Responsive Ads Here

शनिवार, १४ जुलै, २०१८

पर्यावरण संवर्धनासाठी सरसावली कळंबेश्वर जि.प.शाळा


 पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावीप्रत्येकाने किमान एका तरी वृक्षाची लागवड करून संगोपन केले पाहिजे या हेतूने येथूनच जवळ असलेल्या जि..शाळा कळंबेश्वर येथील शाळेतीलमुख्याध्यापक,शिक्षक  विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड  संवर्धनासाठी सरसावल्याचे चित्र दिसून आलेकळंबेश्वर येथे जिल्हा परिषदेची वर्ग पहिली ते चौथी पर्यंतची शाळा आहेया शाळेची पटसंख्या २३२ आहेया शाळेतीलमुख्याध्यापक  शिक्षकांनी  विद्यार्थ्यांच्या बालमनावर पर्यावरण संवर्धनाचे महत्व  पटण्यासाठी  शाळेच्या परिसारात जवळपास १५० ते २०० वृक्षांची  लागवड  शुक्रवारी दि.१३ रोजी करून विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणसंवर्धनाचे संस्कार रूजविले.प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून वनसंपदा आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे रक्षण करावे असे विचार यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलतांना व्यक्त केलेयावेळी सरपंच विष्णुमगर,उपसरपंच गजानन बनसोडे,तंटामुक्ती अध्यक्ष पुंजाजी बो-हाडेशाळा समिती अध्यक्ष नारायण अवचारमुख्याध्यापक नामदेवराव गायकवाड तथा आदींची प्रमुख उपस्थित होतीकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  संजयभुसारी,रामकिसन महाकाळकेशव मिसाळ,गोपाल चांदणे सर राजू निकमज्योती भागवत,हर्षा कदम आकाश भाकडे,केशव पोपळघट यांनी परिश्रम घेतली.
चिमुकल्यांनी घेतली शपथ
कळंबेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्याथ्र्यांनी शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केलीयावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्षांना पाणी देवून संगोपन करण्याची जबाबदारी घेतलीयावेळी चिमुकल्यांच्या चेह-यावर आनंद ओसांडून वाहत होता.

संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा