विवेकानंद विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड



शोध आणि बोध म्हणजे शिक्षण ही शिक्षणाची अत्यंत साधी,सरळ व्याख्या कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजश्रींनी बोधवचने या ग्रंथात वाचायला मिळते. शिक्षणाने समाजाचे मोठया प्रमाण परिवर्तन होते.किंबहूना  शिक्षण हे परिवर्तनाचे शस्त्र आहे. विद्यार्थ्यांची बौध्दीक क्षमता विकसीत करण्यासाठी मुळ संकल्पना स्पष्ट होणे तितकेच महत्वाचे असते.  ग्रामीण भागातील हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजश्रींनी विवेकानंद विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाची सुरूवात केली.दर्जेदार शिक्षण,गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा,अभ्यासपूरक वातावरण समर्पित शिक्षक यामुळे विवेकानंद विद्या मंदिरातून उर्तीण होणारे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवितात.विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक ज्ञानसंकुल हे आदर्श भावी पिढी निर्मितीसाठी उभारलेले ज्ञान मंदिर आहे. विवेकानंद विद्या मंदिरातील विद्याथ्र्यांना समर्पित भावनेने शिकविणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सदैव तत्पर असतात. विवेकानंद विद्या मंदिराची दिनचर्या एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने मोलाची ठरते. कर्मयोगी .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम व्दारा संचालित विवेकानंद विद्या  मंदिरातील पाच विद्यार्थ्यांची शेगाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग वी साठी निवड झाली. जिद्द,चिकाट,परिश्रम करण्याची तयारी असल्यास कुठल्याही परिक्षेत यशस्वी होता येते या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखविले आहे. या  विद्यार्थ्यांची तयारी विवेकानंद विद्या मंदिराचे शिक्षक व्ही.डी.सुरडकर,पी.आर.नप्ते,जी.पी.गायकवाड,एस.एम.जटाळे या शिक्षकांनी करून घेतली. जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरलेल्या विद्याथ्र्यांचे विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव विष्णुपंत कुलवंत, आत्मानंद थोरहाते, शाळेचे मुख्याध्यापक अणाजी सिरसाट, उपमुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे, पर्यवेक्षक अशोक गिèहे, आत्माराम जामककर तसेच विद्या मंदिरातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विद्या मंदिराच्या पाच विद्यार्थ्यांची निवड
जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नयन शिवाजी गवई,अभिषेक शिवाजी देवकर, प्रणव विवेक गव्हाळे, कु.जान्हवी एकनाथ आव्हाळे,कु.श्रुती सतिष म्हस्के सदर विद्यार्थी जवाहर नवोदयच्या प्रवेशासाठी पात्र ठरले.ग्रामीण भागातील कुठल्याही शिकवणी वर्गाशिवाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खरोखर कौतुकास पात्र आहेत.

संतोष श्री. थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा