येथील विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले संगीत विषयाचे प्रा.अभय बापुराव मासोदकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्हास्तरीय संगीत तज्ञ नवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुलडाणा येथील गांधी भवन येथे आयोजीत कार्यक्रमात अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने प्रा.अभय मासोदकर यांना जिल्हास्तरीय संगीत तज्ञ नवरत्न पुरस्कार उपजिल्हाधिकारी सिध्दार्थ भंडारे,मा.आ.विजयराज शिंदे,राष्ट्रीय कीर्तनकार दिपक महाराज सावळे,वाकोडे गुरूजी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी ता.३० रोजी देण्यात आला.
प्रा.अभय मासोदकर हे कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. प्रा.अभय मासोदकर हे अनेक वर्षापासून भक्तीसंगीत,भावगीत,गझल इत्यादीचे कार्यक्रम सादर करतात. संगीत क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेवून अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाने त्यांना यावर्षीचा जिल्हास्तरीय संगीत तज्ञ नवरत्न पुरस्कार प्रदान केला. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,प्राचार्य अणाजी सिरसाट,उपप्राचार्य कैलास भिसडे,पर्यवेक्षक आत्माराम जामकर,अशोक गि-हे तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
संतोष थोरहाते
पत्रकार,दैनिक सकाळ तथा पर्यावरण मित्र
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा