Responsive Ads Here

सोमवार, ९ जुलै, २०१८

महिलांना विद्यार्थ्यांनी दाखविला स्वयंरोजगाराचा मार्ग


 हंगामात फळाची बाजारपेठेत आवक वाढल्याने मातीमोल किंमतीला विक्री होते. त्यामुळे शेतक-यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. यावर उपाय म्हणून कृषी मालावर प्रक्रिया करून त्यांची विक्री केल्यासबाजारपेठेत चांगली किंमत मिळते. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार मिळण्याच्या दृष्टीने येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सिंदखेड राजा तालुक्यातील वरोडी येथील ४० ते ५०  महिलांना फळप्रक्रिया प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये विद्या गारोळे,सुमन गवई,गंगुबाई गारोळे,वैष्णवी गुंजकर,सुशिला वानखेडे,शितल गारोळे,वंदना गवई,कवीता वानखेडे,गीता गारोळे,शिला वानखेडे,सुमन गवई यांचे सह परिसरातील शेकडो महिला मोठया संख्येने उपस्थितहोत्या.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कास्तकार ग्रुपच्या वतीने आयोजीत फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीराला महिलांकडून चांगलाच प्रतिसाद मिळालाग्रामीण भागातील महिलांना कमी भांडवलातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हेप्रशिक्षण शिबीर अत्यंत महत्वपूर्ण ठरलेया फळ प्रक्रिया प्रशिक्षण  शिबीरामध्ये महिलांना विविध फळांची मूल्यवर्धित उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेया फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीरा मध्ये अॅपल जेलीऑरेंज स्क्वॅश,टोमॅटोकेचअप,पाईन अॅपल स्क्वॅश,पपया जॅम,जांब जेली,इमली कॅण्डी तयार करण्याचे शिकविण्यात आले.
या शिबीराच्या यशस्वीतेसाठी ऋषीकेष गायकवाडसुरज सरनाईकज्ञानेश्वर सोनटक्केशिवम बरडेशुभम इंगोलेभरत कट्टूलाप्रेमसाई रेड्डीगोवर्धन राव यांनी परिश्रम घेतले.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचा वरोडी येथील महिलांनी लाभ घेतलाया रोजगाराभिमुख प्रशिक्षणामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आहे.
                          डॉसुभाष कालवेप्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय

वरोडी या गावातील महिलांना स्वयंरोजगाराचे धडे मिळण्याच्या हेतूने आम्ही कास्तकार ग्रुपच्या वतीने फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन केलेग्रामीण भागातील महिलांना फळ प्रक्रिया करून मूल्य कसे वाढवता येते हे प्रशिक्षणा दरम्यानशिकविले.
                          ऋषीकेश गायकवाड,विवेकानंद कृषी महाविद्यालय

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या कास्तकार ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कृषी फळ प्रक्रिया शिबीरातून आम्हाला विविध पदार्थ घरच्या घरी कमी भांडवलामध्ये तयार करून स्वयंरोजगार कसा निर्माण करावा याचे प्रशिक्षण याशिबीरात दिले.
                                                 विद्या गारोळे गृहिणी वरोडी


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा