Responsive Ads Here

सोमवार, ४ मार्च, २०१९

अपु-या सिंचनाचा रब्बी पिकाला फटका


मेहकर तालुक्यात यावर्षी दुष्काळी परिस्थिती असून हरभरा व गहूचा पेरा कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. मेहकर तालुक्यात बळीराजाने हरभराच्या हंगामास सुरूवात केली असून कमी पावसामुळे  हरभराच्या उत्पादनात ५० टक्याने घट होणार असल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. रब्बी पिकाच्या पेरणीसाठी काढलेल्या कर्ज  रब्बी पिकाच्या उत्पादनात घट झाल्यामुळे कसे फेडायचे या विचाराने तो चिंताग्रस्त  झाला आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षपासून  निसर्गाच्या लहरीपणाच्या झळा शेतीक्षेत्र  व बळीराजा सहन कराव्या लागत आहे. पावसाची सरासरी कमीकमी  होत असल्यामुळे तलाव व धरणात कमी प्रमाणात जलसाठा होत असल्यामुळे त्यांचा मोठा फटका शेतीक्षेत्राला बसत आहे. धरणाचा जलसाठा कमी असल्यामुळे शेतीच्या सिंचनासाठी पाणी मिळत नाही. व अत्यल्प पावसामुळे विहिरींनी तळ गाठल्यामुळे रब्बी पिकासाठी पाणी कमी पडल्यामुळे परतीचा पाऊस समाधानकारक झाला नाही. त्याचा रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका या पेरणी क्षेत्रावर परिणाम झाला. अपु-या सिंचनामुळें   रब्बीच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट होत आहे. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी बी,खते,फवारणी व सोंगणी व काढणीचा विचार करता बळीराजाच्या हातामध्ये काहीच बाकी रक्कम शिल्लक राहत नाही.  शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचे कणा  आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतक-याच्या शेतीमाला योग्य बाजार भावा अभावी दिवसेंदिवस तो कर्जाच्या खाईत पुरता बुडत चालला असतांना यावर्षी अपु-या पावसामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनात येणा-या घटमुळे तो पुरता निराश झाला आहे. 

शेतीपुरक व्यवसायाकडे वळण्याची गरज
दिवसेंदिवस निसर्गाच्या लहरीपणाचा बळीराजाला सामना करावा लागत आहे. बळीराजाने भविष्यात शेतीवर विसंबून न राहता शेतीपुरक व्यवसायाची कास धरावी. शेतीसोबत दुध व्यवसायाकडे वळल्यास शेती व्यतिरिक्त उत्पादनाचे दुसरे साधन उपलब्ध होईल. 

हंगामात मजुरीचे दरात वाढ
ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाने ग्रामीण भागात काम मिळत नसल्यामुळे कामाच्या शोधाकरीता शहरी भागाकडे धाव घेतली. ग्रामीण भागातील मजूर व कष्टकरी वर्ग शहराकडे गेल्यामुळे ग्रामीण भागात रब्बी पिकाच्या हंगामासाठी मजूर मिळत नसल्यामुळे मजुरीच्या दारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.



संतोष थोरहाते
पत्रकार तथा प्रेरणादायी व्याख्याता
'श्रीनिवास' विवेकानंद नगर,हिवरा आश्रम
ता.मेहकर जि.बुलडाणा
मो.९९२३२०९६५८



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा