Responsive Ads Here

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

श्वेताच्या शिक्षणासाठी सरसावले दानशूर !



मेहकर तालुक्यातील देऊळगांव माळी येथील होतकरू  विद्यार्थीनी श्वेता जगन वाघमारे हिच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिक्षक ज्ञानदेव आनंदा बळी यांनी १० हजाररूपयांची मदत केल्याची सावित्रीच्या लेकीला लाभला गुरूचा शैक्षणिक आधार या मथळयाखाली दैनिक सकाळने दि. ऑगस्ट रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून श्वेताच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. दैनिक सकाळचे वृत्त प्रकाशित होताच समाजातील दानशूर व्यक्ती श्वेता वाघमारेच्या शैक्षणिक मदतीला सरसावले.  देऊळगांव माळी  येथील होतकरू विद्यार्थिनी श्वेता वाघामारे हिने घरीच्या प्रतिकूल परिस्थितीत आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवले.  शिक्षण  घेवून उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न श्वेताला  स्वस्थ बसू देत नव्हते. कु. श्वेताची शिक्षण घेण्यासाठी धडपड लक्षात घेत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून देऊळगांव माळी येथील  विठु माऊली बचत गटा अंतर्गत संतोष सावळकर सर, टी.एल.मगर सर, रमण जैन, संतोष जैन, डॉ. शिवशंकर बळी ज्ञानदेव बळी सर यांनी ६५०० रुपये, पतंजली योग प्राणायाम समिती देऊळगाव माळी यांच्या वतीने ३००० रुपये, श्री पांडुरंग संस्थान च्या वतीने २००० रुपये याशिवाय  रामेश्वर बळी, राजेश बळी, बि.के.सुरुशे, अभिमन्यू मगर, त्र्यंबक  मगर यांनी मदत केली. सामाजिक जाणीवेतून श्वेताजगन वाघमारे हीला  जवळपास २७००० रुपये दिले आहे.

 घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे मला महाविद्यालयीन  शिक्षण घेतांना शैक्षणिक अडचणी येत होत्या. मात्र समाजातील दानशूर व्यक्तीने केलेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
                                                 श्वेता जगन वाघमारे विद्यार्थीनी देऊळगांव माळी

दैनिक सकाळचे मानले आभार
दैनिक सकाळचे वृत्त प्रकाशित झाल्याने श्वेताच्या शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येवून कु. श्वेता जगन वाघमारे च्या महाविद्यालयीन  शैक्षणिक मदतीला धावून आले. श्वेताच्या कुटूंबीयांनी दैनिक सकाळ समूहाचे यावेळी आभार मानले.

मेहकर चिखली रस्त्यावरील खड्डयामध्ये बेशरमचे झाड लावून आंदोलन




गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मेहकर चिखली रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे नविन काम झपाटयाने होत असेल तरी  या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामुळे दुचाकीस्वार प्रवाशांना अनेक अडचणींना सामाना करावा लागत आहे. सद्या पावसाळयाचे दिवस असून पावसामुळे या रस्त्यावरील खड्डयामध्ये पाणी साचून मोठया प्रमाणात चिखल होतो त्यामुळे दुचाकीस्वारांपासून ते वाहनधारकांना या मोठया खड्डयामुळे अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळीस मेहकर चिखली रस्त्यावरून प्रवास करणाèया अनेक वाहनधारकांचा अपघात होतात. मेहकर चिखली रस्त्यावरील मोठ मोठया खड्डयाबाबत ठेकेदार यांना तोंडी सुचना देवून सुध्दा त्या सुचनांची अमंबजावणी होत नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. रविवारी दि-२६ रोजी स्वराज्य मित्र मंडळाने मेहकर चिखली रस्त्यावरील खड्डयामध्ये बेशरमचे झाडे लावून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये स्वराज्य मित्र मंडाळा चे अमोल सिताराम म्हस्के,विजय चव्हाण,नागेश कुसळकर, बबलु धंदर,मुनिर शहा,राहूल म्हस्के,शुभम वानखेडे,बापू कांबळे,रवी जाधव,शांताराम धंदर,गोqवद अवसरमोल,बंडा कंकाळ,मंगेश काकडे,हर्षदीप गवई,गजानन नवघरे,दिपक पंचाळ,निलेश देव्हडे,अनिल डव्हळे,राजू चव्हाण तथा स्वराज्य मित्रमंडाळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

भाविक पर्यटकांची गैरसोय

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे  श्रावण महिन्यात भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी असते. श्रावण महिन्यात हिवरा आश्रम येथील हरिहर तीर्थ ओलांडेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी  हजारो भाविक भक्त दर्शन पुजनासाठी येतात. मेहकर चिखली रोडवर असलेल्या मोठया खड्डयामुळे पावसाळयात दुचाकीस्वारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मेहकर चिखली रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या खड्डयामध्ये पावसाळयाच्या दिवसामध्ये पाणी साचल्याने चिखल होतो. त्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबधित ठेकेदारांनी लवकरात लवकर मेहकर चिखली रस्त्यावरील मोठे  खड्डे बुजवावे.
                                 अमोल म्हस्के,स्वराज्य मित्रमंडळ ब्रम्हपूरी

संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


युरिया चारा उपचार पध्दतीने वाढवा चा-याची पौष्टीकता

शेती पुरक जोडधंदा म्हणून  दुध व्यवसायाकडे अनेक शेतकरी बांधवांचा कल वाढला आहे.  चारा हा दुधाळ जनावरांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. सकस चा-यामुळे जनावरांचे पोषण होवून दुधदेण्याच्या क्षमतेत वाढ होते. चा-याची पौष्टीकता वाढीसाठी व चारा जास्त दिवस टिकण्यासाठी  चा-यावर युरीया उपचार पध्दती चे प्रात्याक्षिक विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषीपुत्र गु्रपच्याविद्यार्थ्यांनी लव्हाळा येथील  शेतक-यांना करून दाखविले.  यावेळी अशोक लहाने,दिपक लहाने,विकास डुकरे,मोतीराम गारोळे,पंढरी शेळके,श्याम कुहिरे,चंद्रभान लहाने  यांचे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
चा-यावर युरीया उपचार पध्दतीचा वापर केल्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पोषकतत्व मिळतात. या चा-यामुळे जनावरांच्या पोटातील नायट्रोजन  हा प्रोटीन मध्ये रूपांतरीत होतो. तसेच कार्बोहाड्रेड लवकर पचतनसल्याने युरीया उपचारीत चारा खाल्याने योग्य परिणाम दिसून येतो. हा चारा खाल्याने जनावरांची पचनशक्ती वाढते व पचनक्रिया सुरळीत होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीपुत्र ग्रुप मध्ये सागर सोमटकर,अजय चिंचोले,ॠषिकेश शेळके,वैभव जाधव,प्रसाद घरपाहुणे,आकाश ढोणे,साई तेजा,साई सतिष,राजेश्वर रेड्डी  या  विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीपुत्र ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अशी आहे युरिया चारा उपचार पध्दती.
शेतक-यांनी प्रथम १०० किलो गव्हाचे कुटार ताडपत्रीवर आच्छादीत करावे. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडावे. त्यानंतर ४० लिटर पाण्यामध्ये २ किलो युरीया,१० किलो गुळ आणि २ किलो मिठ यांचे मिश्रम एकरूप होई पर्यंतहलवावे. हे मिश्रम गव्हाच्या कुटाराच्या थरा वरती फवारावे. पुन्हा एक गव्हाच्या कुटाराचा थर करून त्यावर हे मिश्रण फवारावे. हा गव्हाचा चारा २५ ते २८ दिवस झाकून ठेवावा.

युरीया उपचारीत चारा हा शेतकरी बांधवांच्या दुधाळ जनावरांसाठी वरदान आहे. सहा महिन्याच्या जनावरांना युरीया उपचारीत चारा देणे टाळावे. युरीया उपचारीत चारा खाल्याने जनावरांची वाढ अधिक गतीने होते.

                                      डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषि महाविद्यालय

वाळलेल्या चा-यामध्ये पोषकतत्वाचे प्रमाण कमी असते.आणि उपचारीत चा-यामध्ये पोषकतत्व जास्त प्रमाण असते. उपचारीत चा-यामुळे दुधाची आणि वासराची वाढ झपाटयाने होते.

                                        ॠषिकेश शेळके, विवेकानंद कृषी महाविद्यालय
संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

विवेकानंद विद्या मंदिराचे क्रिकेट स्पर्धेत यश



येथील कर्मयोगी संत .पूशुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या मंदिर  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मेहकर येथे गुरुवारी (दि २३रोजी पारपडलेल्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत यश मिळवून सदर विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली.
यामध्ये वैष्णव आव्हाळेप्रविण राठोडचेतन पंजरकर , प्रतीक इंगळे,अविनाश पवार,प्रवीण राठोड,अजित पवार,धनंजय देशमुख,माधव सुरुशे,कार्तिक दुतोंडी,अजय म्हासाने,कृष्ण पिसाळ,आकाश तायडे,तुषारसुरुशे,स्वप्नील इंगळे,ऋषिकेश नवले या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशस्वी खेळाडूंची तयारी क्रीडा शिक्षक रणजीत जाधव,आत्मानंद थोरहातेगोविंद अवचार,शाम खरात यांनी करून घेतलीयशस्वी खेळाडंचे विवेकानंद आश्रमाचे  अध्यक्ष आरबीमालपाणी,उपाध्यक्ष अशोकभाऊथोरहातेसचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,सहसचिव आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरुषोत्तम आकोटकर सर,मुख्याध्यापक अणाजी सिरसाट,उपमुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे,पर्यवेक्षक पर्यवेक्षक अशोक गि-हेआत्माराम जामकर यांनी कौतुक केले  पुढील स्पर्धेसाठी  शुभेच्छा दिल्या आहेत.