शेतीपुरक व्यवसायातून उत्कर्ष साधा- प्राचार्य डॉ. सुभाष कालवे



शेती हा काबाड कष्टाचा व अनेक संकटामधून चालणारा अशाश्वत व्यवसाय आहे. शेतक-यांनी शेतीसोबतच पशुपालनाचा जोडधंदा करून स्वतःच्या आर्थिक परिस्थितीसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करावी. शेतीपूरक व्यवसायातून उत्कर्ष साधा असे विचार विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो अंतर्गत विशेष शिबिरामध्ये चेतना अभियान याविषयावर मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले. 
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित रासेयो अंतर्गत विशेष शिबिरामध्ये चेतना अभियान याविषयावर मार्गदर्शन सत्र व शिबीर समारोप प्रसंगी बुधवारी ता.२३ रोजी विद्याथ्र्यांना मार्गदर्शनी प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगेबाबा,स्वामी विवेकानंद,प.पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यू सावरकर तर प्रमुख पाहुणे  म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकजी थोरहाते,सचिव संतोष गोरे,विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,अणाजी सिरसाट,सरपंच निर्मला डाखोरे,प्रा.मनोज मुèहेकर,रायेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड,रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन ठाकरे तर सुत्रसंचालन राहूल ठेंग,निखील राऊत  तर आभार प्रदर्शन गोपाल मोरे यांनी मानले.
समाज सेवेतून राष्ट्र घडवा
राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनींच्या समाजसेवेचे बीज रूजविण्यात येतात. समाज सेवेतून देश घडविण्याची प्रक्रिया आशा शिबिरातून होत असते. आपल्या समाजसेवेतून राष्ट्र घडविण्याची जबाबदारी तरूणांवर असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.


संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा