Responsive Ads Here

गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९

विवेकानंद आश्रमाच्या संस्कारांनी घडलो-प्राचार्य अणाजी सिरसाट


कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या शैक्षणिक संस्थेत कार्य करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयामध्ये उभे केलेले सेवाकार्य भावी पिढीसाठी प्रेरणादायी  आहे. विवेकानंद आश्रमाच्या संस्कारांनी घडलो असे विचार विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक अणाजी सिरसाट यांनी सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी रोजी बोलतांना काढले.
यावेळी मुख्याध्यापक अणाजी सिरसाट व सौ. विजया सिरसाट,डॉ.विनायक सिरसाट यांचा विवेकानंद आश्रमाच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते यांच्यासह विश्वस्त नारायण भारस्कर,अशोक गि-हे,पुरूषोत्तम आकोटकर,प्राचार्य पंढरीनाथ शेळके,हभप निवृत्तीनाथ येवले,हभप विष्णु थुट्टे,ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती qशदे,माजी विश्वस्त मा.बा.केंदळे,सेवा निवृत्त केंद्र प्रमुख वसंतराव काळे, पत्रकार समाधान म्हस्के पाटील,संतोषबापू थोरहाते,सदाशिव काळे तथा आqदची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक आत्माराम जामकर  तर सूत्रसंचालन भगवान राईतकर  तर आभार प्रदर्शन अशोक गि-हे यांनी केले.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

हिवरा आश्रमचा विवेकानंद जन्मोत्सव झाला ग्लोबल !


येथील विवेकानंद आश्रमाच्यावतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याने आता जागतिक भरारी घेतली आहे. २५  ते २७  जानेवारी २०१९  असे तीन दिवस हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे लाईव्ह प्रदर्शन युट्यूब, फेसबूक व ट्वीटर या सोशल माध्यमांच्याद्वारे विवेकानंद आश्रमाच्या वेब चॅनलमार्फत करण्यात आले होते. तब्बल ४०  सलग सत्रांतून एक लाख ७५ हजार दर्शकांनी हा सोहळा ऑनलाईन पाहिला असल्याची नोंद झाली आहे. तीनही दिवस ४८ तांस हे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले होते. केवळ भारतच नव्हे तर युरोप व आशिया खंडातील शहरांत हा सोहळा ऑनलाईन पाहिला गेल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली.
विवेकानंद आश्रमाच्या मीडिया व पब्लिक रिलेशन विभागाच्यावतीने विवेकानंद आश्रमाचे प्रचार-प्रसार कार्य चालविले जाते. हाच विभाग आश्रमाचे वेब चॅनेल तसेच लाईव्ह प्रक्षेपणाचे काम पाहतो. विवेकानंद जन्मोत्सव हा जगभर प्रसिद्धीस पावलेल्या महोत्सव असून, या सोहळ्यासाठी राज्यभरासह विदेशातील विविध भागातून भाविक येत असतात. शेवटच्या दिवशी बसणारी महापंगत ही आता जगभर कुतूहलाचा विषय बनली आहे. देश-विदेशातील भाविकांसह राज्यातील भाविकांना हा सोहळा ऑनलाईन पाहाता यावा, यासाठी तीनही दिवस अहोरात्र प्रक्षेपण केले जाते. त्यानुसार दि. २५  ते २७ जानेवारी २०१९  दरम्यान तब्बल ४० सलग सत्रांतून दिवसाचे १६  तांस असे तीन दिवसांत ४८  तांस या सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले. या तीनही दिवस मिळून एक लाख ७५ हजार दर्शकांनी हा सोहळा स्मार्टफोन, संगणक, टॅब वा तत्सम साधनांद्वारे पाहिला आहे. त्यामध्ये बहुतांश दर्शक हे युरोप व आशिया खंडातील आहेत. गतवर्षी हा संख्या पाऊण लाखाच्या घरात होती.
विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त तीनही दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण इंटरनेटद्वारे दाखविण्यात आले, तद्वतच ते राष्ट्रीय वृत्तवाहिन्या व स्थानिक वाहिन्यांद्वारेही दाखविण्यात आले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत विवेकानंद आश्रमाला सरासरी दोन लाख दर्शक लाभले असल्याचेही आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी सांगितले. तसेच, या सोहळ्यासाठी तब्बल अडिच लाख भाविकांची उपस्थिती पाहाता, साधारणतः साडेचार लाख भाविकांनी विवेकानंद जन्मोत्सवाचा लाभ घेतला असेही निदर्शनास येते, असेही श्री गोरे म्हणाले.

सोहळा जगभर पोहोचत असल्याचा आनंद

युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांचे विचार, पू. शुकदास महाराज यांचे कार्य आणि त्यांचा मानवहितैषी संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विवेकानंद जन्मोत्सव सोहळा हा प्रमुख उपक्रम आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा सोहळा जगभर पोहोचत असल्याने विवेकानंद आश्रमाचे कार्य सर्वदूर पोहोचत असल्याबाबत विशेष आनंद वाटतो.
                       आर. बी. मालपाणी,अध्यक्ष विवेकानंद आश्रमाचे 



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

कर्मयोगी संत शुकदास महाराज परिवर्तनवादी संत- शिवाजी घोंगडे


कर्मयोगी संत शुकदास महाराजांना बालवयात जीवनाचे मुळ धर्म माणूसकीत आहे याची जाणीव झाली आणि ईश्वराचा पत्ता सापडला, तो मानव सेवेत. पुढे ते म्हणाले  आपण जीवंत आहोत  ना त्यापेक्षा महाराजश्री कितीतरी अधिक पटीने  जीवंत आहेत. अंत झाला तो त्यांच्या शरिरचा विचारांचा नाही. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज परिवर्तनवादी संत असल्याचे विचार शिवाजी घोंगडे यांनी न संपलेला अस्त पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयाच्या प्रसंगी रविवारी ता.२७ रोजी बोलतांना काढले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,जेष्ठ विश्वस्त दादासाहेब मानघाले, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णुपंत कुलवंत, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, हभप गजाननदादा शास्त्री महाराज, द.ना.धाडकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुढे बोलतांना घोंगडे म्हणाले की, शुकदास महाराजांच्या विचारांची पातळी खूप उंच गेली होती त्यामुळे त्याच्या जवळ कोणताच भेदभाव उरला नव्हता. त्यांचे जगणे परिवर्तनवादी होते. त्यांनी उभे केले कार्य समाजाच्या उत्कर्षाचे होते. भेदभाव विरहीत मानवावर प्रेम हे त्यांच्या कृतीतून परिवर्तन होते. असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते. 


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


शुक्रवार, २५ जानेवारी, २०१९

ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही : गजाननदादा शास्त्री



जग हे ज्ञानामुळे समृद्ध झाले आहे. ज्ञानामुळेच जीव मुक्तीची प्राप्ती करू शकतो. विज्ञानाची प्रगती आणि मानवमुक्तीची उच्चावस्थाही ज्ञानातूनच साध्य होऊ शकली. म्हणून ज्ञानापेक्षा जगात काहीही श्रेष्ठ नाही, असे प्रतिपादन वेदाताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री यांनी केले. शुक्रवारी विवेकानंद जयंती महोत्सवानिमित्त आपल्या व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना गजाननदादा बोलत होते.
आपल्या रसाळ व मंत्रमुग्ध करणाèया व्याख्यानात गजाननदादा शास्त्री म्हणाले, जगाने भौतिक प्रगतीची शिखरे गाठली असल्याचे आजकाल दिसत आहे. ही प्रगती व सर्व शोध ज्ञानामुळेच लागले आहेत. ज्ञानामुळे मानवी जीवन जसे सुखाचे झाले, तसेच ज्ञानामुळेच त्याला ईश्वराचा शोध लागला. ईश्वराच्या शोधात गेलेल्या मानवाला ज्ञान हे अंतरंगात असल्याचे जाणवले, बुद्धी हे ज्ञानाचे वाहक आहे. जीवाला मुक्तीचा मार्ग ज्ञानामुळेच गवसला. जे ज्ञान मुक्ती प्रदान करते, तेच ज्ञान शाश्वत सत्य. तर जे ज्ञान मनुष्याला भौतिक सुखाची चटक लावते, ते ज्ञान विषासम आहे. पू. शुकदास महाराज यांनी दुःखाने ग्रस्त जीवांना आपल्या वैद्यकीय ज्ञानामुळे व्याधीमुक्त केले तसेच त्यांनी आपले उच्चकोटीचे अध्यात्मिक ज्ञान सर्वसामान्यांना देऊन या जीवांना मोक्षाचे धनीही बनविले, असेही गजाननदादा यांनी सांगितले.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी विश्वाला ज्ञान दिले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही, म्हणून ज्ञान हे श्रेष्ठ आहे. ज्ञानातून देवदेखील प्राप्त होतो, म्हणून ज्ञानाची कास धरा, असे सांगून गजाननदादा शास्त्री यांनी सांगितले, की संत हे प्रेमाचा सतत वाहणारे निर्झर आहेत. त्यांनी जगाला ज्ञान तर दिलेच, तद्वतच भरपूर प्रेमही दिले. ज्ञान हे श्रेष्ठ आहेच परंतु प्रेम हे ज्ञानापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहे. भक्ती, ज्ञान, कर्म या योगाद्वारे ईश्वरापर्यंत पोहोचता येते. त्यातील ज्ञानयोग हा शाश्वत योग आहे, असेही हभप. गजाननदादा यांनी सांगितले. 
पू. शुकदास महाराज यांच्या अनुभूति ग्रंथासह ज्ञानेश्वरांच्या ओव्या व तुकोबांच्या अभंगांचे मधुर गायन व बोलीभाषेतील जात्यावरील ओव्यांच्या गायनाने उपस्थित रसिकश्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

लोभ सोडला तर दुःखमुक्त होता येते : निवृत्तीमहाराज शास्त्री

जगात प्रत्येकजण दुःखी आहे. कारण, तो अज्ञानाचा सामना करत आहे. लोभ आणि अज्ञान सोडले तर दुःखमुक्त होता येते, असे प्रतिपादन हभप. निवृत्तीमहाराज शास्त्री यांनी केले. विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त आयोजित प्रवचनात श्री शास्त्रीजी बोलत होते.
विवेकानंद जन्मोत्सवाची सुरुवातच शुक्रवारी हभप. निवृत्तीनाथमहाराज शास्त्री यांच्या व्याख्याने पार पडली. दुःखमुक्तीचे आणि संतांच्या अवतार कार्याचे महत्व शास्त्रीजी यांनी आपल्या व्याख्यानातून प्रतिपादीत केले. ते आपल्या व्याख्यानात ते म्हणाले, की जगात प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. दुःखाला अज्ञान हेच प्रमुख कारण आहे. संतांनी व महान पुरुषांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला आहे. लोभ सोडला तर दुःखमुक्त होता येते. संतांनी जगाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी मोह, माया, लोभ यांचा त्याग करण्याचे सांगितले. संतांच्या शिकवणीनुसार वागाल तर निश्चितच दुःखातून बाहेर पडाल, असेही शास्त्रीजी म्हणाले. संतांकडे सर्वोत्तम विवेक असतो. विवेकामुळेच संतत्व प्राप्त होते. संत हे पथदर्शी आहेत, संत सर्वांच्या सुखाचा विचार करतात. स्वतः हालअपेष्टा, कष्ट सोसून संतांनी जगाला ज्ञान आणि सुखच दिले आहे, असेही याप्रसंगी हभप. निवृत्तीमहाराज शास्त्री यांनी सांगितले.
ज्ञानामुळे मनुष्य सुखाच्या जवळ पोहोचतो, असे सांगून शास्त्रीजी म्हणाले, की वारकरी सांप्रादाय हा ज्ञानाचा प्रसार करणारा महत्वाचा समाज आहे. गीता, भगवत यांच्या माध्यमातून समाजाला परमार्थिक ज्ञान मिळते. जीवनात ज्ञान हे महत्वाचे आहे, परंतु ज्ञानाला प्रेमाचे अधिष्ठाण असेल तर जीवन अधिक समाधानी बनते, असेही ते म्हणाले.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

बुधवार, २३ जानेवारी, २०१९

विवेकानंद यात्रा महोत्सवावर तीस-या डोळयाची नजर !


विवेकानंद आश्रमात दि. २५   ते २७ जानेवारी ला विवेकानंद जयंती महोत्सव अत्यंत भव्य प्रमाणात संपन्न होणार आहे. विवेकानंद नगरीत तीन दिवस संपन्न होणा-या यात्रा महोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कान्याकोप-यातून लाखो भाविक भक्त मोठया संख्येने सहभागी होत असतात. यावर्षी शनिवार, रविवार लागून आल्याने भावीकांची संख्या वाढणार आहे. उत्सवा दरम्यान आयोजीत केलेल्या दर्जेदार कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी रसीक मोठया प्रमाणात येत असतात. सुटी आल्यामुळे कार्यक्रम मंडपातील रसीकांची संख्या सुध्दा वाढणार आहे. गर्दीचा फायदा घेणारे अवैध धंदे करणारे, चोरी करणा-यांना कोणतीही संधी मिळू नये, यात्रा निर्विघ्नपणे संपन्न व्हावी भावीकांना उत्सवाचा व यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी संस्थेच्या वतीने आश्रम परिसरासोबतच यात्रेमध्ये सुध्दा सी.सी.टी.व्ही. कॅमेèयांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वयंशीस्तीसाठी प्रसिध्द असलेला विवेकानंद जयंती महोत्सव कुढल्याही अनुचित प्रकाराशिवाय दरवर्षी पार पडतो. दोन लाख भावीक महापंगतीत प्रसाद घेतांना जी शिस्त पाळतात ती वाखण्याजोगी असते त्यामुळे ही महापंगत पाहण्यासाठी दुरदुरुन भावीक व पर्यंटक येत असतात. प.पू.शुकदास महाराजांप्रती असलेली अपार श्रध्दा व महाप्रसादाचे पावित्र्य राखतांना महाप्रसाद घेण्यासाठी जमा झालेला हा जनसमुदाय अत्यंत शांततेचे प्रदर्शन करतो. पोलीसांचा चोख बंदोबस्त यावर्षी सुध्दा राहणार असून उत्सव व यात्रा पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्रमाचे वतीने सांगण्यात आले. बुधवारी ता.२३ रोजी साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यादव यांनी यात्रा परिसराची पाहणी करुन व्यवस्थेबदद्ल समाधान व्यक्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने व जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणात पोलीस विभाग अत्यंत दक्षतेने बंदोबस्त ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

विवेकानंद जयंती महोत्सव यावर्षी प्रचंड गर्दी होणार असून भाविकांना पुरविल्या जाणारी सेवेची पुर्ण तयारी झाली आहे. यात्रेत गर्दीचा फायदा घेणा-या भामटयांचा त्रास भाविकांना होवू नये. जयंती महोत्सव व त्यानिमित्त भरणारी यात्रा या दोन्ही कार्यक्रमात भाविकांना संस्थेने सहभागी होता यावे. दर्जेदार कार्यक्रमांचा आनंद घेता यावा व यात्रेते खरेदी करता यावी यासाठी संपूर्ण आश्रम व यात्रा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत आणण्यात आला आहे.
                                                                      संतोष गोरे सचिव विवेकानंद आश्रम     

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

शेतीपुरक व्यवसायातून उत्कर्ष साधा- प्राचार्य डॉ. सुभाष कालवे



शेती हा काबाड कष्टाचा व अनेक संकटामधून चालणारा अशाश्वत व्यवसाय आहे. शेतक-यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी. शेतीपूरक व्यवसायातून उत्कर्ष साधा असे विचार विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो अंतर्गत विशेष शिबिरामध्ये चेतना अभियान याविषयावर मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित रासेयो अंतर्गत विशेष शिबिरामध्ये चेतना अभियान याविषयावर मार्गदर्शन सत्र व शिबीर समारोप प्रसंगी बुधवारी ता.२३ रोजी विद्याथ्र्यांना मार्गदर्शनी प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगेबाबा,स्वामी विवेकानंद,प.पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यू सावरकर तर प्रमुख पाहुणे  म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकजी थोरहाते,सचिव संतोष गोरे,विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,अणाजी सिरसाट,सरपंच निर्मला डाखोरे,प्रा.मनोज मुèहेकर,रायेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड,रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन ठाकरे तर सुत्रसंचालन राहूल ठेंग,निखील राऊत  तर आभार प्रदर्शन गोपाल मोरे यांनी मानले.
समाज सेवेतून राष्ट्र घडवा
राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनींच्या समाजसेवेचे बीज रूजविण्यात येतात. समाज सेवेतून देश घडविण्याची प्रक्रिया आशा शिबिरातून होत असते. आपल्या समाजसेवेतून राष्ट्र घडविण्याची जबाबदारी तरूणांवर असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


मंगळवार, २२ जानेवारी, २०१९

युवा गझलकार योगेश देवकर यांना युथ आयकॉन अवार्ड पुरस्कार


साखरखेर्डा येथील युवा गझलकार योगेश पुंडलिक देवकर यांना साहित्य क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल रविवारी युथ आयकॉन अवार्ड  देऊन सन्मानीत करण्यात आले.
सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाऊंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे  कोल्हटकर स्मारक मंदिर खामगाव आयोजन करण्यात आले होते. मनोहर नागे यांच्या हस्ते योगेश देवकर यांना युथ आयकॉन आवार्ड, सन्मानचिन्ह, शाल, ग्रामगीता देवून सन्मानित करण्यात आले. युवा साहित्यीकांच्या प्रतिभेला हक्काची जागा मिळवून देण्यासाठी आणि विविध क्षेत्रातील युवा प्रतिभावंतांचा सन्मान व्हावा या उद्देशाने या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनामध्ये बुलडाणा जिल्हयातील विविध क्षेत्रातील कर्तृत्वान तरुणांना युथ आयकॉन अवार्डने सन्मानीत करण्यात आले.यावेळी खासदार प्रतापराव जाधव, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संमेलनाध्यक्ष नवनाथ गोरे, माजी संमेलनाध्यक्ष चला हवा येऊ द्या फेम हास्यसम्राट किशोर बळी, नरेंद्र लांजेवार,अभिनेते गणेश देशमुख,अरविंद शिंगाडे,मधुकर वडोदे,एजाज खान तथा आदि उपस्थित होते. 

साहित्यक्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव
आद्य मराठी गझलकार अमृतराय यांच्या जन्मभूमीत जन्मलेल्या युवा गझलकार योगेश देवकर यांना हा युथ आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल योगेश देवकर यांचे साहित्य क्षेत्रातून कौतुक होत आहे. योगेश देवकर यांच्या जखमा नव्या युगाच्या कवितासंग्रह खूप लोकप्रिय ठरला होता. याशिवाय युटूबर अनेक कवीता प्रसिध्द झाल्या आहेत. 


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



रविवार, २० जानेवारी, २०१९

विवेकानंद जन्मोत्सवाची जय्यत तयारी



हिवरा आश्रम येथे २५ ते २७ जानेवारी दरम्यान आयोजित विवेकानंद जयंती महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात झाली असून, सुमारे दोन लाख भाविकांच्या स्वागतासाठी विवेकानंद नगरी सज्ज झाली आहे. तीनही दिवस यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. 
शेवटच्या दिवशी ४० एकराच्या विस्तीर्ण शेतात २०० क्विंटल गहूपुरी व १०० क्विंटल वांगेभाजी यांच्या महाप्रसादाचा वेत ठेवण्यात आलेला आहे. हा महाप्रसाद चवीसाठी राज्यभर प्रसिद्ध आहे.
विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे व विश्वस्त मंडळाच्या नेतृत्वात विवेकानंद जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, जन्मोत्सवाच्या नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळ महोत्सवाचे चोख नियोजन करत असून, आश्रमाच्या मुख्य विचारपीठासमोर १६ हजार चौरस फूटाचा मंडप टाकण्याचे काम वेगात सुरु आहे. या मंडपात विविध कार्यक्रमांचा लाभ राज्यभरातून आलेल्या भाविकांना घेता येणार आहे. तीनही दिवस आश्रमातील विचारपीठावरून ज्ञानयज्ञ सुरु राहणार असून, नामवंत कीर्तनकार, प्रवचन व व्याख्यानकार आपली सेवा देणार आहे.
तीन दिवसांच्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानंतर २७ जानेवारी रोजी भव्य महापंगतीने या महोत्सवाची सांगता होणार आहे. त्यासाठी २०० क्विंटल गव्हाच्या पिठापासून बनविलेल्या पु-या, १०० क्विंटल वांग्यापासून बनविलेली भाजी यांचा बेत ठेवण्यात आलेला आहे. पुरी-भाजीचा हा महाप्रसाद आपल्या अनोख्या चवीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. तब्बल दोन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार असून, दोन रांगांमधून १०० ट्रॅक्टरद्वारे आणि तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने या महाप्रसादाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

विवेकानंद जन्मोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी विवेकानंद जन्मोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण यूट्युबवरील विवेकानंद आश्रम चॅनलसह फेसबुक, ट्वीटर आणि विवेकानंद आश्रमाच्या विवेकानंद आश्रम डॉट कॉम या वेबसाईटद्वारे केले जाणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली. त्यासाठी आश्रमाच्या मीडिया व पब्लिक रिलेशन विभागाच्यावतीने जोरदार तांत्रिक तयारी करण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या महोत्सवाचे ऑनलाईन प्रसारण जगभर पाहिले गेले होते. तसेच सव्वालाखापेक्षा जास्त दर्शक मिळाले होते. यावर्षी ही संख्या निश्चितच जास्त असेल, असा विश्वासही सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केला आहे.

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

रासेयो शिबीरातून निस्वार्थ सेवेची प्रेरणा- संतोष गोरे





राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून विद्यार्थ्यांच्या मनावर समाजसेवेचे बिज रूजविण्यात येतात. सामाजिक दायित्वाची भावना वृध्दींगत होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची महत्वपूर्ण भूमिका आहे. रासेयो शिबीरातून सामाजिक एकोपा,श्रमाचे महत्व व विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुुणांना संधी मिळते. रासेयो निःस्वार्थ सेवेची प्रेरणा असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित रासेयो शिबीराच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बुधवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनी प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगेबाबा,स्वामी विवेकानंद,प.पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यू सावरकर तर प्रमुख पाहुणे  म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विष्णुपंत कुलवंत,सरपंच निर्मलाताई डाखोरे,पोलीस पाटील रवि घांगडे आदी उपस्थित होते. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी,प्रा.कु.समता कस्तुरे,प्रा.गजानन ठाकरे, प्रा. जयप्रकाश सोळंकी,प्रा. मनोज मुऱ्हेकर,प्रा. धमक , प्रा. चित्रा मोरे,प्रा.अमोल शेळके, प्रा.किशोर गवई,डॉ.सोपान चव्हाण,प्रा.कु.मनिषा कुडके,प्रा.कु.प्रिया वायसे,तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन कु.आश्विनी काळे,कु.स्वाती लहाने तर आभार शालीकराम निकस यांनी मानले.

वृक्ष संगोपन काळजी गरज

विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराच्या विशेष श्रम संस्कार शिबीरात मान्यवरांच्या हस्ते  वृक्षारोपन करण्यात आले. पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी. प्रत्येकाने किमान एका तरी वृक्षाची लावगड करून त्यांचे संगोपन करावे. वृक्ष संगोपन ही काळजी गरज आहे. असल्याचे विचार यावेळी उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले. 

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

२५ जानेवारीपासून विवेकानंद जन्मोत्सव




 महाराष्ट्रात युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या नावाने केवळ हिवरा आश्रम येथेच साजरा होणा-या विवेकानंद जन्मोत्सवास येत्या २५ जानेवारी २०१९ रोजी सुरुवात होणार असून, रविवारी ता.२७ रोजी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ते २७ जानेवारी असे तीनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या महाप्रसाद वितरण सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना  दिली. 
कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी ग्रामीण भागात विवेकानंदांच्या नावाने साजरा होणाèया या उत्सवाची सुरुवात केली असून, राज्यात केवळ हिवरा आश्रम येथेच इतक्या भव्य प्रमाणात हा जन्मोत्सव साजरा होतो. यानिमित्त दि. २५, २६ व २७ जानेवारी रोजी भरगच्च सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२५ जानेवारी रोजी पहाटे ७ ते ८.३० हभप. थुट्टेशास्त्री महाराज यांचे प्रार्थना व व्याख्यान, ८.३० ते ९.३० विवेकानंद आश्रमाच्या संगीत विभागाच्यावतीने अनुभूति गायन, ९.३० ते १०.३० हभप. येवलेशास्त्री महाराज यांचे प्रवचन, सकाळी १०.३० ते १२ वाजता वेदांताचार्य, विद्यावाचस्पती गजाननदादा शास्त्री यांचे व्याख्यान व त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजता हभप. महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी २ ते ५ कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांच्या आसनस्थ मूर्तीची शेकडो भजनी मंडळांच्या साथीने लेझिम, ढोल, मृदंगांच्या गजरात भव्य शोभायात्रा निघणार आहे. दुपारी ५ ते ६.३० वाजता ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या व्याख्यान सायंकाळी ६.३० ते ८ वाजता प्रख्यात वक्ते विवेक घळसासी यांचे व्याख्यान होईल. तर रात्री ८ ते ९ वाजता हभप. वैराग्यमूर्ती पोपट महाराज यांचे यांचे कीर्तन होईल. रात्री ९ ते १० सप्तखंजेरी वादक, राष्ट्रीय कीर्तनकार संदीपपाल महाराज गिते यांचे कीर्तन पार पडणार आहे. 
दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ८.३० हभप. थुट्टेशास्त्री महाराज यांचे प्रार्थना, व्याख्यान, ८.३० ते ९ विवेकानंद आश्रम संगीत विभागाचे अनुभूति गायन, सकाळी ९ ते १० वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे व्याख्यान, १० ते ११.३० प्रसिद्ध विचारवंत डॉ. पी.जी.लुलेकर यांचे व्याख्यान, दुपारी ११.३० ते १.३० हभप.महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन तर दुपारी दीड ते ३ वाजता प्रख्यात विचारवंत विश्वंभर चौधरी यांचे व्याख्यान होणार आहे. ३ ते ५ वाजता वारकरी महामंडळाचे अध्यक्ष हभप. प्रकाशबुवा जवंजाळ यांचे हरिकीर्तन, त्यानंतर ५ ते ६.३० प्रख्यात विचारवंत श्रीपाल सबनिस यांचे व्याख्यान पार पडणार आहे. सायंकाळी ६.३० ते ८ विवेक घळसासी यांचे व्याख्यान, रात्री ८ ते ९ हभप. उमेशमहाराज दशरथे यांचे कीर्तन तर रात्री ९ ते १० शिवशाहीर संतोष साळुंके व त्यांच्या सहकारी यांची शिवशाहिरी आयोजित करण्यात आली आहे. 
दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात ७ ते ९.३० वाजेपर्यंत वेदांताचार्य गजाननदादा शास्त्री यांचे प्रार्थना व व्याख्यान तर त्यानंतर विवेकानंद आश्रम संगीत विभागाच्यावतीने अनुभूति गायन होणार आहे. ९.३० ते ११.३० वाजता श्री.श्री.श्री.१००८ हरिचैतन्यानंद स्वामी महाराज गुरूदेव आश्रम पळसखेड सपकाळ यांचे कीर्तन, ११.३० ते १ प्रख्यात लेखक, विचारवंत डॉ. गिरीष दाबके यांचे व्याख्यान तर दुपारी १ ते २ अंजनगाव सूर्जी येथील देवनाथपीठाचे पीठाधीश पू. जितेंद्रनाथजी महाराज यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 
दुपारी २ ते ५ भव्य महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, या महाप्रसादास अडिच लाख भाविकांची उपस्थिती गृहीत धरण्यात आली आहे. दुपारी ५ ते ६.१५ वाजता मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ. राजशेखर सोलापुरे यांचे व्याख्यान, ६.१५ ते ७.३० प्रख्यात विचारवंत विवेक घळसासी यांचे व्याख्यान, तर सायंकाळी ७.३० ते ८ वाजता प्रार्थना, पू. शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सोहळा पार पडणार आहे. रात्री ८ ते ९ हभप. जगन्नाथमहाराज पाटील यांचे कीर्तन, ९ ते ९.३० हभप. उद्धवराव गाडेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. रात्री साडेनऊनंतर झीटीव्हीफेम स्वरसम्राट रामानंद उगले यांच्या शाहिरीच्या कार्यक्रमाने विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.

विवेकानंद जन्मोत्सव हा दैनंदिन विविध त्रासांनी ग्रस्त असलेल्या मानवी मनाला प्रफुल्लित करून त्याला जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम करतो. विवेक आनंदाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांनी आवर्जुन यावे. 
आर. बी. मालपाणी,अध्यक्ष विवेकानंद आश्रम

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


शनिवार, १२ जानेवारी, २०१९

महापुरूषांच्या बंधुत्वभाव शिकवणीची गरज - प्राचार्य डॉ.सावरकर




निस्वार्थी व सुखी जीवनाचा आनंद हा विवेक विचारातून मिळत असतो. थोर महापुरूषांचे जीवन चरित्र आपल्याला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देतात. थोर महापुरूषांच्या विचारांची कास धरूनच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येते. थोर महापुरूषाचे विचार अंगिकारा. महापुरूषांच्या बंधुत्वभाव शिकवणीची समाजाला गरज असल्याचे विचार विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डब्ल्यु सावरकर यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजीत राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात शनिवारी ता. १२ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात राजमाता  जीजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यु सावरकर तर प्रा.मार्गदर्शक प्रा.ज्ञानेश्वर गाडे,डॉ.चित्रा मोरे,प्रा.मनोज मु-हेकर,प्रा.जयप्रकाश सोळंकी तथा आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना सावरकर म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेतून मांडलेला विश्वबंधूत्वाच्या विचाराची आज समाजाला खरी गरज आहे. थोर महापुरूषांचे विचार  आचरणात आणून ते सर्वांपर्यंत पोहचवावे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. यावेळी प्रा.ज्ञानेश्वर गाडे यांनी सुध्दा आपले विचार मांडले. यावेळी रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी,प्रा.कु.समता कस्तुरे,प्रा.गजानन ठाकरे,प्रा.किशोर गवई,डॉ.सोपान चव्हाण,प्रा.कु.मनिषा कुडके,प्रा.कु.प्रिया वायसे,प्रा.अमोल शेळके तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन कु.धनश्री मोरे तर आभार शुभम दुनगू यांनी मानले.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


रविवार, ६ जानेवारी, २०१९

पत्रकारच समाजाचे खरे मार्गदर्शक - अशोकभाऊ थोरहाते




पत्रकार आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजातील अन्याला वाचा फोडण्याचे काम अविरतपणे करीत असतात. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून तो समाजामध्ये लेखनीच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य करीत असतो. निर्भिडता हा पत्रकाराचा प्रमुख गुण आहे. पत्रकारच समाजाचे खरे मार्गदर्शक असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते यांनी रविवारी पत्रकार दिनी विवेकानंद आश्रमात अयोजित पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळया प्रसंगी बोलतांना काढले.
पत्रकार सतत आपल्या कार्यात मग्न असल्यामुळे नकळतपणे त्याचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे विवेकानंद आश्रमात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करून औषधी देण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकार बांधवांचा विवेकानंद आश्रमाच्या वतीने उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पू.महाराजश्रींचे ग्रंथ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी दै. देशोन्नतीचे पत्रकार समाधान म्हस्के पाटील,दै. सकाळ संतोषबापू थोरहाते,दै.दिव्यमराठीचे शिवप्रसाद थुट्टे,दै.पुण्यनगरीचे सदाशिव काळे,दै.तरूण भारतचे प्रा.मधु आढाव हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रसाद थुट्टे यांनी तर आभार संतोष थोरहाते यांनी मानले. यावेळी सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते तथा आदि हजर होते.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाच्या जननी - प्राचार्य सुनिता गोरे




सावित्रीबाई फुले यांनी १८ व्या शतकात महाराष्ट्रात महिला शिक्षण व समाजसुधारणेचे कार्य केले. भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या होत्या.  सावित्रीबाई  स्त्री शिक्षण व उध्दारासाठी आपले सर्वस्व वाहले. सावित्रीबाई स्त्री शिक्षणाच्या जननी असल्याचे विचार विवेकानंद निवासी अपंग विद्यालयाच्या प्राचार्य सौ.सुनिता गोरे यांनी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बोलतांना  काढले. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद निवासी कर्णबधिर विद्यालयात आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम प्रसंगी  बुधवारी बोलतांना काढले. कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहूणे म्हणून एन पी लाकडे तर मार्गदर्शक म्हणून प्राचार्या सौ.सुनिता गोरे  तथा आqदची उपस्थित होते. शिक्षक आत्माराम दळवी यांनी सावित्रीच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकळा. या कार्यक्रमाला एस.एस.जाधव,एस.पी.फलके,आत्माराम दळवी,नंदा धाडकर,सौ.निर्मला सांबपूरे,ओ.के.पुरी,विठल धोंगडे,गणेश qशदे तथा आqदची यावेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ.नंदा धाडकर यांनी केले. 


बुधवार, २ जानेवारी, २०१९

संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रा.अभय मासोदकर यांना नवरत्न पुरस्कार


येथील विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले संगीत विषयाचे प्रा.अभय बापुराव मासोदकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हास्तरीय संगीत तज्ञ नवरत्न  पुरस्कार प्रदान करण्यात आलाबुलडाणा येथील गांधी भवन येथे आयोजीत कार्यक्रमात अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रा.अभय मासोदकर यांना जिल्हास्तरीय संगीत तज्ञ नवरत्न  पुरस्कार उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारे,मा..विजयराज शिंदे,राष्ट्रीय कीर्तनकार दिपक महाराज सावळे,वाकोडे गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी ता.३० रोजी देण्यात आला
प्रा.अभय मासोदकर हे कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेप्रा.अभय मासोदकर हे अनेक वर्षापासून भक्तीसंगीत,भावगीत,गझल इत्यादीचे कार्यक्रम सादर करतातसंगीत क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेवून अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाने त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय संगीत तज्ञ नवरत्न पुरस्कार प्रदान केलाविवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,प्राचार्य अणाजी सिरसाट,उपप्राचार्य कैलास भिसडे,पर्यवेक्षक आत्माराम जामकर,अशोक गि-हे तथा शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

संतोष थोरहाते

पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र 
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८