चलता रह तू हर वक्त....रख लक्ष्य को सिधान पे...


आयुष्यात यश ही आकस्मित किंवा दैव योगाने मिळणारी गोष्ट नाही. तर केवळ आणि केवळ प्रयत्नवादी भूमिका त्यासाठी आवश्यक असते. यश ही नशिबाने नव्हे तर उच्च ध्येयाच्या उदिष्टपूर्तीसाठी तुम्ही किती प्रामाणिक आहात यावर ठरत असते. यश आणि सुख हे नेहमी जोडीने येते. स्पर्धेत यशस्वी व्हायचे असेल तर आपण आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असणे गरजेचे आहे. स्पर्धेत यश संपादन करायचे असेल तर इतर स्पर्धेकांपेक्षा आपण निश्चित काकणभर जास्त शिल्लक असणे महत्वाचे आहे.
कर्मयोगी संत .पू.शुकदास महाराजश्री संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठ म्हणजे कडक शिस्त, दर्जेदार शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था... विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सदैव कर्तव्यक्ष समर्पित भावनेने शैक्षणिक कार्य करणारे गुरूजन... विवेकानंद ज्ञानपीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक,सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. खरतर लहानग्याच्या जिज्ञासा, संशोधक वृत्तीला चालना देण्याचे काम विवेकानंद ज्ञानपीठामार्फत अवितरपणे करण्यात येते

माझा पुतण्या हरी आत्मानंद थोरहाते हा विवेकानंद ज्ञानपीठात इयत्ता पहिलीमध्ये शिक्षण घेत आहे. सन २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या नॅशनल ऑलिम्पियाड परिक्षेत सिल्व्हर मेडल प्राप्त केले. सदैव हसतमुख हजारजबाबी असलेल्या हरीने प्राप्त केलेल्या यशाबद्दल अभिमान वाटत आहे. रूका कभी हार के... डर इन मुश्किलो के तूफान से..चलता रह तू हर वक्त.... रख लक्ष्य को सिधान पे... आयुष्याच्या प्रत्येक पावलावर तुला असेच यश मिळत रहो.

संतोष थोरहाते,
विवेकानंद नगर हिवरा आश्रम


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा