मेहकर तालुक्यातील देऊळगांव माळी येथील होतकरू विद्यार्थीनी
श्वेता जगन वाघमारे हिच्या पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिक्षक ज्ञानदेव आनंदा बळी यांनी १० हजाररूपयांची मदत केल्याची सावित्रीच्या लेकीला लाभला गुरूचा शैक्षणिक आधार या मथळयाखाली दैनिक सकाळने दि. ३ ऑगस्ट रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून श्वेताच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. दैनिक सकाळचे वृत्त प्रकाशित होताच समाजातील दानशूर व्यक्ती श्वेता वाघमारेच्या शैक्षणिक मदतीला सरसावले. देऊळगांव माळी येथील होतकरू विद्यार्थिनी श्वेता वाघामारे हिने घरीच्या प्रतिकूल परिस्थितीत आपले महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवले. शिक्षण घेवून उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न श्वेताला स्वस्थ बसू देत नव्हते. कु. श्वेताची शिक्षण घेण्यासाठी धडपड लक्षात घेत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून देऊळगांव माळी येथील विठु माऊली बचत गटा अंतर्गत संतोष सावळकर सर, टी.एल.मगर सर, रमण जैन, संतोष जैन, डॉ. शिवशंकर बळी व ज्ञानदेव बळी सर यांनी ६५०० रुपये, पतंजली योग प्राणायाम समिती देऊळगाव माळी यांच्या वतीने ३००० रुपये, श्री पांडुरंग संस्थान च्या वतीने २००० रुपये याशिवाय रामेश्वर बळी, राजेश बळी, बि.के.सुरुशे, अभिमन्यू मगर, त्र्यंबक मगर यांनी मदत केली. सामाजिक जाणीवेतून श्वेताजगन वाघमारे हीला जवळपास २७००० रुपये दिले आहे.
घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे मला महाविद्यालयीन शिक्षण घेतांना शैक्षणिक अडचणी येत होत्या. मात्र समाजातील दानशूर व्यक्तीने केलेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
श्वेता जगन वाघमारे विद्यार्थीनी देऊळगांव माळी
दैनिक सकाळचे मानले आभार
दैनिक सकाळचे वृत्त प्रकाशित झाल्याने श्वेताच्या शिक्षणासाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येवून कु. श्वेता जगन वाघमारे च्या महाविद्यालयीन शैक्षणिक मदतीला धावून आले. श्वेताच्या कुटूंबीयांनी दैनिक सकाळ समूहाचे यावेळी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा