Responsive Ads Here

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१९

रासेयो शिबीरातून निस्वार्थ सेवेची प्रेरणा- संतोष गोरे





राष्ट्रीय सेवा योजना शिबीरातून विद्यार्थ्यांच्या मनावर समाजसेवेचे बिज रूजविण्यात येतात. सामाजिक दायित्वाची भावना वृध्दींगत होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराची महत्वपूर्ण भूमिका आहे. रासेयो शिबीरातून सामाजिक एकोपा,श्रमाचे महत्व व विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुुणांना संधी मिळते. रासेयो निःस्वार्थ सेवेची प्रेरणा असल्याचे विचार विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उदघाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित रासेयो शिबीराच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी बुधवारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनी प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगेबाबा,स्वामी विवेकानंद,प.पू.शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यू सावरकर तर प्रमुख पाहुणे  म्हणून आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,विष्णुपंत कुलवंत,सरपंच निर्मलाताई डाखोरे,पोलीस पाटील रवि घांगडे आदी उपस्थित होते. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.गजानन गायकवाड,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी,प्रा.कु.समता कस्तुरे,प्रा.गजानन ठाकरे, प्रा. जयप्रकाश सोळंकी,प्रा. मनोज मुऱ्हेकर,प्रा. धमक , प्रा. चित्रा मोरे,प्रा.अमोल शेळके, प्रा.किशोर गवई,डॉ.सोपान चव्हाण,प्रा.कु.मनिषा कुडके,प्रा.कु.प्रिया वायसे,तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन कु.आश्विनी काळे,कु.स्वाती लहाने तर आभार शालीकराम निकस यांनी मानले.

वृक्ष संगोपन काळजी गरज

विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराच्या विशेष श्रम संस्कार शिबीरात मान्यवरांच्या हस्ते  वृक्षारोपन करण्यात आले. पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी. प्रत्येकाने किमान एका तरी वृक्षाची लावगड करून त्यांचे संगोपन करावे. वृक्ष संगोपन ही काळजी गरज आहे. असल्याचे विचार यावेळी उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले. 

संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवासविवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा