विविध फिचर्समुळे जीमेलचे बदलले रूपडे !
पुर्वीच्या काळात पत्र हेच संदेश वहनाचे मुख्य साधन हे होते. पत्रामुळे मुलगा आईवडीलाशी , भाऊ बहीणीशी , प्रियकर प्रियसी संदेशवहनाच्या माध्यमातून आपल्या भावना कळवित असे. पत्र लिहून व्यक्ती आपले सुख दुख , विवाहसमारंभ , पुत्रप्राप्त , अभिनंदन , आभार , गौरव , सांत्वन कळवित होता. अनेकदा पत्र पोहचण्यासाठी विलंब लागत होता. आधुनिक काळात ईमेल हे संदेशवहनाचे मुख्य साधन बनले आहे. जगात सर्वात जास्त जीमेल वापर कर्त्यांची संख्या आहे. नुकतीच जीमेलची आवृत्ती अद्यावत करीत उपयुक्त ठरणा-या फिचर्सचा समावेश केला. यामुळे अनेक दिवसापासून या नवीन फिचर्स विषयी शिगेला पोहचलेल्या उत्सुकतेला पुर्ण विराम मिळाला. आता आर्काईव्ह , मार्क अॅज रीड व डीलीट यांच्या सोबत स्नूझ हा नवीन फिचरचा समावेश केला आहे. स्नूझ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ई मेल किती कालावधी नंतर बघायचा याचे विविध पर्याय सुध्दा उपलब्ध आहे. याशिवाय नवीन जीमेलमध्ये नज या नावाचे नविन वैशिष्टाचा समावेश करण्यात आला असून याच्या मदतीमुळे ईबॉक्स मेल किती दिवसांपूर्वी आला होता याची माहिती सु...