Responsive Ads Here

शनिवार, २ मार्च, २०१९

रस्ता दुरुस्तीसाठी ओलांडेश्वर संस्थांचा पुढाकार


हजारो भाविकांचे अतूट श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थान दुधा ब्रम्हपूरी येथे महाशिवरात्री उत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भक्त येतात .हिवरा आश्रम ते श्रीक्षेत्र ओलांडेश्वर  या रस्त्यावरील डांबर निघाल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे.रात्रीच्या वेळी  हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर रस्त्याने दुचाकी चालविणे म्हणजे तारेवरची कसरत होय. भाविक भक्तांची रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होणारी हेळसांड थांबविण्यासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वरचे अध्यक्ष मंचकराव देशमुख यांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या मदतीने हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर या ३ किलोमीटर  रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा बाजूनी ५० ट्रॉली मुरमाचा भराव टाकला. ओलांडेश्वर संस्थाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जवळपास ५० हजार रुपये खर्च केला. श्रीक्षेत्र ओलांडेश्वर वर भाविकांची अतूट श्रद्धा असल्यामुळे महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक ओलांडेश्वर येथे येतात. दरम्यान भल्या सकाळी भाविक भक्त शिव पूजन व दर्शनासाठी श्रीक्षेत्र ओलांडेश्वर येथे येत असतात.  नागरिकांना नाहक त्रास होत होता.  दरम्यान दुचाकी चालकांच्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .रस्ताला विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळणी झाली आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे कानाडोळाकेल्यामुळे रत्याची दुरावस्था दिवसेंदिवस अधिकच होत आहे. तरी या रस्त्याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी यावेळी भाविकंाकडून जोर धरीत आहे.   या  रस्ताची रूंदी केवळ १० फूट असल्यामुळे दुचाकी, चारचाकी चालकांना  तारेवरची कसरत करावी लागत आहे.श्रीक्षेत्र ओलांडेश्वर संस्थाने रस्ता दुरुस्तीसाठी घेतलेल्या पुढाकारामुळे भक्तांमध्ये आनंद झाला आहे.

गेल्या अनेक वर्षपासून हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर या रस्त्याचे डांबर निघाल्यामुळे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची चाळणी झाली होती. ओलांडेश्वर संस्थाने पुढाकार घेऊन हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर रस्त्याची मुरूम टाकून दुरुस्ती केली.लोकप्रतिनिधींनी या रस्त्याकडे जातीने लक्ष द्यावे.
 मंचकराव देशमुख, अध्यक्ष ओलांडेश्वर संस्थान 

श्रमदानासाठी तरुणाई सरसावली
हिवरा आश्रम ते ओलांडेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी ओलांडेश्वर संस्थांच्या वतीने पुढाकार घेऊन ५० ट्रॉली मुरूम टाकण्यात आला. रस्त्यावर मुरूम टाकण्यासाठी दुधा गावातील राजू इटीवाड,अमोल  इटीवाड, रवि पवार, नागेश देशमुख, गोपाल इटीवाड, गोपाल गाडेकर, सचिन देशमुख, नागेश देशमुख, आकाश ठाकूर, बाळू देशमुख या तरुणांनी श्रमदानासाठी  पुढाकार घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा