Responsive Ads Here

सोमवार, २७ ऑगस्ट, २०१८

मेहकर चिखली रस्त्यावरील खड्डयामध्ये बेशरमचे झाड लावून आंदोलन




गेल्या पाच ते सहा महिन्यापासून मेहकर चिखली रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे नविन काम झपाटयाने होत असेल तरी  या रस्त्यावर जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामुळे दुचाकीस्वार प्रवाशांना अनेक अडचणींना सामाना करावा लागत आहे. सद्या पावसाळयाचे दिवस असून पावसामुळे या रस्त्यावरील खड्डयामध्ये पाणी साचून मोठया प्रमाणात चिखल होतो त्यामुळे दुचाकीस्वारांपासून ते वाहनधारकांना या मोठया खड्डयामुळे अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळीस मेहकर चिखली रस्त्यावरून प्रवास करणाèया अनेक वाहनधारकांचा अपघात होतात. मेहकर चिखली रस्त्यावरील मोठ मोठया खड्डयाबाबत ठेकेदार यांना तोंडी सुचना देवून सुध्दा त्या सुचनांची अमंबजावणी होत नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे. रविवारी दि-२६ रोजी स्वराज्य मित्र मंडळाने मेहकर चिखली रस्त्यावरील खड्डयामध्ये बेशरमचे झाडे लावून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामध्ये स्वराज्य मित्र मंडाळा चे अमोल सिताराम म्हस्के,विजय चव्हाण,नागेश कुसळकर, बबलु धंदर,मुनिर शहा,राहूल म्हस्के,शुभम वानखेडे,बापू कांबळे,रवी जाधव,शांताराम धंदर,गोqवद अवसरमोल,बंडा कंकाळ,मंगेश काकडे,हर्षदीप गवई,गजानन नवघरे,दिपक पंचाळ,निलेश देव्हडे,अनिल डव्हळे,राजू चव्हाण तथा स्वराज्य मित्रमंडाळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.

भाविक पर्यटकांची गैरसोय

मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे  श्रावण महिन्यात भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी असते. श्रावण महिन्यात हिवरा आश्रम येथील हरिहर तीर्थ ओलांडेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी  हजारो भाविक भक्त दर्शन पुजनासाठी येतात. मेहकर चिखली रोडवर असलेल्या मोठया खड्डयामुळे पावसाळयात दुचाकीस्वारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मेहकर चिखली रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. या खड्डयामध्ये पावसाळयाच्या दिवसामध्ये पाणी साचल्याने चिखल होतो. त्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी संबधित ठेकेदारांनी लवकरात लवकर मेहकर चिखली रस्त्यावरील मोठे  खड्डे बुजवावे.
                                 अमोल म्हस्के,स्वराज्य मित्रमंडळ ब्रम्हपूरी

संतोष श्रीथोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा