पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत मुरविणे ही काळाची गरज आहे. रूफ वॉटर हार्वेस्टिंग छतावरील पाण्याच्या नियोजन मुळे जलस्त्रोतात वाढ होतो. छतावर साचलेले पाणी रूफ वॉटर हार्वेस्टिंग कशा प्रकारे करावी या संबंधी संपूर्ण शास्त्रीय माहिती विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कास्तकार ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत सिंदखेड राजा तालुक्यातील वरोडी येथील तेजस्वी महाराज संस्थानची रूफ वॉटर हार्वेस्टिंग प्लनसाठी निवड केली. तेजस्वी महाराज संस्थानच्या पदाधिका-यांना त्यांनी रूफ वॉटर हार्वेस्टिंग पटवून सांगितले. यावेळी अंनता गारोळे,लक्ष्मण खरात, हरीभाऊ खरात, आसाराम गारोळे, गजानन चेके, अमोल गाभणे, विष्णु गिरी, नारायण गिरी, माधव भारती, देवीदास तावरे, दत्तात्रय गुंजकर यांच्यासह परिसरातील शेकडो नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
पावसाळयात छतावर पडणा-या पावसाचे नियोजन करून रूफ वॉटर हार्वेस्टिंग च्या मदतीने जमीन मुरूवून जमीनीच्या जलपातळीत कशी वाढ होते यासंबंधी संपूर्ण माहिती कास्तकार ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी दिली. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कास्तकार ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली तेजस्वी महाराज संस्थानमध्ये छतावर रूफ वॉटर हार्वेस्टिंग करून घेतले. विवेकांद कृषी महाविद्यालयाच्या कास्तकार ग्रुप मध्ये ॠषीकेश गायकवाड, सुरज सरनाईक, ज्ञानेश्वर सोनटक्के, शिवम बरडे, शुभम इंगोले, भरट कट्टूला, प्रेमसाई रेड्डी, गोवर्धन राव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कास्तकार ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके,प्रा. चैतन्य देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कास्तकार ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी रूफ वॉटर हार्वेस्टिंगची माहिती दिली. छतावरील पाण्याचे नियोजन करून जमिनीत मुरविण्याची पध्दती शिकविली. कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली रूफ वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे मला फायदा झाला.
असे करा रूफ वॉटर हार्वेस्टिंग
प्रथम जमिनीमध्ये ५ फुट बाय ४ फुट आकाराचा ६ फुट खोल असा खड्डा करावा. या खड्डयामध्ये पहिल्या थरामध्ये विट फोडून बारीक तुकडयांचा २५ सेंमीचा थर, दुस-या थरामध्ये वाळूचा चा २५ सेमीचा थर त्यावर तिस-या थरामध्ये कोळसा चा १० सेमीचा थर अंथरून त्यावर १० सेमीचा परत विटांच्या तुकडयांचा १० सेमीचा थर अंथरावा. या खड्यामध्ये घराच्या छतावर साचलेले पाणी पीव्हीसी पाईच्या मदतीने सोडावे.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा