पाऊसाचा पडणारा प्रत्येक थेंब वायाजाऊ नये, महाराष्ट्र राज्यातील दुष्काळाची गडद छाया नष्टव्हावी, धरणातील गाळ उपशातून जलसाठयात वाढ व्हावी, शेतात गाळ टाकून जमीनीची सुपीकता वाढावी या उदात्तहेतूने भारतीय जैन संघटना व बुलडाणा जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हयातील धरणातील गाळ उपसा करण्यासाठीसुजलाम् सुफलाम् अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.सुजलाम सुफलाम् अभियानामुळे कोराडी धरणातीलजलसाठयात वाढ झाली. सुजलाम् सुफलाम खरा जलसाठावर्धक असल्याचे विचार मेहकरचे तहसीलदार संतोष काकडेयांनी कोराडी जलपूजन प्रसंगी हिवरा आश्रम येथे बोलतांनागुरूवारी दि. १९ रोजी काढले.
यावेळी जि.प.सदस्य संजय वडतकर,विवेकानंद आश्रमाचेउपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,भारतीय जैनसंघटनेचे मंगलचंद कोठारी,निलेश नाहटा,तलाठी राजेंद्रआव्हाळे,बि.जे.एस जिल्हा समन्वयक लक्ष्मण पवार,जगन्नाथखाकटे, रवींद्र पोटदुखे,शांतुल केदारे,प्रशांत बोरे, अरविंद धोंडगे,अरूण गावंडे,रामजी नाईक तथा आदीची उपस्थिती होती.
सावित्रीच्या लेकींच्या हस्ते जलपूजन
जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे कोराडी जलाशयातमोठया प्रमाणात वाढ झाली. भारतीय जैन संघटनेच्या वतीनेजलपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन हिवरा आश्रम येथेकरण्यात आले होते. यावेळी विवेकानंद आश्रमाच्याशैक्षणिक संस्थेत शिक्षण घेणा-यांना विद्यार्थींनींच्या हस्तेजलपूजन करण्यात आले.
कोराडीच्या जलसाठयात होणार वाढ
भारतीया जैन संघटनेच्या वतीने ८ मार्च रोजी कोरडीधरणातून गाळ उपसा कामास सुरूवात झाली. तीन जेसीबी वएक पोकलँडच्या मदतीने काम युध्द पातळीवर पार पडले. कोराडी धरणातुन ४ लाख ७५ हजार सहाशे सत्तर ब्रासगाळचा उपसा करण्यात आला. गाळ उपसामुळे धरणाच्याजलसाठयात १ लाख ३४ हजार सहाशे चौदा टीसीएम एवढयाजलसाठयात वाढ होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा