''दोस्त'' दो-चार निकलते हैं कहीं ''लाखों में''


जेंव्हा मूर्तीकार हातात हातोडा छन्नी घेवून दगडावर आघात करतो तेंव्हा तो दगडावरील अनावश्यक असणारी व्यंग बाजूला करीत असतो.... दगडावर आघात करण्यामागे त्याचा प्रामाणिक हेतू केवळ अद्भूत शिल्प निर्मिती करणे हाच असतो...दगडाला कदाचित तो क्षणभर दुष्ट,शूत्र सुध्दा वाटू शकले... परंतु मुर्तीकार कुणी दुष्ट व्यक्ती नसून हाच दगडाचा खरा हितचिंतक असतो. मुर्तीकाराची तळमळ ही दगडाला मूल्यप्राप्त करून देण्याची असते... त्याच्या हातोडी छन्नीच्या आघातानेच दगडला भविष्यात मूल्य प्राप्त होणार असते... खरे मित्र हे मूर्तीकाराप्रमाणे असतात... ख-या मित्राची प्रत्येक कृती,सल्ला,मार्गदर्शन व संगतीने जीवनाला खरी किंमत येते. ख-या मित्राच्या हितोपदेशानेच जीवनाला योग्य दिशा मिळून जीवन कृतार्थ होते.
किसी ने कहा दोस्ती इबादत हैं,किसी ने कहा दोस्ती राहत हैं
पर हमने कहा दोस्ती एक मंदिर हैं, हाँ हर मुराद पूरी होती हैं
वरील काव्यातून कवीने मैत्रीचा अगाध महिमा वर्णन केला आहे. खरेतर मैत्री ही शब्दातीत आहे... ख-या मैत्रीचे वर्णन करण्यासाठी शब्द सुध्दा तोकडे पडतील... अशी मैत्रीची महती आहे. मैत्री एक आनंदा धागा आहे.. .मैत्री जीवनाला सुंदर करणारे अदभूत रसायन...मैत्री म्हणजे आयुष्याचा खडतर प्रवास सुसाह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट...कोणत्याही वातावरणात पेलणा-या एखाद्या लवचिक वेलीसारखी .. .
विवेकानंद आश्रमाच्या जनसंपर्क कार्यालयात कार्य करीत असतांना ज्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यातील व्यक्तीमत्वाचा विकास झाला ते म्हणजे विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते होय... बंधू, मित्र व मार्गदर्शक म्हणून आयुष्यात मोठे स्थान आहे. ज्यांच्या कडक शिस्तीमुळे प्रत्येक कामात झोकून देण्याची सवय लागली...त्यांचे वेळोवेळी मिळणाèया मार्गदर्शनामुळे खूप काही शिकायला मिळाले...
बाप्पू, ''काम प्रत्येक जण करतो,आपण अस काम करावे की आपली छाप त्यात उमटली पाहिजेतच'' अशी कायम शिकवण असते. कायम प्रेरणा,उत्साह वाढविणार व्यक्तीमत्व पाठीमागे असल म्हणजे व्यक्तीमत्वात काय बदल होतात ते काय वर्णन करावे. आत्मानंद भाऊच्या सहवासामुळेच माझा ग्राफिक्स डिझायनर,पत्रकार,स्क्रीप्ट राईटर असा प्रवास होत गेला..
तुमची सुख दुःखा मिळालेली कायम साथ खरोखर माझ्यासाठी महत्वाची आहे... बाप्पू,बेहोशी,जेष्ठ पत्रकार कुमार केतकर अशी दिवसातून दहा ते विस वेळेस हाक कानी पडली नाही तर या जीवाला चैन मिळाला तर नवल... दुसरे व्यक्तिमत्व महत्व म्हणजे संपादक पुरुषोत्तम सांगळे हे होय. बाप्पू लिखाण खूपच भारी करतो.. बातमी लिहतांना व्याकरणाकडे दुर्लक्ष होता काम नये. तुझे लिखाण आता बहुआयामी होत आहे. तुझ्या लिखाणाला तोड नाही असे म्हणून नेहमी उत्साह वाढविणा-या दोन मित्रांना खूप खूप धन्यवाद...
आपलाच बंधु
संतोष

1 टिप्पणी: