Responsive Ads Here

सोमवार, १६ जुलै, २०१८

बळीराजांनी फवारणी दरम्यान बाळगावी दक्षता !


 विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी समृध्दी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हिवरा आश्रम येथे शेतक-यांना फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या कीडनाशकाची खरेदी करावी, फवारणी कोणत्या वेळेस करावी, फवारणीचे द्रावण करतांना कोणती काळजी घ्यावी. याबाबत शेतक-यांनी फवारणी तंत्रज्ञान व शास्त्रशुध्द फवारणी कशी करावी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
यावेळी शंकर चव्हाण,रामभाऊ पुंडे, प्रकाश गारोळे, राजेश पिठले, रामकृष्ण नवघरे, रामदास वडतकर,एकनाथ आव्हाळे, किशोर गारोळे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या  कृषी समृध्दी ग्रुपच्या विद्यार्थीनींनी शेतक-यांना फवारणी करतांना कशी करावी. उंच झाडावर फवारणी करतांना कोणती काळजी घ्यावी, फवारणी झाल्यानंतर किटकनाशकाच्या डब्याची विल्हेवाट कशी लावावी.  फवारणी केलेल्या क्षेत्रावर जनावरांना कधी कालावधीनंतर चारण्यासाठी न्यावे याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी समृध्दी ग्रुपमध्ये कु.कल्याणी पाटील,कु.मोनिका चव्हाण,कु.प्रिया मवाळ,कु.एन.एस.प्रियंका,कु.मनिषा चव्हाण,कु.प्रतिक्षा धोंगडे,कु.पुजा झाल्टे,कु.कोमल काळदाते,कु.संपदा पडघान,कु.अमृता बोम्मा,कु.उज्वला काकडे  या विद्यार्थीनींचा समावेश आहे. कृषी समृध्दी ग्रुपच्या विद्यार्थीनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे,प्रा.डॉ.भानुदास भोंडे,प्रा.शिवशंकर काकडे  यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अशी घ्यावी खबरदारी
कीटकनाशकावरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शेतक-यांनी हिरवा त्रिकोण असलेल्या कीडनाशकांची खरेदी करावी. शेतक-यांनी फवारणी करतांना हातमोजे,मास्क,टोपी,प्रान,पुर्ण पँट गाँगल इत्यादीचा वापर करावा. फवारणी दरम्यान नाक,कान,डोळे याचे रक्षण करावे. फावरणी दरम्यान लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना दुर ठेवावे.  फवारणी करतांना वापरलेली भांडी,साहित्य, नदी किंवा विहिरीजवळ धुणे टाळावे. फवारणी नंतर साबनाने हात पाय स्वच्छ धुवावे.


विवेकानंद कृषी समृध्दी ग्रुपच्या आम्ही विद्यार्थीनी शेतक-यांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील आहोत. फवारणी करतांना कोणती खबरदारी घ्यावी याबाबत आम्ही हिवरा आश्रम येथील शेतकरी बांधवांना मागर्दशन केले. या मार्गदर्शनाचा निश्चित शेतकरी बांधवांना फायदा होईल.
                                                                                                  प्रिया मवाळ विवेकानंद कृषी महाविद्यालय

विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थीनींनी फवारणी कशी करावी.फवारणी दरम्यान कोणती काळजी घ्यावी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आम्हा शेतक-यांना याचा खूप फायदा झाला.
                                                                                                               रामभाऊ पुंडे,शेतकरी


संतोष थोरहाते
पत्रकार दैनिक सकाळ
''श्रीनिवास'' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा

मो.९९२३२०९६५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा