कर्मयोगी संत शुकदास महाराजांना बालवयात जीवनाचे
मुळ धर्म माणूसकीत आहे याची जाणीव झाली आणि ईश्वराचा पत्ता सापडला, तो मानव सेवेत.
पुढे ते म्हणाले आपण जीवंत आहोत ना त्यापेक्षा महाराजश्री कितीतरी
अधिक पटीने जीवंत आहेत. अंत झाला तो त्यांच्या शरिरचा विचारांचा नाही.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज परिवर्तनवादी संत असल्याचे विचार शिवाजी घोंगडे
यांनी न संपलेला अस्त पुस्तकाच्या प्रकाशन सोहळयाच्या प्रसंगी रविवारी ता.२७ रोजी
बोलतांना काढले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,जेष्ठ विश्वस्त
दादासाहेब मानघाले, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, अशोक पाध्ये, सचिव संतोष गोरे, सहसचिव
आत्मानंद थोरहाते, विष्णुपंत कुलवंत, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, हभप गजाननदादा
शास्त्री महाराज, द.ना.धाडकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पुढे बोलतांना घोंगडे म्हणाले की, शुकदास
महाराजांच्या विचारांची पातळी खूप उंच गेली होती त्यामुळे त्याच्या जवळ कोणताच
भेदभाव उरला नव्हता. त्यांचे जगणे परिवर्तनवादी होते. त्यांनी उभे केले कार्य
समाजाच्या उत्कर्षाचे होते. भेदभाव विरहीत मानवावर प्रेम हे त्यांच्या कृतीतून
परिवर्तन होते. असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी हजारो भाविक उपस्थित
होते.
संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा