राज्य कार्यकारणी सदस्य पदी संजय दुणगू



वर्धा जिल्हयातील देवळी येथे आयोजीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक  शिक्षक समितीच्या राज्यकार्यकारणीच्या सभेत हिवरा आश्रम येथील शिक्षक संजय जानराव दुणगू यांची राज्य कार्यकारणी सदस्यपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. हिवरा आश्रम येथील शिक्षक तथा सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेले व्यक्तीमत्व म्हणून ते मेहकर तालुक्यात सुपरिचीत आहे. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. यासोबत राज्यसहसचिव म्हणून प्रदीप अप्पार,विभागीय सरचिटणीस गजानन गायकवाड,विभागीय संपर्कप्रमुख विनोद कड तथा विभागीय सहसंघटक धनंजय डहाके यांची सुध्दा निवड करण्यात आली. यावेळी राज्याध्यक्ष उदय शिंदे,राज्य नेते काळू बोरसे, शिक्षक नेते शिवाजी साखरे, राज्यसरचिटणीस विजय कोंबे, राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, राज्य प्रवक्ता आबा शिंपी,राज्य कोषाध्यक्ष केटुजी देशमाने,राज्य संपर्क प्रमुख राजेंद्र खेडेकर, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर तसेच राज्य पदाधिकारी, सर्व जिल्हयाचे अध्यक्ष,सरचिटणीस उपस्थित होते.

अन्यायग्रस्त शिक्षकांसाठी तत्पर
हिवरा आश्रम येथील शिक्षक असलेले संजय दुगणू हे गेल्या दहा वर्षापासून जिल्हयातील शिक्षकांच्या विविध समस्या निवारण्यासाठी कार्य करीत आहेत. शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी शासन दरबारी नेहमीच प्रयत्नशील असतात. शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांचा मुद्दा शासन दरबारी ऐरणीवर घेतला होता.



संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा