वाचनाचा छंद हा मानवी जीवन समृध्द व आनंदी करतो. वाचनाने माणूस सुबुध्द व प्रगल्भ तर होते त्यासोबत त्याच्या कार्यसंस्कृतीवर त्याचा प्रभाव पडतो. माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची मोलाची मदत मिळते. वाचनाने जगण्याची उमेद व वैचारिक प्रगल्भता येते. विचारात परिपक्ता येवून निर्णय घेण्याची क्षमता वाढते.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी चिखली तालुक्यातील एकलारा येथील लोकसेवा वाचनालय अनेक वर्षापासून कार्य करीत आहे. महिलांमध्ये वाचन संस्कृती रूजवून लोकसेवा वाचनालय एकप्रकारचे महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे.
लोकसेवा वाचनालयाने सभासद असणा-या महिलाकरिता फिरते वाचनालय सुरु केले. या वाचनालयाचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन रजिस्टरमध्ये पुस्तकाची नोंद करून पुस्तक देतात. यामुळे वाचनालय सभासद महिलांचा वेळ वाया जात नाही. वाचनालयाचे कर्मचारी महिलांना हवी असलेली पुस्तके चक्क घरपोच नेऊन देतात. आतापर्यंत एक ते दीड हजार महिलांनी लोकसेवा वाचनालयाचा लाभ घेतला आहे.
चिखली तालुक्यातील एकलारा येथे स्व.अण्णासाहेब पानगोळे यांच्या प्रयत्नातून १९७३ केवळ ५० पुस्तकापासून लोकसेवा वाचनालयाची सुरूवात झाली. या वाचनालयातील पुस्तकांचा आकडा १२ हजार ७४२ पर्यंत पोहचला आहे. वाचकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असून महिलांसाठी फिरते वाचनालय हा उपक्रम लोकसेवा वाचनालयामार्फत सुरू आहे. लोकसेवा वाचनालयाला ब दर्जा प्राप्त असून जवळपासचे १० ते १५ खेडयातील वाचक या वाचनालयाचा लाभ घेतात. या वाचनालयाचे ग्रंथपाल संतोष हिंगे,सहकारी राम वाकडे वाचकांना तत्पर सेवा देतात. महिलांना कामाच्या व्यापातून आपला वाचनाचा छंद जोपासता यावा व वेळेचा अपव्यय होवू नये म्हणून वाचनालय महिलांना घरपोच पुस्तकाची सेवा देत असल्याचे वाचनालयाचे कोषाध्यक्ष पुरूषोत्तम गणपत दिवटे यांनी दैनिक सकाळशी बोलतांना माहिती दिली.
लोकसेवा वाचनालयाचे फिरते वाचनायल महिलांसाठी दिपस्तंभ ठरत आहे. शेकडो महिला या वाचनालयाचा लाभ घेत आहेत. वाचनालयाच्या तत्पर सेवेचा महिलांना याचा खूप लाभ होत आहे.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये वाचन संस्कृती रूजविण्याकरीता लोकसेवा वाचनालय गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करीत आहे. फिरते वाचनालयामुळे महिलांच्या वेळत बचत होवून हवे असलेले पुस्तक घरपोच मिळते.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
मो.९९२३२०९६५८
'श्रीनिवास' विवेकानंद नगर हिवरा आश्रम
ता,मेहकर जि.बुलडाणा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा