विवेकानंद आश्रमाचे कार्य वृंध्दीगत होत राहणार -डॉ.रवींद्र कोल्हे




विवेकानंद आश्रम ही समाजोपयोगी काम करणारी मोठी संस्था आहे. संस्थेला भेट देण्याची अनेक वर्षापूर्वीची इच्छा आज पूर्ण झाली. संस्थेच्या सुंदर,स्वच्छ व भावपूर्ण परिसराचे दर्शन झाले. अत्यंत तळमळतेने सुरू केलेले कार्य मानव समाजासाठी निश्चितच उपयुक्त आहे. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी सुरू केलेले हे कार्य वृंध्दीगत होत राहणार असल्याचे विचार सुप्रसिध्द समाजीक कार्यकर्ते डॉ. रवींद्र  कोल्हे यांनी विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेटी प्रसंगी बुधवारी ता.१९ रोजी काढले.  विवेकानंद आश्रमात  दुपारी एक वाजता त्यांचे आगमन झाले. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यांची विदर्भाच्या विकासासाठी संस्थेने शेतकèयासाठीचे काही संशोधनात्मक प्रकल्प सुरू करावेत त्यासाठी मी संस्थेच्या सोबत असेल असेही विचार त्यांनी त्यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विवेकानंद आश्रमाव्दारे सुरू असलेल्या विविध सेवाभावी उपक्रमांना भेटी देऊन समाधान व्यक्त केले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,अभिषेक आकोटकर तथा आदी हजर होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा