दिवसेंदिवस शहरी तसेच ग्रामीण भागात इमारतीचे जाळे पसरत आहे. त्यामुळे मोकळया जागेत पाजीपाल्याचे उत्पादन प्रत्येकाला शक्य नाही. यावरती उपाय म्हणून येथील विवेकानंद कृषीमहाविद्यालयातील कृषी कार्यानुभवाच्या कृषी भूमीपूत्र ग्रुपच्या विद्यार्थीनींने टाकाऊ वस्तूंपासून व्हर्टिकल गार्डनिंगचे मॉडेल बनविल. पिक व भाजीपाल्याच्या उत्पादन वाढीसाठी बेसुमार रासायनिक खते वफवारणीचा वापर केला जातो. रासायनिक खते व फवारणीमुळे उत्पादनात वाढ होते मात्र त्याचा मानवी आरोग्य विपरीत परिणाम होतो. सेंद्रिय पध्दतीने घरच्या घरी व्हर्टीकल गार्डनिंगच्या मदतीने भाजीपाला कसापिकवावा याचे धडे हिवरा आश्रम येथील महिलांना विवेकानंद कृषी कार्यानुभवाच्या भूमीपुत्र ग्रुपच्या वतीने देण्यात आले. यावेळी सुनिता अच्युतराव रिंढे,मीना नंदकिशोर करे,रेणुका वैभव करे,माधुरी एकघरे,लताबाईसातारकर,अर्चना भारती,गीता पागोरे,सुचिता करे,शिला बोरे,अनिता सनान्से,देवता धोंडगे,संध्या खरात यांच्या सह परिसरातील शेकडो महिला यावेळी मोठया सं‘येने उपस्थित होत्या.
व्हर्टीकल गार्डनिंगच्या मदतीने आपण अत्यंत कमी जागेत घरच्या घरी सेंद्रिय पध्दतीने ताजा भाजीपाला पिकवून शकतो. व्हर्टीकल गार्डनिंगमध्ये वाल,कारली,भोपळे,कोथींबीर,मिरच् या,टोमॅटो,पालक,मेथी,शापूयासारया अनेक पालेभाज्यांचे उत्पन्न सेंद्रीय पध्दतीने अत्यंत कमीत कमी खर्चात घेता येतो. व्हर्टीकल गार्डनिंगचे मॉडेल हे टाकाऊ व अत्यंत कमी खर्चात घरच्या घरी बनविता येते. आपल्या घरच्याच्या छत किंवाअंगणात सुध्दा हे मॉडेल सहज बसविता येते. आपल्या घरच्या रचनेनुसार आपल ते हलवू सुध्दा शकतो.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषीभूमी ग्रुपमध्ये अश्विनी तायडे,प्रिती राऊत,शिवानी तायडे,स्वरूपा देशमुख,प्रियंका पोले,शुभांगी शेळके,वैशाली चव्हाण,दिव्या क्षीरसागर,शुभांगी सोळंके या विद्यार्थीनींचासमावेश आहे. विवेकानंद कृषी भूमीपुत्र ग्रुपच्या विद्यार्थींनीना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.मनोज खोडके,प्रा साळवे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
असे बनविले व्हर्टिकल गार्डनिंगचे मॉडेल
प्रथम चौकोणी लोखंडी स्टँड बनवावे. त्यांनर या स्टँडमध्ये अर्धे कापलेल्या पिण्याच्या बॉटेल किंवा पी.व्ही.सी.पाईप लोखंडी ताराने बांधावे. कापलेल्या बॉटलच्या भागामध्ये शेणखत मिश्रीत माती टाकावी. आपल्याला हवे असलेला भाजीपाला लावावा. सलाईच्या नळीच्या मदतीने रोपाच्या मुळाशी टिंबक लावावे.
व्हर्टिकल गार्डनिंग ही आजच्या काळाची गरज आहे. घरातील टकाऊ पिण्याच्या बॉटल व पीव्हीसी पाईप या वस्तूंचा वापर करून व्हर्टीकल गार्डनिंगचा संच नाममात्र खर्चात घरच्या घरी बनविता येतो.
संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा