दिव्यांगांनी स्वतःवर आत्मविश्वास ठेवल्यास दिव्यांग सुध्दा आपल्या कष्टाच्या व मेहनतीच्या जोरावर कुठल्याही व्यवसायात प्रगती साधू शकतात हे दाखवून दिले आहे. दिव्यांगांनी रोजगाराच्या संधीची वाट न पाहतारोजगार कसा निर्माण होईल याकडे लक्ष केंद्रित केल्यास दिव्यांगांचे जीवन आनंदी झाल्याशिवाय राहत नाही.
गोळया बिस्किटाचे फिरते दुकान
हिवरा आश्रम येथील दिव्यांग संजय कांबळे हे कल्पक बुध्दमत्तेचे धनी आहेत. तीन चाकी सायकलवरती सुध्दा गोळया बिस्किटाची फिरती दुकानाची त्यांना कल्पना सुचली. तीन चाकी सायकलवरती गोळया बिस्किटच्याभरणी बसतील अशाप्रकारचे लोखंडी रॅक तयार केले. तीन चाकी सायकलवरील फिरत्या गोळया बिस्किटच्या दुकानामुळे त्यांना मोठा फायदा झाला.
दिव्यांगांनी थोडयाशा अपयशाने हताश,निराश न होता आत्मविश्वासाने कुठलाही व्यवसाय सुरू केला तर तो यशस्वी होतो. दिव्यांगांनी आपल्यातील न्यूनगंड दूर केल्याशिवाय प्रगती साधता येत नाही याकडे लक्ष देणेगरजेचे आहे.
संतोष श्री. थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा