Responsive Ads Here

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

बुद्धिस्तोत्र



याज्ञवल्क्य उवाच
कृपां कुरु जगन्मातर्मामेवं हततेजसम् ।
गुरुशापात्स्मृतिभ्रष्टं विद्दाहीनं च दुःखितम् ॥ १ ॥
ज्ञानं देहि स्मृतिं विद्दां शक्तिं शिष्यप्रबोधिनीम् ।
ग्रंथकर्तृत्वशक्तिं च सुशिष्यं सुप्रतिष्ठितम् ॥ २ ॥
प्रतिभां सतसभायां च विचार क्षमतां शुभाम् ।
लुप्तं सर्वं दैवयोगान्नवीभूतं पुनः कुरु ॥ ३ ॥
यथांकुरं भस्मनि च करोति देवता पुनः ।
ब्रह्मस्वरुपा परमा ज्योतीरुपा सनातनी ॥ ४ ॥
सर्व विद्दाधिदेवी या तस्यै वाण्यै नमोनमः ।
विसर्गबिंदुमात्रासु यदधिष्ठानमेव च ॥ ५ ॥
तदधिष्ठात्री या देवी तस्यै नित्यै नमोनमः ।
व्याख्यास्वरुपा सा देवी व्याख्याधिष्ठातृरुपिणी ॥ ६ ॥
यया विनाप्रसंख्यावान संख्यां कर्तुं न शक्यते ।
कालसंख्यारुपा या तस्यै देव्यै नमोनमः ॥ ७ ॥
भ्रमसिद्धान्तरुपा या तस्यै देव्यै नमोनमः ।
स्मृतिशक्ति ज्ञानशक्ति बुद्धिशक्ति स्वरुपिणी ॥ ८ ॥
प्रतिभा कल्पनाशक्तिर्या च तस्यै नमोनमः ।
सनत्कुमारो ब्रह्माणं ज्ञानं पप्रच्छ यत्र वै ॥ ९ ॥
बभूव मूकवन्सोपि सिद्धान्तं कर्तुमक्षमः ।
तदा जगाम भगवानात्मा श्रीकृष्ण ईश्र्वरः ॥ १० ॥
उवाच स च तां स्तौहि वाणिमिष्टां प्रजापते ।
स च तुष्टाव तां ब्रह्मा चाज्ञया परमात्मनः ॥ ११ ॥
चकार तत्प्रसादेन तदा सिद्धान्तमुत्तमम् ।
यदाप्यनंतं पप्रच्छ ज्ञानमेकं वसुंधरा ॥ १२ ॥
बभूव मूकवत्सोपि सिद्धान्तं कर्तुमक्षमः ।
तदा तां च तुष्टाव संत्रस्त कश्यपाज्ञया ॥ १३ ॥
 ततश्र्चकार सिद्धान्तं निर्मलं भ्रमभंजनम् ।
व्यासः पुराणसूत्रं च पप्रच्छ वाल्मीकिं यदा ॥ १४ ॥
मौनीभूतश्र्च सस्मार तामेव जगदंबिकाम् ।
तदा चकार सिद्धान्तं तद्वरेण मुनीश्र्वरः ॥ १५ ॥
संप्राप्य निर्मलं ज्ञानं भ्रमांधध्वंसदीपकम् ।
पुराणसूत्रं श्रुत्वा च व्यासः कृष्णकलोद् भवः ॥ १६ ॥
तां शिवां वेद दध्यौ च शतवर्षं च पुष्करे ।
तदा त्वतो वरं प्राप्य सत्कवींद्रो बभूव ह ॥ १७ ॥
तदा वेदविभागं च पुराणं च चकार सः ।
यदा महेन्द्रः पप्रच्छ तत्वज्ञानं सदाशिवम् ॥ १८ ॥
क्षणं तामेव संचिंत्य तस्मै ज्ञानं ददौ विभुः ।
पप्रच्छ शब्दशास्त्रं च महेंद्रश्च बृहस्पतिम् ॥ १९ ॥
दिव्यं वर्षसहस्रं च सा त्वां दध्यौ च पुष्करे ।
तदा त्वत्तो वरं प्राप्य दिव्यंवर्षसहस्रकम् ॥ २० ॥
उवाच शब्दशास्त्रं च तदर्थं च सुरेश्र्वरम् ।
अध्यापिताश्च ये शिष्या यैरधीतं मुनीश्वरैः ॥ २१ ॥
ते च तां परिसंचिंत्य प्रवर्तते सुरेश्वरीम् ।
त्वं संस्तुता पूजिता च मुनीद्रैर्मुनिमानवैः ॥ २२ ॥
 दैत्येंद्रैश्चसुरैश्र्चापि ब्रह्मविष्णुशिवादिभिः ।
जडीभूतः सहस्रास्यः पंचवक्त्रश्चतुर्मुखः ॥ २३ ॥
यां स्तौतुं किमहं स्तौमि तामेकास्येन मानव: ।
इत्युक्त्वा याज्ञवल्क्यच भक्तिनम्रात्मकंधरः ॥ २४ ॥
प्रणनाम निराहारो रुरोद च मुहुर्मुहुः ।
ज्योतीरुपा महामाया तेन दृष्टाप्युवाच तम् ॥ २५ ॥
सुकवींद्रो भवेत्युक्वा वैकुंठं जगाम हे ।
याज्ञवल्क्यकृतं वाणीस्तोत्रमेतस्तु यः पठेत् ॥ २६ ॥
सुकवींद्रो महावाग्मी बृहस्पतिसमो भवेत् ।
महामूर्खश्च दुर्बुद्धिर्वर्षमेकं यदा पठेत् ।
स पंडितश्च मेघावी सुकवींद्रो भवेद् ध्रुवम् ॥ २७ ॥ ॥
इति श्रीयाज्ञवल्क्य विरचितं बुद्धिस्तोत्रम् संपूर्णम् ॥ 

 मराठी अर्थः

याज्ञवल्क्य ॠषी म्हणाले:
१) हे सरस्वती माते, गुरुंच्या शापामुळे मी स्मृतिहीन, विद्याहीन होउन अतिदुःखी आणि तेजहीन झालो आहे. माझ्यावर तू कृपा कर.
२-३) मला ज्ञान, स्मृति, विद्या, शिष्यांना प्रबोधन करण्याची शक्ती, ग्रंथकर्तृत्व शक्ती, प्रतिष्ठित, उत्तम शिष्यवर्ग, सज्जन, विद्वानांच्या सभेंत सुंदर विचारक्षमता दे. माझ्या दैवयोगामुळे हे सर्व लुप्त झाले आहे. तू त्याचे माझ्याठिकाणी पुनरुज्जीवन कर.
४-५-६) देवता या राखेंतूनसुद्धा अंकुर निर्माण करतात, त्याप्रमाणे तू माझे सर्व मला परत मिळवून दे. ब्रह्मस्वरुप, परमज्योतिस्वरुप, सनातन आणि सर्व विद्यांची देवता, वाणीस्वरुप सरस्वतीला माझा नमस्कार असो. हे सरस्वती, विसर्ग, अनुस्वार, मात्रा यांचे अधिष्ठान असे अक्षर, त्याची अधिष्ठात्री देवी तूच आहेस तूला मी नेहमी नमस्कार करतो. व्याख्यारुप आणि व्याख्येची अधिष्ठात्री देवी तूंच आहेस.
 ७) हे देवी, फार मोठी अशी संख्या तुझ्यावाचुन करता येणे अशक्य आहे. कालसंख्यारुपी अशा देवी तूला माझा वारंवार नमस्कार असो.
 ८-११) भ्रम-सिध्दांतरुपी अशा देवी तूला माझा वारंवार नमस्कार असो. हे देवी, तूच स्मृतिशक्ति, ज्ञानशक्ति आणि बुद्धिशक्ति स्वरुपिणी आहेस. प्रतिभा आणि कल्पनाशक्ति अशा देवी तूला माझा वारंवार नमस्कार असो. सनत्कुमाराने ब्रह्मदेवाला ज्ञानाविषयी विचारले असता तो सांगायला जाताच मुका झाला. म्हणुन तो भगवान श्रीकृष्णाकडे गेला असता त्याला भगवानानी ते सर्व सरस्वतिची स्तुती करुन वाग्देवतेला विचारावयास त्याला सांगितले. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सरस्वतिचे स्तवन केल्यावर तिच्या कृपेने त्याला निश्चित ज्ञान प्राप्त झाले.
१२-१६) पृथ्वीने ज्ञान प्राप्तीच्या ईच्छेने शेषाला विचारले असता तोही मुका झाला, तेव्हां त्याने कश्यपऋषींच्या सांगण्याप्रमाणे सरस्वतीची स्तुती केल्यावर त्याचा भ्रम नाहीसा होऊन त्याला निर्मळ ब्रह्मज्ञानाची सरस्वती कृपेने प्राप्ती झाली. व्यासऋषीनी पुराणे आणि सूत्रांविषयी वाल्मिकीना विचारले असता तेसुद्धा मुक झाले. त्यानी जगदंबेचे स्मरण केल्यावर ज्ञानप्राप्ती होऊन मगच व्यासांचे समाधान त्याना करता आले. व्यासांनी वाल्मिकींकडून पुराणे आणि सूत्रांविषयी ज्ञान प्राप्त करुन घेतल्यानंतर सरस्वतीचे पुष्करक्षेत्री शंभरवर्षे ध्यान केले आणि नंतर ते सरस्वतीच्या कृपेने कविे श्रेष्ठ झाले.
१७-२०) मग व्यासानी वेदांचे वर्गीकरण केले आणि पुराणे रचिली. महेन्द्राने शंकराकडे ज्ञानाविषयी विचारले तेव्हां त्याने सरस्वतीचे ध्यान करुन तिच्या कृपेने ज्ञान प्राप्ती करुन घेतली आणि महेन्द्राची जिज्ञासा पुरी केली. बृहस्पतिला महेन्द्राने शब्दशास्त्राविषयी विचारले असता बृहस्पतीने दिव्य सहस्रवर्षे तप करुन सरस्वतीला प्रसन्न करुन घेऊन तिच्या कृपेने इंद्राला शब्दशास्त्राचे ज्ञान दिले.
२१) देवेन्द्राने ज्या शिष्यांना व्याकरणशास्त्राचे ज्ञान दिले, त्यानीसुद्धा अध्यापन करताना सरस्वतीचे ध्यान केले आणि तिच्या कृपेने ते आपापल्या कार्यास उद्दुक्त झाले.
२२-२७) हे देवि! श्रेष्ठमुनि, मनु, मानव, दैत्यराज, ब्रह्मा-विष्णु-महेश आदि सर्व देवांनीही तुझे स्तवन केले आहे. तुझे स्तवन करण्यास सहस्रमुख शेषनाग, पंचमुख शंकर आणि चतुर्मुख ब्रह्मदेव जडीभूत झाले, असे असता माझ्यासारखा यःकिंचित मानव तुझे स्तवन कसे बरे करु शकेल? असे बोलून याज्ञल्क्यमुनी भक्तीभावाने देवी सरस्वती समोर विनम्र झाले. नंतर ते देवीची कृपा व्हावी म्हणुन वारंवार तीला नमस्कार करत, निराहार राहून स्फूंदूनस्फूंदून रडू लागले. त्यानंतर ती ज्योतिरुप, महामाया सरस्वती त्याच्यासमोर प्रगट झाली व त्याला म्हणाली, हे याज्ञवल्क्य मुनी तू माझ्या कृपेने उत्तम कवि होशिल. असे बोलून लगेचच ती वैकुंठास निघुन गेली. याज्ञवल्क्य मुनिनी केलेले हे स्तोत्र जो कोणी म्हणेल तो बृहस्पतीसारखा महान विद्वान आणि उत्तम कवि होईल. जर एखादा महामूर्ख किंवा जडबुद्धि असेल आणि हे स्तोत्र तो वर्षभर म्हणेल तर तो निश्चयाने कवि, बुद्धिमान व पंडित होईल.
अशा प्रकारे याज्ञवल्क्यमुनीनी रचिलेले हे बुद्धिस्तोत्र संपूर्ण झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा