साष्टांग नमन हे
माझे गौरीपुत्रा विनायका ।
भक्तीनें स्मरतो
नित्य आयुःकामार्थ साधती ॥ १ ॥
प्रथम नांव वक्रतुंड
दुसरें एकदंत ते ।
तिसरे कृष्णपिंगाक्ष
चवथे गजवक्र ते ॥ २ ॥
पांचवे श्रीलंबोदर
सहावें विकट नांव ते ।
सातवे विघ्नराजेंद्र
आठवे धुम्रवर्ण ते ॥ ३ ॥
नववे श्री भालचंद्र
दहावे श्री विनायक ।
अकरावे गणपती बारावे
श्री गजानन ॥ ४ ॥
देवनांवे अशी बारा
तीन संध्या म्हणे नर ।
विघ्नभीती नसे
त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ ५ ॥
विद्यार्थ्याला मिळे
विद्या धनार्थ्याला मिळे धन ।
पुत्रार्थ्याला मिळे
पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ ६ ॥
जपता गणपती स्तोत्र
सहा मासांत हे फळ ।
एक वर्ष पुर्ण होतां
मिळे सिद्धी न संशय ॥ ७ ॥
नारदांनी रचिलेले
झाले संपू्र्ण स्तोत्र हें ।
श्रीधराने मराठींत
पठण्या अनुवादिले ॥ ८ ॥
॥ श्रीगणपती स्तोत्र
संपूर्ण ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा