Responsive Ads Here

रविवार, १ जुलै, २०१८

यशासाठी परिश्रमाची तयारी ठेवा - जि.प.सदस्य संजय वडतकर


आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. गुणवत्ता ही स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक गोष्ट   आहे.  आपल्या आई वडीलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अथक परिश्रम,चिकाटी व ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. आपल्या  ध्येयापासून परावृत्त होवू नका. यशासाठी परिश्रमाची तयारी ठेवावी असे प्रतिपादन जि. प. सदस्य संजय वडतकर यांनी शनिवारी बोलतांना काढले.
येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित पालक मेळाव्याच्या प्रसंगी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात   सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरीक संघटनेचे अध्यक्ष भिमराव शेळके,तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी फौजी रामदास आटोळे,वि.रा.गव्हाळे,शाळा समितीचे अध्यक्ष अरूणजाधव,उपाध्यक्ष सतिष म्हस्के, मुख्याध्यापक अरविंद होणे तथा आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय पवार तर आभार प्रदर्शन प्रकाश दुणगू यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय बंगाळे,दत्ता दसरथे,मिनाक्षी बंगाळे,सरिता पवार,आशा साखरे यांनी परिश्रम घेतले

लोकसहभागातून होणार शाळेचा विकास
पालक मेळाव्यात  जि.प.सदस्य संजय वडतकर यांनी शाळेचे वाॅल कंपाउंड पूर्ण करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले. याशिवाय ग्रामस्थांनी सुध्दा आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत केली.यामध्ये रामेश्वर मानेकर,शीलीकभाऊ महाकाळ,शरद म्हस्के,एकनाथ आव्हाळे,डाॅ.महेश रोकडे,श्रीनिवास वडतकर,सवडतकर साहेब,शरद पागोरे,नामदेव निकस,सुनिल काळे,शंकर पटेल,रतन पटेल,अनिल म्हस्के,पंजाबराव पोफळे,विवेक दळवी,शकिल शहा,वि.रा.गव्हाळे यांनी शाळेचा विकास होण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत केली.


संतोष थोरहाते 
पत्रकार दैनिक सकाळ 
मो.९९२३२०९६५८
'श्रीनिवास' विवेकानंद नगर हिवरा आश्रम 
ता,मेहकर जि.बुलडाणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा