Responsive Ads Here

रविवार, २३ डिसेंबर, २०१८

''फरिश्तो'' से बढकर है यहा ''इन्सान'' बनना !



आपल्या अबोल डोळयांनी,निरागस हास्याने व बोबडया बोलांनी कुणालाही तो लहानपणी सहज आपल करून टाकायचा... त्याच्या सहवासात एकदा कुणी आलं म्हणजे मग तो नकळतचं त्यांचा झाला म्हणून समजा ! प्रेमळ स्वभाव व संवेदनशील मन हा त्यांच्या व्यक्तीमत्वाचा स्थायी भाव... लहानपणापासून नाविण्यपूर्ण गोष्टी करण्याची सवय त्याला जडली होती... खेळणी असो की बॅटरी असो ती एकदा खोलून त्यांच्या आत काय ? हे बघण्याचे कुतूहल व जिज्ञासा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती...कदाचित हाच त्याचा स्वभाव त्याला वेळोवेळी यशाच्या अनेक वाटा मोकळया करून देण्यासाठी तितक्याच मोलाच्या ठरल्या... वडील बंधू विजय थोरहाते यांनी २००१ च्या दरम्यान नवीन कॉम्प्युटर विकत घेतला होतो. दादा,‘‘मला कॉम्प्युटर शिकण ना ! म्हणून हट्ट करणारा पवन आज सुध्दा डोळया समोर उभा राहतो... बाबा,‘मी एम.एस.आय.टी. पास झालो ! म्हणून त्याने दिलेला कुटूंबीयांचा आनंदाचा सुखद धक्का किती आनंद देवून गेला तो क्षण शब्दात मांडणे कठीणच ! घरातील प्रत्येकाला तो दिसला नाही की, काही क्षण हरविल्या सारख वाटत होते... अरे आज पवन कुठे आहे, अशी विचार आम्हा भावंडांना वडीलाधारी मंडळी करीत असे...प्राथमिक शाळेत नाव टाकल्या नंतर पवनची अभ्यासात गोडी लागली...आपण अभ्यास करून काही तरी यशप्राप्त करण्याची मनिषा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.. दहावी,बारावीच्या निकाला नंतर पवन पेढा घेवून कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांकडे गेला तेंंव्हा,शाब्बास !! म्हणून त्यांच्या पाठीवर थाप दिली. पवन, खूप शिक्षण घे ! मोठा हो !! असा आशिर्वाद दिला.
पवन,‘‘ तू बाहेर शिकायला जाण्यापेक्षा आपल्या येथेच कृषी महाविद्यालयात प्रवेश घे! असा सल्ला आत्मानंद भाऊंनी दिला. कुटूंबीयांना आत्मानंद भाऊचा सल्ला पटला व सर्वांचे एकमत झाले. विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कृषीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जालंधर शिक्षण घेतांना आत्मानंद भाऊ व मला फोन करून दादा,अरे येथे मन लागत नाही रे! असे नेहमीच फोन करून सांगत होता.
मात्र पवन शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय घरी येवून नको नाही तर बघ ! आत्मानंद भाऊंनी दिलेला सल्ला त्याला पटला.
भीड़ में खड़ा होना मकसद नहीं है मेरा
बल्कि भीड़ जिसके लिए खड़ी है वह बनना है मुझे !
वरील कवीते प्रमाणे मनाशी खुणगाट बांधली..आता घरी परतायचे ते यशस्वी होवूच या मतावर तो ठाम झाला. नंतर तो घरी आला तो उत्तीर्ण होवूच... विवेकानंद कृषी महाविद्यालयात प्राध्यापक पदी रजू झाल्यावर कुटूंबीयांना व आम्हा भावंडांना खूप समाधान व आनंद झाला.
पवन आज तुझा वाढदिवस एक आनंदाचा क्षण..आयुष्यात पावलोपावली तुला यश,सुख व समृध्दी लाभत जावो ही कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज चरणी प्रार्थना...
तुझा बंधू
संतोष थोरहाते,
विवेकानंद नगर,हिवरा आश्रम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा