विवेकानंद आश्रमात गुरूपौर्णिमेनिमित्त नेत्रतपासणी शिबीर
विवेकानंद आश्रमात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरूपौर्णिमा उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीभावाने संपन्न केल्या जातो. या वर्षी दि . २७ जुलैला गुरूपौर्णिमा उत्सव संपन्न होणार आहे . गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा व सद्गुरूच्या शिकवणीनुसार मार्गक्रमण करण्याचा निश्चय करण्याचा हा दिवस आहे . कर्मयोगी संत प . पू . शुकदास महाराजांनी आपले संपूर्ण जीवन दीन दुखी , पीडीतांच्या सेवेसाठी सर्मपित केले होते . आरोग्यसेवा हा त्यांच्या जगण्यातील अविभाज्य भाग होता म्हणून दि . २७ जुलै रोजी गुरूपौर्णिमेनिमित्त भव्य नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . श्रीगणपती नेत्रालय जालना येथील तज्ञ डॉक्टरांची चमू नेत्रतपासणी करणार असून गरजू रूग्णांना सवलतीच्या दरात ऑपरेशनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आश्रमाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ . गजानन गि - हे यांनी बोलतांना सांगीतले. साडे आठ वाजेपासून प . पू . शुकदास महाराजश्रींच्या समाधीचे दर्शन , पूजन व नेत्रतपासणी शिबीराला सुरूवात होईल . सायंका...