर तालुक्यातील   ग्रामीण तसेच शहरी विज ग्राहकांची ऑनलाईन विज बील भरणा करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यातील ५ ते ६ हजार विज ग्राहक नेट बँकिंग   किंवा   ऑनलाईन अ‍ॅप व्दारे आपल्या वीज बिलाचा भरणा करीत आहे. ग्रामीण भागातून ऑनलाईल विज बील भरणा करण्याकडे   सकारात्मक   प्रतिसाद मिळत असल्याचे महावितरणाचे तालुका उपविभागीय अधिकारी राजेश नाईक यांनी दैनिक सकाळशी बोलतांना सांगीतले. जास्तीत जास्त विज बील ग्राहकांनी ऑनलाईन बील भरणा करावा. जणेकरून वेळेची बचत होईल. डिजीटल विज ग्राहकांना विज बीलाचा भरण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगीतले. ऑनलाईन विज बील भरण्यासाठी महावितरण कंपनीने संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. नोंदणीकृत ग्राहकांला विज बिल जनरेट झाल्याबरोबर त्याच्या नोंदनीकृत मोबाईल क्रमांवर विज बिलाची रक्कम व भरणा दिनांकाची माहिती मिळते. विज ग्राहकांसाठी एमएमएस सुविधा विज ग्राहक १८०...

यजुर्व राईतकर तबला परीक्षेत उत्तीर्ण

इमेज
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात कार्यरत असलेले शिक्षक भगवान राईतकर यांचा मुलगा यजुर्व भगवान राईतकर तबला प्रवेशिका प्रथम या परिक्षेत विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला आहे. आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई व्दारा घेण्यात येणाèया तबला प्रवेशिका प्रथम या परीक्षेत यजुर्व भगवान राईतकर हा विशेष योग्यतेत उतीर्ण झाला आहे.डिसेंबर २०१८ मध्ये उषा संगीत विद्यालय, लोणार या केंद्रातून यजुर्व ने तबला परीक्षा दिली होती. त्या मध्ये तो विशेष योग्यतेत उतीर्ण झाला. यजुर्व भगवान राईतकर हा तबला विषयाचे शास्त्रीय शिक्षण आपले वडील भगवान राईतकर यांच्या घेत आहे. यजुर्व याच्या यशाबद्दल उषाताई फड, प्रवीण पडघान, रमेश धायडे ,संजय गवांदे, गणेश राऊत आदिनी अभिनंदन केले. संतोष थोरहाते पत्रकार   तथा प्रेरणादायी व्याख्याता 'श्रीनिवास'  विवेकानंद नगर , हिवरा आश्रम ता.मेहकर जि.बुलडाणा मो.९९२३२०९६५८

रासेयो शिबीरात समाजप्रबोधचा जागर !

इमेज
जवान मर्द तू असा कसा रे वागतो,दारू पितो धिंगाना करतो...सोडा आता ही व्यसनाधीनता...मरी माय आली आता मरी माय आली...शिक बाबू शिक शाळा तू शिक... अशी एकापेक्षा एक अधिक सरस समाजप्रबोधनात्मक गीते सादर करून शाहिर ईश्वर मगर यांच्या लोककला जागर मंच हिवरा आश्रम यांनी  रासेयो शिबीरात मंगळवारी ता. १९ रोजी समाजप्रबोधन केले.  कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कृषी महाविद्यालय व विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे  राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष शिबीराचे दि. १७ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी पर्यंत मेहकर तालुक्यातील दत्तक ग्राम लव्हाळा येथे आयोजन केले आहे. या रासेयो शिबीरातून विद्यार्थ्यांच्या मनावर समाजसेवेचे संस्कार रूजण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी शाहिर सज्जनसिंग राजपूत यांनी राष्ट्र जागवा जागृत व्हा तरूणांनो...ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी मला जीजाऊ,सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये दिसावी...जर्द सुपारी चुना लावून घोळून केला घुटका... जय जय महाराष्ट माझा जय जय महाराष्ट्र माझा... यासारखी गीते सादर करून तरूणांईची मन...

किडनीस्टोन आजार,लक्षणे व उपचार kidney disease

इमेज
भारतात दिवसेंदिवस किडनीस्टोनच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. किडनी स्टोन अर्थात मुतखडा या आजाराची समस्या आज दिवसेंदिवस सामान्य होत चालली आहे. किडनीस्टोन या आजारामध्ये रूग्णाला खूप वेदना होतात. काय आहे किडनी स्टोन कॅल्शियम कॉस्फेट,कॅल्शियम ऑक्सोलेट,यूरिक अ‍ॅसिड आणि अमोनिया फॉस्फेट यासारख्या रसायनापासून स्टोन निर्माण होतो.शारयुक्त पाण्यापासून तयार झालेले पदार्थाचे सेवन केल्यानंतर किडनीस्टोन होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. हे स्टोन किडनीमधून युरेटर नामक संकिर्ण नळीव्दारे मुत्राशयात येतात. हा मुतखडा लहान आकाराचा असल्यास सहज लघवीवाटे शरीराच्या बाहेर फेकला जातो. मात्र मोठया आकाराचा किडनीस्टोन मूत्रवाहिनीमध्ये अडकल्यामुळे मूत्रमार्गात अडथळा निर्माण झाल्यामुळे खूप वेदना होतात. अशी आहे किडनीस्टोनची लक्षणे ज्या व्यक्तीला किडनीस्टोन झाला आहे त्या व्यक्तीला लघवी करतांना जळजळ होती.वारंवार लघीवीस जाण्याची इच्छा होते.कधी कधी लघवी करतांना लघवीत रक्त येते.याशिवाय मळमळ वाटणे,ताप येणे,अंगदुःखी यासारखी लक्षणे किडनीस्टोन झालेल्या व्यक्तीला जाणवतात. माणसाच्या शरीराती...

शिवतांडव स्तोत्र (सार्थ मराठी) shivtandav stotra marathi

जटाटवीगलज्जलप्रवाहपावितस्थले गलेऽवलम्ब्यलम्बितां भुजंगतुंगमालिकाम्‌ डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकारचंडतांडवं तनोतु नः शिवः शिवम्‌ जटांमधून धावत्या जलांनि धूत-कंठ जो धरीत सर्पमालिका, गळ्यात हार शोभतो डुम्मूडुम्मू करीत या, निनाद गाजवा शिवा करीत तांडव प्रचंड, शंकरा शुभं करा जटा कटाहसंभ्रम भ्रमन्निलिंपनिर्झरी विलोलवीचिवल्लरी विराजमानमूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्टपावके किशोरचंद्रशेखरे रतिः प्रतिक्षणं मम जटांतुनी गतीस्थ, गुंतल्या झर्‍यांपरी अहा तरंग ज्याचिया शिरी विराजती, शिवा पहा ललाट ज्योतदाह ज्या शिवाचिया शिरी वसे किशोर चंद्रशेखरा-प्रती रुचीहि वाढु दे धरा धरेंद्र नंदिनी विलास बंधुवंधुर- स्फुरद्दिगंत संतति प्रमोद मानमानसे कृपाकटाक्षधोरणी निरुद्धदुर्धरापदि क्वचिद्दिगम्बरे मनो विनोदमेतु वस्तुनि नगाधिराज-कन्यका-कटाक्ष मोदिता शिवे दिगंत संतती स्फुरून, मोदतीहि भक्त हे कृपाकटाक्ष टाकिता जया, विपत्ति मावळे कधी दिगंबरामुळे कळे न रंजना मिळे जटा भुजंगपिंगलस्फुरत्फणामणिप्रभा- कदंबकुंकुम द्रवप्रलिप्त दिग्वधूमुखे मदांध सिंधुर...