शेती पुरक जोडधंदा म्हणून दुध व्यवसायाकडे अनेक शेतकरी बांधवांचा कल वाढला आहे. चारा हा दुधाळ जनावरांसाठी अत्यंत महत्वाचा घटक आहे. सकस चा-यामुळे जनावरांचे पोषण होवून दुधदेण्याच्या क्षमतेत वाढ होते. चा-याची पौष्टीकता वाढीसाठी व चारा जास्त दिवस टिकण्यासाठी चा-यावर युरीया उपचार पध्दती चे प्रात्याक्षिक विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कृषीपुत्र गु्रपच्याविद्यार्थ्यांनी लव्हाळा येथील शेतक-यांना करून दाखविले. यावेळी अशोक लहाने,दिपक लहाने,विकास डुकरे,मोतीराम गारोळे,पंढरी शेळके,श्याम कुहिरे,चंद्रभान लहाने यांचे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
चा-यावर युरीया उपचार पध्दतीचा वापर केल्यामुळे जनावरांना योग्य प्रमाणात पोषकतत्व मिळतात. या चा-यामुळे जनावरांच्या पोटातील नायट्रोजन हा प्रोटीन मध्ये रूपांतरीत होतो. तसेच कार्बोहाड्रेड लवकर पचतनसल्याने युरीया उपचारीत चारा खाल्याने योग्य परिणाम दिसून येतो. हा चारा खाल्याने जनावरांची पचनशक्ती वाढते व पचनक्रिया सुरळीत होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीपुत्र ग्रुप मध्ये सागर सोमटकर,अजय चिंचोले,ॠषिकेश शेळके,वैभव जाधव,प्रसाद घरपाहुणे,आकाश ढोणे,साई तेजा,साई सतिष,राजेश्वर रेड्डी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीपुत्र ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
अशी आहे युरिया चारा उपचार पध्दती.
शेतक-यांनी प्रथम १०० किलो गव्हाचे कुटार ताडपत्रीवर आच्छादीत करावे. त्यानंतर त्यावर पाणी शिंपडावे. त्यानंतर ४० लिटर पाण्यामध्ये २ किलो युरीया,१० किलो गुळ आणि २ किलो मिठ यांचे मिश्रम एकरूप होई पर्यंतहलवावे. हे मिश्रम गव्हाच्या कुटाराच्या थरा वरती फवारावे. पुन्हा एक गव्हाच्या कुटाराचा थर करून त्यावर हे मिश्रण फवारावे. हा गव्हाचा चारा २५ ते २८ दिवस झाकून ठेवावा.
युरीया उपचारीत चारा हा शेतकरी बांधवांच्या दुधाळ जनावरांसाठी वरदान आहे. सहा महिन्याच्या जनावरांना युरीया उपचारीत चारा देणे टाळावे. युरीया उपचारीत चारा खाल्याने जनावरांची वाढ अधिक गतीने होते.
डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषि महाविद्यालय
वाळलेल्या चा-यामध्ये पोषकतत्वाचे प्रमाण कमी असते.आणि उपचारीत चा-यामध्ये पोषकतत्व जास्त प्रमाण असते. उपचारीत चा-यामुळे दुधाची आणि वासराची वाढ झपाटयाने होते.
ॠषिकेश शेळके, विवेकानंद कृषी महाविद्यालय
संतोष श्री. थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा