आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. अभ्यासातील सातत्य व नियोजन, जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रमाची करण्याची तयारी ही यशाचीगुरूकिल्ली आहे. विचलित न होता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. ध्येयसिध्दता हेच जीवनाचे सार असल्याचे प्रतिपादन पुणे येथील उदयोजक संतोष सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले.
विश्वकर्मा बचत गट तथा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज सेवाभावी ट्रस्ट बुलडाणा व्दारा आयोजीत सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात बुलडाणा येथे ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व प्रभू विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.श्रीराम येरणकर तर प्रमुख पाहूणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, विश्वकर्मा स्वाभिमान प्रतिष्ठाण पुणे चे संजय भालेराव, अनिल सोनूने तथा आदी उपस्थितहोते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.मोनिका बोराडे, प्रा.भगवान राईतकर तर आभार प्रदर्शन डॉ.विजय खोलाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांताराम सोनुने, समाधान सुरोशे, सुधाकर सनान्से, गजानन बारोडे, अनिलखानझोडे, विजय बाराडे, प्रभाकर सनान्से, रवींद्र इंगळे यांनी परिश्रम घेतले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पांचाळ सुतार समाजातील हुशार,होतकरू विद्यार्थ्यांचा यावेळी सन्माचिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यामध्ये कु.नमिता वाघ, कु.अन्नपूर्णा थोरहाते, कु.प्रतिक्षा सुरोशे, कु.मोनिका बारोडे, कु.श्रध्दा थोरहाते,महेश थोरहाते, आदित्य येरणकर, शुभम बारोडे, महेश इंगळे यांच्यासह सुतार समाजातील जवळपास ९१ विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सत्कार व कौतुकाची थाप देवून गौरविण्यात आले.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा