हजारो
भाविकांचे अतूट श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान दुधा
ब्रम्हपूरी येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी महाशिवरात्री उत्सवा निमित्ताने विविध
धार्मिक,आध्यात्मीक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. दि .२५ फेब्रुवारी पासून महाशिवरात्री
उत्सवास सुरूवात होत आहे. महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची मांदियाळी राहणार
आहे.
यावर्षीच्या
सोहळयात विविध धार्मिक कार्यक्रम राहणार असून महाशिवरात्री निमित्त संगीत भागवत
कथेचे आयोजन दि. २५ फेब्रवारी ते ४ मार्च
या दरम्यान कथाकार भागवत उपासक प.पू.१००८ स्वामी अमोलानंद महाराज
यांच्या सुश्राव्य वाणीतून संगीत भागवत कथा संपन्न होणार आहे. दररोज सकाळी ५ ते ६
काकडा आरत हभप भाऊसाहेब महाराज वैद्य,हभप आश्रुबा महाराज
गायकवाड, हभप कुंडलिकराव महाराज ठोकरे तर ७ ते ८ शिवाचे
विधीवत मंत्रोच्चारात अभिषेक व पूजन,संध्याकाळी ६ ते ७
हरिपाठ हभप सुधाकर महाराज शिंगणे व महिला मंडळ हिवरा आश्रम तर २५ फेब्रुवारी ते ४
मार्च पर्यंत दररोज रात्री ८.३० ते १०.३० या वेळेत
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे .यामध्ये हभप
प पू १००८ स्वामी अमोलानंद महाराज सावत्रा, हभप गोविंद
महाराज गवळी हभप गजानन महाराज गारडे,हभप गणेश महाराज सुरुंग,हभप अनिल महाराज चेके,हभप रामायणाचार्य सतीष महाराज
डोईफोडे,हभप संजय महाराज देशमुख यांचे कीर्तन संपन्न होणार
असून ४ मार्च रोजी रात्री ८ ते १० जिजाऊ शाहीर रामदास कुरंग यांचा शाहिरी कार्यक्रम
तर १० ते १२ हभप भागवताचार्य दशरथ महाराज अंभोरे चारणकर यांचे कीर्तन होणार तर ५
मार्च रोजी सकाळी १० ते १२ हभप ज्ञानेश्वर महाराज तायडे यांचे काल्याचे कीर्तन व
दुपारी १२ ते १ आकाशवाणी कलावंत सुभाष सवडतकर ,निलेश थोरहाते,यांचा भक्तीगीत गायनाचा कार्यक्रम तर १ ते २ राम कोठेकर आकाशवाणी कलावंत
यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम तर शाहीर ईश्वर मगर व
संच लोकजागर यांचा कार्यक्रम तर दुपारी ३ ते ४ महाशिवरात्री उत्सवानिमित्ताने
दररोज रात्री ८.३० ते १०.३० पर्यंत नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनरूपी सेवेचा लाभ
सुध्दा भाविकांना घेता येणार आहे. ५ मार्च रोजी विदेही संत गजानन महाराज यांचे
हस्ते तर खा.प्रतापराव जाधव ,आ.डॉ. संजय रायमुलकर ,जि.प. सदस्य संजय वडतकर यांच्या प्रमुख उपस्थित लाखो भाविकांना बारी पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात
येणार आहे.श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होणा-या
विविध धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित
राहण्याचे आवाहन श्रीक्षेत्र ओलांडे श्वर संस्थान दुधा ब्रह्मपुरी च्या वतीने
करण्यात आले आहे .
संगीत
भागवत कथेचा होणार लाभ
महाशिवरात्री निमित्त संगीत भागवत कथेचे आयोजन दि. २५ फेब्रवारी ते
४ मार्च या
दरम्यान कथाकार भागवत उपासक प.पू.१००८ स्वामी अमोलानंद महाराज यांच्या सुश्राव्य
वाणीतून संगीत भागवत कथा संपन्न होणार आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
Nice.
उत्तर द्याहटवाबापू खास वृत्तांत
उत्तर द्याहटवा