Responsive Ads Here

शनिवार, १४ जुलै, २०१८

बळीराजांनी गिरविले फवारणी तंत्रज्ञानाचे धडे!


शेतक-यांनी फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या कीडनाशकाची खरेदी करावी, फवारणी कोणत्या वेळेस करावी, फवारणीचे द्रावण करतांना कोणती काळजी घ्यावी. याबाबत विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत येथूनच जवळ असलेल्या गजरखेड  येथील शेतक-यांनी फवारणी तंत्रान शास्त्रशुध्द फवारणी कशी करावी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. 
यावेळी लक्ष्मण दळवी, रामेश्वर लाकडे, अशोक पवार, मुरलीधर दळवी, रंगराव दळवी, महेश सवडतकर, जीवन नवले, निलेश लाकडे, पंजाबराव गि-हे , शेषराव सवडतकर, संजय पवार, भाष्करराव दळवी, शेषराव वाहेकर यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. 
यावेळी विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या  शिवराज ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी शेतक-यांना फवारणी करतांना कशी करावी. उंच झाडावर फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, फवारणी झाल्यानंतर किटकनाशकाच्या डब्याची विल्हेवाट कशी लावावी.  फवारणी केलेल्या क्षेत्रावर जनावरांना कधी कालावधीनंतर चार्यांसाठी न्यावे याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
 विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या शिवराज ग्रुपमध्ये मारोती धांडे, रामेश्वर सातवनकर, शुभम राजपूत, विठ्ठल अवचार, शुभमसिंग राजपुत, उमेश चव्हाण,बालाजी डहाळे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या शिवराज ग्रुपच्या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्राचार्य मनोज खोडके, प्रा.डॉ.भानुदास भोंडे, प्रा.शिवशंकर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज ग्रुपच्या विद्यार्थी परिसरातील शेतक-यांना करीत आहे.

फवारणी दरम्यान दक्षता

शेतक-यांनी हिरवा त्रिकोण असलेल्या कीडनाशकांची खरेदी करावी. फवारणी करतांना हातमोजे,मास्क,टोपी,प्रान,पुर्ण पँट गाँगल इत्यादीचा वापर करावा. फवारणी दरम्यान नाक,कान,डोळे याचे रक्षण करावे. फावरणी दरम्यान लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना दुर ठेवावे. फवारणी करतांना वापरलेली भांडी,साहित्य, नदी किंवा विहिरीजवळ धुणे टाळावे. कीटकनाशकावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. फवारणी नंतर साबनाने हात पाय स्वच्छ धुवावे.



विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण  भागातील शेतक-यांना फवारणी संबंधी मार्गदर्शन केले. शिवराज ग्रुपच्या विद्यार्थ्यांच्या फवारणी तंत्रज्ञान मार्गदर्शनाचा शेकडो शेतक-यांना लाभ झाला.

                                                               डॉ.सुभाष कालवे,प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा