Responsive Ads Here

शनिवार, १२ जानेवारी, २०१९

महापुरूषांच्या बंधुत्वभाव शिकवणीची गरज - प्राचार्य डॉ.सावरकर




निस्वार्थी व सुखी जीवनाचा आनंद हा विवेक विचारातून मिळत असतो. थोर महापुरूषांचे जीवन चरित्र आपल्याला आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा देतात. थोर महापुरूषांच्या विचारांची कास धरूनच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होता येते. थोर महापुरूषाचे विचार अंगिकारा. महापुरूषांच्या बंधुत्वभाव शिकवणीची समाजाला गरज असल्याचे विचार विवेकानंद विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. डब्ल्यु सावरकर यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजीत राजमाता जीजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात शनिवारी ता. १२ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात राजमाता  जीजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बी.डब्ल्यु सावरकर तर प्रा.मार्गदर्शक प्रा.ज्ञानेश्वर गाडे,डॉ.चित्रा मोरे,प्रा.मनोज मु-हेकर,प्रा.जयप्रकाश सोळंकी तथा आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना सावरकर म्हणाले की, स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेतून मांडलेला विश्वबंधूत्वाच्या विचाराची आज समाजाला खरी गरज आहे. थोर महापुरूषांचे विचार  आचरणात आणून ते सर्वांपर्यंत पोहचवावे असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. यावेळी प्रा.ज्ञानेश्वर गाडे यांनी सुध्दा आपले विचार मांडले. यावेळी रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.पल्लवी मिटकरी,प्रा.कु.समता कस्तुरे,प्रा.गजानन ठाकरे,प्रा.किशोर गवई,डॉ.सोपान चव्हाण,प्रा.कु.मनिषा कुडके,प्रा.कु.प्रिया वायसे,प्रा.अमोल शेळके तथा आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी व विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गजानन गायकवाड तर सुत्रसंचालन कु.धनश्री मोरे तर आभार शुभम दुनगू यांनी मानले.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा