शेंदरी बोंडअळीचे एकात्मीक व्यवस्थापन !


कापूस हे नगदी पीक असल्यामुळे बळीराजाच्या संपूर्ण वर्षाचे अर्थकारण याच पिकाच्या भरवशावर अवलंबून असते. शेंदरी  बोंडअळी ही प्रामुख्याने कापूस या पीकावर आढळणारी एक कीड आहे. गेल्या  दोन वर्षापासून शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने बळीराजा हैरान झाला आहे. शेंदरी बोंडअळी कशी ओळखावी, शेंदरी बोंड अळी येण्याची कारणे, शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा, एकात्मीक व्यवस्थापन कसे करावे यासंबंधी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कर्यानुभवाच्या कृषीरत्न ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील गोरेगांव येथील शेतक-यांना मार्गदर्शन  केले.
यावेळी गजानन पंचाळमाधव चव्हाणसंतोष आरवेकैलास बाजडरामराव पंचाळकिसन गवई,केशव पंचाळबाजीराव मोरेगजानन कव्हळेराजेंद्र बाजडसमाधान पंचाळसंदीप पंचाळ यांचे सह परिसरातील शेकडो शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रामध्ये दरवर्षी  साधारणपणे ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूसाची लागवड करण्यात येतेविदर्भ  मराठवाडा या विभागात  कापूस लावडीला अधिक प्राधान्य दिले जातेशेंदरी  बोंडअळी ही कापूस पिकावरील हानिकारक कीड आहेती बोंडाच्या आत  राहून उपजिवीका करते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीरत्न गु्रपमध्ये ऋषीकेश खिल्लारेशिवनाथ सांगळेपवन शिंगणेअसलम शेखऋषभ जाधव  गोपाल सहाने या विद्यार्थ्यांचा समावेश आहे विवेकानंद कृषीरत्न ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवेप्रा.मनोज खोडकेप्रा.शिवशंकर काकडेप्रा.डॉ.भानुदास भोंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. .
असा ओळखावा प्रादुर्भाव
कपाशीचे फुले पूर्णपणे  उमल्यासहिरव्या बोंडावर डाग किंवा छिद्र दिवसल्यास शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असतेयाशिवाय कामगंध सापळयात नर पंतग अडकल्यासउघडलेल्या बोंडावरती गुलाबी डाग दिल्यास कपाशीवरती शेंद्रीय बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याची प्रामुख्याने लक्षणे दिसून येतात.
असे करावे व्यवस्थापन  
पावती घेतल्याशिवाय कपाशी बियाण्यांची खरेदी टाळावीकपाशीची लागवड वेळेवर  लवकर करावीदर आठवडयाला किडीची पाहणी करावीकपाशी पिकाच्या भोवताली आश्रय पीकाची पेरणी करावीयाशिवाय भेंडीअंबाडीएरंडी  झेंडू या सापळा पिकाची लागवड करावीतीन महिन्यापर्यंत  शक्यतोवर कीटक नाशकांचा वापर टाळावायुरीयाचे जास्त प्रमाण टाळावे.

शेंदरी  बोंडअळीमुळे  कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येतेया किडीचे वेळीच व्यवस्थापन   केल्यास नुकसान  होते.एकात्मिक कीड व्यवस्थापनाने कीड नियत्रंण करावे.
प्रा.शिवशंकर काकडे विभाग प्रमुख किटकशास्त्र कृषी महाविद्यालय




संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा